गणेश चतुर्थी देशातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. हा उत्सव १० दिवस साजरा केला जातो. उत्सव काळात घरी आणि सर्वाजनिक मंडळांच्या मंडपात गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशमूर्तींची सजावट करून, प्रसाद अर्पण करून दररोज पूजाविधी होतात. या काळात काही उपायांचे पालन केले तर गणेशाची कृपादृष्टी सदैव तुमच्या राहते, अशी मान्यता आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्ती आणि पाण्याचा कलश चौरंगावर ठेवावा. दिवा लावून “ॐ गणपतये नमः” या मंत्राचा जप करून ध्यान करावे. गणेशमूर्तीला पंचामृत आणि जल अर्पण करावे. त्यानंतर रोळी, चंदन, कुंकू, फूल, दुर्वा, पान, सुपारी आणि मोदक अर्पण करावा. धूप, दीप आणि कापूर यांनी आरती करावी. पूजा झाल्यानंतर अखेरीस प्रसाद वाटप करावा.
श्री गणेश चतुर्थी दिवशी गायीच्या तुपात कुंकू मिसळून त्याचा दिवा श्री गणेशासमोर ठेवावा. तसेच या दिवशी झेंडूची फुले, गुळाचा प्रसाद अर्पण करावा, तुम्हाला शुभफल प्राप्त होईल.
गणेशाची पूजा करताना स्वच्छ आणि हिरव्या रंगांचे कपडे परिधान करावेत, तसेच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना पिवळ्या रंगाच्या वस्रावर करावी. त्यामुळे तुमच्या समस्या दूर होतील.
गणेश चतुर्थीला गणेशाच्या कपळावर चंदन, अक्षता आणि टिळा लावावा, त्यामुळे सौभाग्य प्राप्ती होते.
सनातन धर्मानुसार गाईला दिव्य पशू मानले गेले आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्यावा, त्यामुळे ग्रहदोष दूर होतात.
गणेश चतुर्थीच्या दिवशी हिरवा चना दान केल्याने बुध प्रसन्न होतो. कुंडलीमध्ये भगवान बुद्ध व्यापाराचा कारक मानला गेला आहे. त्यामुळे कार्य, व्यवसाय यात प्रगतीसाठी हा उपाय आवश्य करावा.