Pickle : वर्षभर कसं टिकवाल कैरीचं चटपटीत लोणचं, जाणून घ्या माहिती  | पुढारी

Pickle : वर्षभर कसं टिकवाल कैरीचं चटपटीत लोणचं, जाणून घ्या माहिती 

पुढारी ऑनलाईन डेस्क : पावसाळ्यात आवर्जून जेवणात पाहायला मिळणारा पदार्थ म्हणजे लोणचं  (Pickle). त्या लोणच्यामध्येही बरेच प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. उदा. कच्च्या  कैरीच लोणचं, मिरचीच लोणचं, लिंबूच लोणचं, माईन मुळ्याच लोणचं, आवळ्याचे लोणचं अशी बरीच चविष्ट लोणची सांगता येतील. आज आपण कच्च्या कैरीच लोणचं पाहुया.

साहित्य 

पावसाळ्याच्या दिवसात कच्च्या कैरीचे लोणचं खूप चविष्ट लागत. पण ते योग्य पद्धतीने केल्यावर. योग्य प्रमाण घातलेलं लोणचं हमखास वर्षभर टिकतचं. चला तर मग झटपट तयार होणाऱ्या कैरीच्या लोणच्याची कृती समजून घेवूया.

  • Samosa : खुसखुशीत आणि खमंग समोसा कसा कराल?
  • १  किलो कच्च्या कैरी. कैरी शक्यतो कडक असाव्यात.
  • १ वाटी कडकडीत गरम करून थंड केलेलं गोड तेल.
  • 3 ते ४ वेलदोडे
  • २ ते 3 लवंग
  • पाव वाटी मोहरीची डाळ
  • चवीनुसार बडीशेप
  • दीड चमचा हळद
  • अर्धी वाटी गूळ
  • एक चमचा हिंग
  • पाव वाटी लसूण
  • 3 ते 4 चमचे  लाल तिखट
  • अर्धा चमचा साखर 
  • २ चमचा मेथीचे दाणे                                                                                                                                           
  • Indian Food : खमंग बेसणाचे लाडू कसे तयार कराल?

कृती -Pickle

१) ज्या दिवशी लोणचं घालणार आहात, त्याच्या आदल्या दिवशी वेलदोडे, लवंग, दालचिनी, काळी मिरी, मेथ्या मिक्सरला वाटून घ्या, वाटून घेताना ते जास्त बारीक होणार नाहीत याची काळजी घ्या. 

२) हे मिश्रण रात्रभर चांगले मुरु द्या. 

३) त्याच्या दूसऱ्या दिवशी केैऱ्या धुवून मध्यम आकारात कापून घ्या.

४) थोडावेळ मोकळ्या जागेत ठेवा जेणेकरुन त्या कोरड्या होतील. 

५) कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आदल्या दिवशी केलेले वेलदोडे, लवंग, दालचिनी, काळे मिरे, मेथ्या यांच मिश्रण घाला.

६) त्यानंतर हळद, हिंग, तिखट, साखर घालून मिश्रण परतून घ्या. थोड्यावेळाने  गॅस बंद करुन घ्या.

७) हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये कैरीच्या फोडी घालून घ्या.

८) चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा ते सर्व हलवून घ्या. मसाला सर्व कैरींना लागेल याची काळजी घ्या.

९) थोड्यावेळाने तेल तापत ठेवा आणि कडकडीत गरम करून घ्या. ते तेल थंड झाल्यावर
 लोणच्यात घाला.
१०) जर लोणचं भरपूर दिवस टिकवायचं असेल तर कैरीच्या मिश्रणात तेल अधिक घाला.  कारण तेलामुळे लोणच्याला बूरशी लागू शकत नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button