Ronaldo World Record : रोनाल्डो रचणार इतिहास! घानाविरुद्ध गोल करताच होणार विश्वविक्रम | पुढारी

Ronaldo World Record : रोनाल्डो रचणार इतिहास! घानाविरुद्ध गोल करताच होणार विश्वविक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ronaldo World Record : फिफा विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (cristiano ronaldo) पोर्तुगाल संघ (portugal football) आणि आफ्रिकेतील घाना संघ आमने-सामने येतील. दरम्यान, या सामन्यात सर्वांच्या नजरा सुपरस्टार फॉरवर्ड रोनाल्डो अर्थात CR7 वर असतील यात शंका नाही. अशातच आजच्या सामन्यात त्याला एक ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी चालून आली आहे. रोनाल्डोने घानाविरुद्ध गोल केल्यास पाच वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरेल.

आज रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ घानाविरुद्धच्या सामन्याने आपल्या कतार विश्वचषक स्पर्धेच्या (qatar fifa world cup 2022) मोहिमेची सुरुवात करत आहे. तो कतारमध्ये संघाच्या सराव शिबिरात आहे. अशातच मंगळवारी त्याने फुटबॉल जगताला हादरा दिला. रोनाल्डोने परस्पर संमतीने मँचेस्टर युनायटेडला (manchester united) सोडचिठ्ठी दिली. 37 वर्षीय रोनाल्डो त्याच्या कार्किर्दीतील पाचवी विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. कदाचित ही विश्वचषक स्पर्धा त्याची शेवटची स्पर्धा असेल असे मानले जात आहे. (Ronaldo World Record portugal footballer cristiano ronaldo can become first player to score a goal in five fifa world cup)

विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी पोर्तुगालचा संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. प्रशिक्षक फर्नांडो सँटोसच्या पोर्तुगीज संघात आक्रमण आणि मिडफिल्डमध्ये कौशल्यपूर्ण बदल केले आहेत. 2016 मध्ये त्यांनी युरोपियन चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकण्यात मोठी भूमिका बजावली होती. दरम्यान, मँचेस्टर युनायटेडसोबत सुरू असलेल्या वादाचा संघाच्या विश्वचषक मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे रोनाल्डोने स्पष्ट केले आहे. (Ronaldo World Record portugal footballer cristiano ronaldo can become first player to score a goal in five fifa world cup)

दुसरीकडे, घानाच्या संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. त्यांचे प्रमुख खेळाडू जायबंदी असल्याने मैदानात उतरणार नसल्याचे समजते आहे. पण रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ घानाला हलक्यात घेणार नाही. कारण हा संघ मोठा अपसेट करण्यात माहिर आहे. मिडफिल्डर जॉर्डन आय्यूच्या आक्रमक कामगिरीवर घानाचा विश्वास असेल. सौदी अरेबियाने मंगळवारी अर्जेंटिनाचा तर बुधवारी जपाने जर्मनीचा पराभव करून या स्पर्धेत काहीही शक्य आहे हे दाखवून दिले आहे.

Back to top button