कप ऑफ टी | पुढारी | पुढारी

कप ऑफ टी | पुढारी

हाय फ्रेंडस्, 
कभी कभी तुम्हाला असे वाटते का? की कुछ करके दिखाना है. पण काय करावे हेच कळत नाही, किंवा तशी राह सापडत नाही. तर त्यासाठी एक चांगली आयडीया आहे. यामध्ये तुम्ही जे कुछ  कराल त्यामध्ये कोणाचे तरी आयुष्य बदलणारे असेल. कोणाला तरी शिकण्याची, लाईफ जगण्याची एक दिशा मिळून जाईल. 

तुम्ही ‘कप ऑफ टी’ शॉर्टफिल्म पाहिली असेलच. या फिल्ममध्ये हेच सूचित केले आहे की कोणीतरी तुमची वाट पहातंय, त्यांना तुमच्याकडून काही तरी हवे आहे. शिकण्याची त्यांची इच्छा आहे पण कोणीतरी त्यांचे बोट पकडून त्यांना लिहायला शिकवायचे आहे. शिक्षणाबद्दलचा अवेअरनेस जागृत करणारी ही अतिशय कल्पकतेने मांडलेली शॉर्ट फिल्म आहे. या फिल्मने राष्ट्रीय पारितोषिकही पटकावले आहे.

फ्रेंडस्, अजूनही काही खेड्यात, वाडीवस्तीत अनेक बालके शिक्षणापासून वंचित आहेत. ज्ञानाच्या बाबतीत त्यांची पाटी कोरीच आहे. शाळा, अभ्यास याच्याशी त्यांचा दूरदूरचा संबंध नाही. दोन्हीवेळच्या पोट भरण्याची तजवीज करणे म्हणजेच आयुष्य जगणे एवढीच  जगण्याची व्याख्या त्यांच्या पालकांनी त्यांना शिकवली आहे. शाळा म्हणजे काय हेही त्यांना कोणी शिकवले नाही. म्हणूनच तुम्ही तुमच्या फावल्या वेळात अशा मुलांना शोधून त्यांना किमान लिहण्या, वाचण्यापुरते ज्ञान द्यायचे आहे. 

वाडीवस्तीवरच नव्हे तर विटभट्ट्यांवर काम करणारी मुले, ऊसतोड कामगारांची मुले. एवढेच नव्हे तर मोठमोठ्या शहरांमध्येही हातात भांडे घेवून किंवा हात पसरून जगण्यासाठी भिक मागणार्‍या बालकांच्या हातात पाटी, पेन्सिल देवून त्यांना गिरवायला शिकवले तर त्यांच्या आयुष्यात बदल घडू शकेल. भले ती मुले शाळेत जाऊ शकली नाहीत तरी लिहू, वाचू शकली तरी त्यातून ज्ञान मिळवू शकतील.

जी मुले शाळेत जावूच शकत नाहीत त्यांच्यासाठी तुम्हीच टिचर बना. जसे तुम्ही तुमच्या कुवतीनुसार एखाद्या गरीब, अनाथ मुलांना आर्थिक मदत करत असालच. तुम्हाला अशीच एक हेल्प करायची आहे. ज्यांच्या आयुष्यात ज्ञानाचे एखादेही किरण पडलेले नाही त्यांच्या आयुष्यात तुम्ही ज्ञानाचा प्रकाश पाडायचा आहे. यातून तुम्हाला काय मिळेल ? तर तुम्ही कोणाचे तरी आयुष्य उजळू पहात आहात हे फार मोठे समाधान नक्‍कीच मिळेल. 

फावल्या वेळात तुम्ही ट्रिपविपला जात असाल तर आता एवढंच करा तुमच्या ट्रिपच्या प्लॅनिंगमध्ये हा एक शैक्षणिक कार्यक्रम अ‍ॅड करा. ज्ञानगंगा वाहत ठेवा… यासाठी अज्ञान, निरागस डोळे तुमची वाट पहात असतील. त्यांना अक्षरांचा गंध कळू द्या. मग आहात का तयार?

– प्रतिभा राजे

Back to top button