श्रावण स्पेशल रेसिपी: झटपट बनवा उपवासाचे आप्पे | पुढारी

श्रावण स्पेशल रेसिपी: झटपट बनवा उपवासाचे आप्पे

श्रावण महिना हा भारतीय संस्कृतीतील अतिशय पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेकजण पूजा, विधी आणि व्रतवैकल्य केली जातात. यादरम्यान अनेकजण उपवास करतात. काहीजण ठराविक वारादिवशी तर काहीजण पुर्ण महिनाभर एकावेळी जेवत हा श्रावण पाळतात. खूप वेळा तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, साबुदाणा खिचडी, वरई, बटाट्याची भाजी याशिवाय उपवासाला काय खावं. यासाठीच झटपट आणि पटापट होणारे उपवासाचे आप्पे ही रेसिपी नक्की बनवून पाहा…

साहित्य:

• १ कप वरई
•१/४ साबुदाणा
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• ३/४ कप दही
• चवीनुसार मीठ
• १/२ टीस्पून जिरे
• १/२ टीस्पून बेकिंग सोडा
• १/२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट

कृती

• प्रथम साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात घेऊन रवाळ बारीक करून घ्या. बारीक करताना पावडर होणार नाही याची काळजी घ्या
• यामध्ये वरई घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये एक गरका मारून एकजीव करून घ्या. हे मिश्रण एका भांड्यात काढा.
• यामध्ये दही घालून व्यवस्थित मिक्स करा. या ठिकाणी तुम्ही दह्याऐवजी १ कप ताकसुद्धा वापरू शकता.
• त्यानंतर या तयार पिठामध्ये जिरे, बेकिंग सोडा, हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करा.
• तयार झालेल्या पीठामध्ये गरजेनुसार पाणी टाकून मध्यम कन्सिस्टन्सी असलेले मिश्रण तयार करा. यामध्ये तुम्ही बेकिंग सोडाऐवजी १/२ टीस्पून इनो फ्रूट सॉल्ट देखील वापरू शकता.
• यानंतर तयार झालेले हे पिठाचे मिश्रण साधारण १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.
• आप्पे पात्र मध्यम आचेवर गरम करा. यामध्ये प्रत्येक साच्यात तेलाचे काही थेंब टाका.
• प्रत्येक साच्यात हे तयार केलेले पीठ मिश्रण घालून त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण २ मिनिटे शिजवा.
• यानंतर झाकण काढून, तुम्ही पुन्हा तेलाचे काही थेंब बाजूने घालू शकता. याला सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी चांगले शिजवून घ्या.
•  तयार झालेले उपवासाचे आप्पे तुम्ही तसेच खाऊ शकता किंवा शेंगदाणा आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत देखील हे स्वादिष्ट लागतात.

Back to top button