Goa crime : पठ्ठ्याने लाटले ४३ एटीएम मधून २.५ कोटी, सिक्युअर व्हॅल्यू लिमिटेडच्या अधिकाऱ्याचा पराक्रम  - पुढारी

Goa crime : पठ्ठ्याने लाटले ४३ एटीएम मधून २.५ कोटी, सिक्युअर व्हॅल्यू लिमिटेडच्या अधिकाऱ्याचा पराक्रम 

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ४३ एटीएम मशिनमधून २.५ कोटी रुपयांचा गफला केल्याची घटना समोर आली आहे. सरकारी तसेच खाजगी एटीएम मध्ये पैसे भरणाऱ्या सिक्युअर इंडिया लिमिटेडच्या सहाय्यक व्यवस्थापकानेच हा पराक्रम केला आहे. यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापक देविदास माळकर यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. (Goa Crime)

यासंबंधी मिळालेली अधिक माहिती अशी, सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड या कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक निलेश नाईक आणि त्यांचे १६ सहकारी राज्यातील खाजगी तसेच सरकारी बँकांच्या एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम करत होते. त्यामुळे त्यांना सर्व बँकांचे सिक्युरिटी कोड माहीत होते.

मुख्य संशयित निलेश नाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गोव्यातील विविध ४३ बँकांमधून अंदाजे अडीच कोटी रुपये काढून त्या बॅंकांना गंडा घातलाय. (Goa Crime) हे प्रकरण जेव्हा कंपनीच्या निदर्शनास आले त्यावेळी कंपनीचे व्यवस्थापक देविदास माळकर यांनी पर्वरी पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली.

पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतीक भट यांनी भारतीय दंड विधान क्रमांक ४०९, ४२० आणि १२ ब अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

Back to top button