Food In Summer : उन्हाळ्यात काय खावे आणि काय खावू नये | पुढारी

Food In Summer : उन्हाळ्यात काय खावे आणि काय खावू नये

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडाक्याचे ऊन आणि अंगाची होणारी लाही-लाही, यामुळे उन्हाळ्यात जीव कासावीस होऊन जातो. या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाणही खूप वाढते. त्यामुळे भूक मंदावते आणि ओबड-धोबड खाण्यात आल्याने पचन क्षमताही बिघडते. म्हणून या असह्य उन्हाळ्यात शरीराला थंडावा देईल असा, योग्य व संतुलित आहार घेणे गरजेचे ठरते.  या दिवसांमध्‍ये आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी नक्की करा…

हे खावे ?

  • उन्हाळ्याच्या दिवसात ताजे, पचायला हलके असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
  • या दिवसात कलिंगड, संत्री, मोसंबी, द्राक्ष, अननस, सफरचंद ही हंगामी फळे किंवा शक्य झाल्यास याचा ताजा ज्यूस घ्यावा.
  • लिंबू पाणी, ताक, शहाळे, नाचणीची आंबील, कैरीचे पन्हं यांचेही सेवन करावे.
  • आहारात हिरव्या भाज्या, ज्वारी, नाचणी, कडधान्ये, वरणभात या हलक्या पदार्थांचा समावेश करावा.
  • आहारात दूध, तूप, दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा.
  • कांदा, काकडी, गाजर, पुदिना, कलिंगड या ग्रीनरेड सॅलेडचा आहारात समावेश करावा.

हे खाणे टाळावे ?

  • अति तेलकट, तिखट, फास्टफूड पदार्थ टाळावेत कारण यामुळे पित्त, अपचन, गॅसचा त्रास होऊ शकतो.
  • शीतपेयं (कोल्ड्रिंग्स)  घेणे टाळा.
  • मासे, अंडी, मांसाहाराचे प्रमाण कमी असावे.
  • आहारात  तळलेले पदार्थ, लोणचे, चटण्या खाणे टाळावे.
  • आहारात अति उष्ण पदार्थाचे सेवन करणे टाळा.
  • बाहेरचे आणि अति थंड पाणी पिणे टाळा.
  • चहा-कॉफीचे सेवन शक्य झाल्यास टाळा.
  • मद्यपान आणि धुम्रपान करू नका.

हेही वाचलं का?

पाहा व्हिडीओ :

 

Back to top button