Andhra Recipe Chicken Fry : स्वादिष्ट आंध्रा स्टाईल चिकन फ्राय बनवा झटपटीत, अगदी काही मिनिटात... | पुढारी

Andhra Recipe Chicken Fry : स्वादिष्ट आंध्रा स्टाईल चिकन फ्राय बनवा झटपटीत, अगदी काही मिनिटात...

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्याकडे चिकन-६५ (chicken 65) हा प्रकार सर्व रुढ आहे. पण, आंध्रा स्टाईलने चिकन फ्रायची (Andhra Recipe Chicken Fry) रेसिपी कधी खाल्ली आहे का? मासांहार प्रेमींनी तर ही रेसिपी जरूर ट्राय करावी. आंध्रा स्टाईलची रेसिपी युनिक आहे; पण तुम्ही अगदी काहीच मिनिटांमध्‍ये घरच्या घरी ती बनवू शकता.  त्याची चव जिभेवर रेंगाळतेच रेंगाळते. आज आपण अशी रेसिपी कशी करतात ते पाहूया.

साहित्य 

१) अर्धा किलो चिकन, ७-८ पानं कढीपत्ता

२) एक इंच दालचिनी आणि एक चमचा लिंबाचा रस

३) चिमूटभर बडिशेप आणि ३-४ हिरव्या मिरच्या

४) अर्धा चमचा काळी मिरची पावरड आणि एक चमचा तूप

५) दहा काजू, पाच लवंगाच्या कुडी

६) दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा

७) चिमूटभर हळद, १ चमचा आलं-लसूण पेस्ट

८) एक चमचा लाल मिरची पावडर, दोन कप दही, कोथिंबीर

Andhra Recipe Chicken Fry : कृती 

१) सर्वांत पहिल्यांदा एक भांडं घेऊन त्यात लाल मिरची पावडर घालू घ्या, आलं-लसूण पेस्ट, हळद आणि दही घेऊन त्यात चिकन मिक्स करून घ्या. ते मिश्रण  मुरण्यासाठी किमान तासभर बाजुला ठेवून द्या.

२) एका बाऊलमध्ये कांदा बारीक कापून घ्या. कोथिंबीर कापून घ्या आणि लिबांचा रस पिळून घ्या. काजूची पावडर करून घ्या.

३) या नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तूप गरम करून घ्या. नंतर बारीक चिरलेला कांदा तेलात मंद आचेवर भाजून घ्या. नंतर कांद्यात मुरलेलं चिकन घाला आणि चिकन नरम होईपर्यंत भाजून घ्या.

४) त्यानंतर गॅसवर दुसरीकडे एका पॅनवर तेल गरम करून त्यात हिरवी मिरची आणि कढीपत्ताची फोडणी घालुन घ्या.

५) नंतर ती फोडणी चिकनमध्ये घाला. काजूची पावडर आणि चवीनुसार काळी मिरची पावडर व मीठ घालून घ्या.

६) त्यानंतर चिकन काही वेळापर्यंत फ्राय करून घ्या. किमान ५ मिनिटं फ्राय करत रहा. शेवटी त्यात कोथिंबीर आणि लिंबूचा रस घालुन घ्या.

७) अशाप्रकारे आंध्रा स्टाईलची फ्राय चिकन रोटीसोबत खाऊ शकता किंवा गरमागरम भातासोबतही खाऊ शकता.

हेही वाचलंत का?

Back to top button