गणेशोत्सव पूजा, धार्मिक विधी आणि प्रसाद
श्री हरतालिकेची आरती ....
Hartalika Teej 2024 | जय देवी हरितालिके, सखी पार्वती अंबिके....!
जय देवी हरितालिके । सखी पार्वती अंबिके ।
आरती ओवाळीते ।
ज्ञानदीपकळीके ।।
हरअर्धांगी वससी । जाशी यज्ञा माहेरासी ।
तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी । जय ।।1।।
रिघसी हिमाद्रीच्या पोटी । कन्या होसी तू गोमटी ।
उग्र तपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी । जय ।।2।।
तापपंचाग्निसाधनें । धूम्रपाने अधोवदने ।
केली बहु उपोषणे । शंभू भ्रताराकारणे । जय ।।3।।
लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ।
पुन्हा वारिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटी । जय ।। 4।।
काय वर्णूं तव गुण । अल्पमति नारायण ।
माते दाखवी चरण । चुकवावे जन्ममरण । जय ।।5।।