व्हॉट्स ॲप : आता Whatapp ग्रुपमधून व्हा चुपचाप ‘एक्झिट’

हॉटस्अ‍ॅप
हॉटस्अ‍ॅप
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Whatsapp ने काही दिवसापूर्वी कम्युनिटी फीचरची माहिती देताना, आता तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप चुपचाप सोडू शकत असल्याच्या क्षमतेची घोषणा केली होती. Whatsapp आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर टेस्ट करत आहे. ज्यामध्ये यूजर्स कोणत्याही ग्रुपमधून सहज चूपचापपणे बाहेर पडू शकतो. सध्या कोणीही व्हॉट्सॲप यूजर ग्रुपमधून एक्झिट (Exit) करतो, तेव्हा ग्रुपमधील अन्य मेंबर्सना याची माहिती होते; परंतु, नवीन फीचर आल्यानंतर हे होणार नाही. इन्स्टंट मेसेजिंग ॲपच्या नवीन बदलामुळे लोकांना कोणताही संकोच न करता ग्रुप सोडण्याची संधी मिळणार आहे. अनेक लोकांसाठी हे निश्चितपणे सुलभ वैशिष्ट्य ठरू शकते.

WABetaInfo ने शेअर केलेल्या एका स्क्रीनशॉटमध्ये, इन्स्टंट मेसेजिंग ॲप ग्रुपमधून बाहेर पडताना, यूजर्संला आणि ग्रुपच्या ॲडमिनला त्याच्या बाहेर पडण्याची सूचना दिली जाईल. याचा अर्थ व्हॉट्सॲप ग्रुपमधील इतर सदस्यांना ग्रुप सोडल्याचे कोणतीच कल्पना येणार नाही किंवा समजणारही नाही.

कंपनीने दिलेल्‍या माहितीनुसार, सध्या जेव्हा एखादा यूजर्स व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडतो, तेव्हा WhatsApp ऑटो-जेनरेटेड नोटिफिकेशन दाखवते. ही माहिती त्या ग्रुपच्या सर्व सदस्यांना तसेच ॲडमिनला दिसते. काही दिवसापूर्वी व्हॉट्स ॲपने आपल्या कम्युनिटी फीचरबद्दल माहिती देताना, चुपचाप, शांतपणे ग्रुप सोडण्याची क्षमता जाहीर केली होती. मात्र हे फीचर यूजर्ससाठी नेमके कधी उपलब्ध होईल, याचा नेमका तपशील अद्यापही समोर आलेला नाही. WABetaInfo अहवालात म्हटले आहे की, त्याने शेअर केलेला स्क्रीनशॉट अलीकडील WhatsApp Desktop बीटावरून घेतलेला आहे. तथापि, हा बदल Android आणि iOS आवृत्तीसाठी देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲप युजर्समधील संवाद वाढवण्यासाठी WhatsApp Group कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात येत आहे. WhatsApp Group सदस्यांची मर्यादा वाढवून २५६ वरून ५१२ सदस्यांपर्यंत करण्याची घोषणा केली आहे. तसेच प्रतिक्रिया देताना मजकूर टाईप करण्याऐवजी  इमोजीचा वापर करत ग्रुपवरील मेसेजेसवर प्रतिक्रिया देण्याची क्षमता व्हॉट्स ॲपपमध्ये जोडण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news