पुढारी ऑनलाईन: Gmail ने यूजर्सच्या काही समस्या लक्षात घेत, Gmail डॅशबोर्डमध्ये (New feature) वेळोवेळी बदल केले आहेत. तुम्हाला हवी असणारी माहिती शोधण्यासाठी नवीन बदल यूजर्सना अधिक फायदेशीर ठरणार आहे. Gmail च्या साईड पॅनेलमध्ये इनबॉक्स, स्टाररीड, स्नूझड, सेंट, ड्राफ्ट यांसारख्या विभागांचा समावेश असतोच; पण आता तुम्हाला गुगल सर्च इंजिन सारख्या अनेक गोष्टी Gmail वर शोधता येणार आहेत. कारण जीमेलवर आता sort and filter हे search results फिचर जीमेलकडून लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Gmail वरील या नवीन फीचरमुळे तुमचा सर्चजर्नी आणखी सोपी होणार आहे. यामध्ये Gmail डॅशबोर्डवर (New feature) डाव्या कोपऱ्यात तीन आडव्या रेषांवर क्लिक केले असता, तुमच्या मेलवर आलेली माहिती ही वेगवेगळ्या भागांमध्ये विभागली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही मेल, मेसेज, स्पेस, अनरिड, ॲटॅचमेंट, ईमेल, डॉक्युमेंट, स्प्रेडशीट यासारखी माहिती संबंधित विभागात जाऊन शोधू शकणार आहात.
Gmail वरील हे नवीन फिचर तुम्हाला अधिक फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही पाठवलेला मेसेज परत घेण्यासाठी तुम्हाला ३० सेकंद मिळणार आहेत. यामुळे तुमच्याकडून चुकीचा मेसेज सेंट होण्यापूर्वीच तुम्ही तो ३० सेकंदापर्यंत (New feature) पाहू शकणार आहात. यामुळे तुमच्याकडून एखादी चूक होत असेल तर ती टाळली जाऊ शकते.