कफिंग सीझन : रुजतो आहे डेटिंग करण्याचा नवा फंडा | पुढारी

कफिंग सीझन : रुजतो आहे डेटिंग करण्याचा नवा फंडा

पुढारी ऑनलाईन: डेटिंगचं जग खूप मनोरंजक आहे. जिथे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करतो. एकाकीपणाचा त्रास कोणत्याही ऋतूत होत असला तरी हिवाळ्यात जास्त होत असतो. हिवाळ्यात आपल्याला असे वाटते की, आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे, ज्याच्याशी आपण प्रेमाने बोलू शकतो. ज्याच्या बरोबर बसून गोड गोड गप्पा मारता येतील. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का ? की, हे फक्त हिवाळ्यातच का होते?

यांचं कारण आहे कफिंग सीझन. हिवाळ्याला कफिंग सीझन म्हणतात आणि तो सप्टेंबरपासून सुरू होतो. आधुनिक डेटिंगच्या जगात या शब्दाला खूप महत्त्व आहे. हिवाळा हा कफिंग सीझन का आहे, याबद्दल सविस्तर चर्चा करू.

कफिंग सीझन म्हणजे काय?

हिवाळा हा कफिंग सीझन म्हणून ओळखला जातो. यामध्ये लोक थंडीच्या महिन्यामध्ये आणि सुट्यांमध्ये जोडीदार शोधतात. याला सामान्य भाषेत हुक अप सीझन असेही म्हणता येईल. ‘डन विथ डेटिंग: 7 स्टेप्स टू फाईंडिंग युवर पर्सन’ या पुस्तकाच्या लेखिका समंथा बर्न्स यांनी लिहिले आहे की, हिवाळ्याच्या या सीझनमध्ये आपण अशा व्यक्तीला शोधत असतो की, ज्याच्या सोबत काही काळ व्यतीत करून एकटेपणावर मात केली जाईल.

कफिंग सीझन  ही अशी वेळ आहे की, प्रासंगिक डेटिंग गंभीर नातेसंबंधात बदलू शकते. यामध्ये अनेकजण अनोळखी व्यक्तींना पुन्हा पुन्हा भेटण्याऐवजी त्याच व्यक्तीला भेटणे पसंत करतात.

लोकांना हिवाळ्यात जोडीदाराची जास्त गरज असते.

हिवाळ्यात लोकांना जास्त चिडचिड वाटते आणि त्याच वेळी ते हिवाळ्यातील नैराश्यालाही बळी पडतात . हीच वेळ असते जेव्हा आपल्याला कोणाच्या तरी सहवासाची गरज भासते. अमेरिकेतील एका डेटिंग अॅपच्या सर्वेक्षणानुसार, जवळपास निम्म्या अविवाहित लोकांचा असा विश्वास आहे की त्यांना हिवाळ्यात डेट करण्याची गरज वाटते.

या ऋतूत लोकांना एकटे राहायचे नाही, असे सर्वेक्षणाच्या निकालातून समोर आले आहे. तथापि, कफिंग सीझनमध्ये फुलणारी नाती नेहमीच गंभीर असतात असे नाही, परंतु या काळात ते गंभीर असल्याचे दिसून येते.

कफिंग सीझनचा असाही एक रंग…

यावेळी लोक जोडीदार शोधण्यासाठी अधिक आतुर असतात आणि हा सीझन एक प्रकारे नकारात्मकताही दाखवतो. हिवाळ्यात तापमानात घट झाली की मूड बदलतात आणि शरीरातील मेलाटोनिन आणि सेरोटोनिन सारख्या रसायनांमध्ये चढ-उतार होतात. ( जर तुम्ही बराच वेळ शारीरिक संबंध ठेवला नाही तर काय होईल )

आपल्या शारीरिक गरजा आपल्याला सांगतात की आपण एखाद्याला मिठी मारली पाहिजे आणि एकटे राहू नये.

कफिंग सीझनमध्ये डेटिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा

आपण नातेसंबंधात काय शोधत आहात याचा विचार करा.

तुम्हाला दीर्घकालीन नातेसंबंध हवे आहेत की अल्पकालीन नातेसंबंध हे समजले पाहिजे.

तुमच्या जोडीदाराला तुमच्या नात्याबद्दल काय हवे आहे ते स्पष्टपणे सांगा. अनेक वेळा आपली गरज पूर्ण करण्यासाठी जोडीदाराला सत्य सांगता येत नाही.

जर तुम्ही या सीझनमध्ये डेटिंगला सुरुवात केली असेल तर लांब योजना बनवू नका.

सुट्टी आणि हिवाळ्यासाठी योजना आधीच ठरवा. सुट्टीत कसे भेटायचे, कुठे भेटायचे आणि काय करायचे.

भावनिक आणि शारीरिक सीमा योग्यरित्या सेट करा.

गरज पूर्ण झाल्यानंतर एखाद्याला एकाच वेळी सोडू नका. नात्यातील प्रतिष्ठा जपा.

कफिंग सीझनमध्ये तुम्हाला नैराश्यासारखी लक्षणे देखील जाणवू शकतात, परंतु ती फार काळ टिकणार नाहीत. थोडे काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच कफिंग सीझनचा आनंद पुरेपूर  घेता  येण शक्य आहे.

Back to top button