धनु :ऑक्टोबरपर्यंतचा कालखंड प्रगतीसाठी अनुकूल | पुढारी

धनु :ऑक्टोबरपर्यंतचा कालखंड प्रगतीसाठी अनुकूल

धनु ही अग्नितत्त्वाची व द्विस्वभाव रास आहे. साधूसंत, ऋषी, मुनी, सत्पुरूष, आचार्य, महान योगी या पुरुषांची ही रास आहे. चारित्र्यसंपन्नता, निरलसपणे, नि:स्वार्थीपणे कोणत्याही कार्याला वाहून घेणे हे धनु राशीचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर प्रामाणिकपणा, सुसंस्कृतपणा, सभ्यता, परोपकारीता या राशीचे वैशिष्ट्य आहे. अनेक मोठमोठ्या धार्मिक, आध्यात्मिक संस्थेमध्ये निर्मळपणाने काम करणार्‍या व्यक्ती या धनु राशीच्या असतात. निष्कपट व निर्मळ स्वभावाबद्दल आपण प्रसिद्ध असता. यामुळे आपले सर्वत्र स्वागत होत असते. व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने अत्यंत प्रसन्न परंतु सौम्य, भारदस्त असे आपले व्यक्तिमत्त्व असते. तत्त्वाला चिकटून राहण्याचा, कसल्याही प्रसंगात आपले ध्येय न सोडण्याचा आपला स्वभाव असतो. आपण आपल्या मूल्यांशी, आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही. आपल्याकडे सुसंस्कृतता असते, सभ्यता असते.

आरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने धनु राशीच्या व्यक्तींना हे संपूर्ण वर्ष सर्वसाधारणपणे संमिश्र स्वरूपाचे राहणार आहे. शनी वर्षभर प्रथमस्थानात धनु राशीमध्ये आहे. त्यामुळे यावर्षी तुमच्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. काहींना व्यवसायातील कामाचा ताण व दगदग जाणवेल. मात्र, प्रथमस्थानाचा स्वामी गुरू दि. 11 ऑक्टोबर 2018 पर्यंत चांगला आहे. या कालखंडात आपणाला अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. 

दि. 12 ऑक्टोबर 2018 नंतरच्या कालखंडात मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या कालखंडात मानसिक अस्वास्थ्य जाणवण्याची शक्यता आहे. या कालखंडात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

०६ फेब्रुवारी ते १ मार्च, २५ मे ते २५ जून, ०२ सप्टेंबर ते ११ आक्टोबर हे  कालखंड आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत.

०८ मार्च ते १७ मार्च, २८ मार्च ते ०१ मे या आरोग्याच्या दृष्टीने काहीसे प्रतिकूल ठरणार आहेत. त्यामुळे धनु राशीच्या व्यक्तींना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.

व्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती

व्यवसाय, व्यापार, उद्योग, कारखानदारी, धंदा या दृष्टीने धनु राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे जाणार आहे.  यावर्षी व्यवसायाकडे लक्ष देणे गरजेचे भासेल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यवसायातील व्याप वाढणार आहेत. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. आपणास व्यवसायात धाडस करताना खूपच विचार करावा लागेल. बाजारपेठेचा चौफेर अभ्यास केल्याशिवाय व्यवसायात धाडस टाळावे. काहीवेळा नुकसानीची  शक्यता आहे. मात्र, दैनंदिन आर्थिक व्यवहार चांगले चालणार आहेत. व्यवसायाची उलाढाल व्यवस्थित चालणार आहे.
दि. 11 ऑक्टोबर 2018 पर्यंतच्या कालखंडात  व्यवसायाची वाढ करू शकता. या कालखंडात आपण नवीन व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकता. यावर्षी कर्मचारी, गडी, नोकरचाकर यांचे चांगले सहकार्य लाभण्याच्या दृष्टीने दि. 12 ऑक्टोबर 2018 नंतरचा कालखंड चांगला आहे.  तुमचा दैनंदिन व्यवसाय सोडून किंवा दैनंदिन व्यवहार सोडून जादा धाडस किंवा जादा प्रयोग यावर्षात करू नयेत. फार मोठ्या यशाची अपेक्षा करण्यासारखे ग्रहमान नाही. 

28 जानेवारी ते १४ फेब्रुवारी, ०४ मार्च ते २४ मे, ०३ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर, ०६ आक्टोबर ते २६ आक्टोबर  हे  कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने व व्यवसायाच्या दृष्टीने चांगले आहेत.

०७ जानेवारी ते २७ जानेवारी, १५ फेब्रुवारी ते २ मार्च, २७ मे ते ०९ जून, १२ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालखंडात व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे.
तसेच हा कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने प्रतिकूल आहे.

नोकरी

धनु राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. नोकरीमध्ये चांगले वातावरण राहणार आहे. दि. 11 ऑक्टोबर 2018 पर्यंतच्या कालखंडात काहींना पगारवाढीची शक्यता आहे तर ज्यांना बदली हवी आहे त्यांनी प्रयत्न करण्यास हरकत नाही. वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. यावर्षी नोकरीतील आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. यावर्षी आपल्या अनुभवाचे, कष्टाचे व परिश्रमाचे चीज होणार आहे. आपल्याला पदोन्नती लाभेल, बढती लाभेल. जबाबदारीच्या जागेवर काम करण्याची संधी मिळेल. तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. धनु राशीच्या व्यक्तींना  नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत चांगले आहे. 

१४ जानेवारी १२ फेब्रुवारी, १५ मार्च ते १४ मे, १७ ऑगस्ट १६ सप्टेंबर, १८ आक्टोबर ते १६ नोव्हेंबर हे कालखंड नोकरीतील धनु राशीच्या व्यक्तींना प्रगतीचे, आर्थिक लाभाचे व सुयशाचे जाणार आहेत.
.
१ जानेवारी ते १३ जानेवारी, १५ जून ते १६ ऑगस्ट, १६ डिसेंबर ते ३१ डिेसेंबर हा कालखंड नोकरीतील व्यक्तींना प्रतिकूल जाण्याची शक्यता आहे. 

प्रॉपर्टी
धनु राशीच्या व्यक्तींना प्रॉपर्टी, गुंतवणूक या दृष्टीने हे वर्ष चांगले ठरणार आहे. विशेषत: दि. 11 ऑक्टोबर 2018 पर्यंतचा कालखंड अत्यंत सौख्यकारक, सुयशाचा, आपल्या वास्तूचे, घराचे, बंगल्याचे, फ्लॅटचे स्वप्न साकार करणारा असा आहेे. जागा खरेदी-विक्रीच्या दृष्टीने हा कालखंड अत्यंत चांगला आहे. तुमच्या राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील.  

दि. 12 ऑक्टोबर 2018 नंतरच्या कालखंडात मात्र प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे विलंबाने होतील. या कालखंडामध्ये तुमची कामे वेळेवर होणार नाहीत. प्रॉपर्टीच्या कामांमध्ये काही प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे या कालखंडाच्या आतच उरकून घ्यावीत. 

०२ मार्च ते २६ मार्च, ०५ जुलै ते १५ ऑगस्ट, ०२ सप्टेंबर ते ११ आक्टोंबर हे कालखंड> प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी चांगले आहेत.

२७ मार्च ते १९ एप्रिल  या कालखंडात प्रॉपर्टीच्या खरेदीची कामे करू नयेत. कारण त्यावेळी अडचणी येण्याची शक्यता आहे. खालील कालखंडात गुंतवणूक व प्रॉपर्टीची खरेदी या गोष्टी टाळाव्यात.

संततीसौख्य

संततिसौख्याच्या दृष्टीने धनु राशीच्या व्यक्तींना हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात समाधानकारक ठरणार आहे. मुलामुलींबरोबर सुसंवाद साधू शकाल. संततिसौख्य लाभणार आहे. मुलामुलींच्या विद्याभ्यासातील प्रगती समाधानकारक राहणार आहे. अभ्यासातील प्रगती चांगली राहणार आहे. परीक्षेत सुयश मिळणार आहे. शाळा, कॉलेजातील प्रवेशाचे प्रश्‍न मार्गी लागण्याच्या दृष्टीने दि. 11 ऑक्टोबर 2018 पर्यंतचा कालखंड चांगला आहे. या कालखंडात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश लाभेल. 

०१ जानेवारी ते १६ जानेवारी, १४ एप्रिल ते १४ मे, २७ मे ते २० जुलै, ०५ ऑगस्ट ते ११ आक्टोबर, २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.

१७ जानेवारी ते ०६ मार्च, ०८ मार्च ते ३० एप्रिल हा कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत. मुलामुलींच्या प्रगतीच्या आड काही प्रश्‍न निर्माण होवू शकतील.

विवाह / वैवाहिक सौख्य
विवाह, वैवाहिक सौख्य या दृष्टीने धनु राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे जाणार आहे. विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने दि. 11 ऑक्टोबर 2018 पर्यंतचा कालखंड चांगला आहे. या कालखंडात विवाहेच्छू मुलामुलींना अपेक्षित साथीदार मिळू शकेल.  दि. 11 ऑक्टोबर 2018 पर्यंतचा कालखंड हा वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने व विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने अत्यंत सुखकर आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. हे वर्ष सर्वकाही अलबेल असे असणार नाही. त्यामध्ये काहीवेळा अनारोेग्याचे प्रश्‍न असतील, छोटे छोटे मतभेद निर्माण होणार आहेत. काहीवेळा मतैक्य होणे अवघड जाणार आहे. 

२८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी, ०३ मे ते २६ मे, १० जून ते २५ जून ०३ सप्टेंबर ते २० आक्टोबर हे कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत.

१ जानेवारी १३ जानेवारी, ०८ मार्च ते ०१ एप्रिल, २७ मे ते ०९ जून, २७ आक्टोबर ते ०८ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरणार आहेत.

१५ फेब्रुवारी ते ०१ मार्च, २६ जून ते ३१ ऑगस्ट हा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे.

प्रवास

प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने हे वर्ष धनु राशीच्या व्यक्तींना चांगले आहे.  तीर्थयात्रेचे योग येतील. काहींना परदेश प्रवासाचे योग येतील. काहींना शिक्षण व उद्योग व्यवसाय या दृष्टीने परदेशाची संधी लाभेल. तीर्थयात्रेच्या दृष्टीने फार मोठे योग येणार आहेत. मात्र, साडेसाती असल्यामुळे प्रवासात पासपोर्ट हरवणार नाही, इतर मौल्यवान वस्तू गहाळ होणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी.

 १३ फेब्रुवारी ते ०६ मार्च, ०३ मे ते १४ मे, १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर हे कालखंड प्रवास, तीर्थयात्रा यादृष्टीने अनुकूल ठरतील.

०७ मार्च ते १७ मार्च, २९ मार्च ते २९ एप्रिल, ०९ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या कालखंडात प्रवास करताना काळजी घेण्याची गरज आहे. खालील कालखंडात आपल्या मौल्यवान वस्तू हरविणार नाहीत किंवा गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

सुसंधी / प्रसिद्धी व सुयश

सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने धनु राशीच्या व्यक्तींना हे  वर्ष विशेष समाधानकारक राहणार आहे.  तुम्हाला तुमच्या क्षेत्रात चांगली संधी लाभेल. गुरू दि. 11 ऑक्टोबर 2018 पर्यंत अनुकूल असल्यामुळे त्याचा लाभ धनु राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे. हा कालखंड आपणाला अत्यंत सौख्यकारक, सुयशाचा ठरणार आहे. यावर्षामध्ये तुम्ही आपल्या क्षेत्रात विशेष कामगिरी नोंदवू शकाल. 

तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. स्वप्ने व मनोरथ सिद्धीला जातील. तुमच्या आवडत्या क्षेत्रात, तुमच्या कलागुणांच्या क्षेत्रात तसेच कला, संगीत, नाट्य, साहित्य, प्रकाशन या क्षेत्रात तुम्ही असामान्य कामगिरीची नोंद करू शकाल. यावर्षी तुम्हाला अपेक्षित संधी लाभणार आहे. त्यामुळे सतत कार्यरत रहावे. साडेसातीमुळे काहीवेळा मनाची चलबिचलता होते. परंतु हातात आलेली संधी सोडू नये. 

२७ जानेवारी ते १० फेब्रुवारी, १४ मार्च ते १० मे, ०५ जुलै ते ३१ जुलै, ०३ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर, २७ सप्टेंबर ते ११ आक्टोबर हे कालखंड सुसंधी व प्रसिद्धीच्या दृष्टीने यशदायक आहेत. 

दि.०८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंडकलेच्या क्षेत्रातील व्यक्तींसाठी  यश देणारा आहे.

प्रतिष्ठा, मानसन्मान

प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने धनु राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे जाणार आहे. सहकार, राजकारण, समाजकारण, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्र, सार्वजनिक या सर्व क्षेत्रात आपण कार्यरत रहावे. हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. तरीसुद्धा दि. 11 ऑक्टोबर 2018 पर्यंत गुरू अनुकूल आहे. त्याचा फायदा करून घ्यावा. यावर्षी साडेसातीदेखील सुरू असल्यामुळे कोणतेही काम करताना आपण कोणत्या कटकटींमध्ये अडकत नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.   

तुम्हाला यावर्षी तुमच्या क्षेत्रात पद, प्रतिष्ठा, अधिकार लाभण्याच्या दृष्टीने कमी-अधिक प्रमाणात दि. 11 ऑक्टोबर 2018 पर्यंता कालखंड चांगला आहे. या कालखंडात मानसन्मानाचे योग येणार आहेत. आपणाला नावलौकिक लाभणार आहे.

१४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, १४ मार्च ते १४ मे, १७ ऑगस्ट ते ०४ ऑक्टोबर, १८ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर हे कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकारपद या दृष्टीने चांगले आहेत.

सारांश, धनु राशीच्या व्यक्तींना हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात संमिश्र स्वरूपाचे जाणार आहे. हे वर्ष फार मोठी अपेक्षा करण्यासारखे नाही. दि. 11 ऑक्टोबर 2018 पर्यंत गुरू अनुकूल आहे. या कालखंडात संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. या कालखंडात आपणाला गुरूबळ असल्यामुळे विवाहेच्छुंचे विवाह होण्याच्या दृष्टीने कालखंड अनुकूल आहे. या कालखंडात आपणाला सुसंधी लाभेल. प्रवास सुखकर होतील. परंतु आपणाला साडेसाती चालू आहे. याची नोंद आपल्या मनात असण्याची गरज आहे. साडेसातीमध्ये अनपेक्षितपणे अडचणी येतात. संकटे सांगून येत नाहीत. दि. 11 ऑक्टोबरपर्यंतचा कालखंड धनु व्यक्तींना अत्यंत चांगला आहे. या कालखंडापर्यंत आपण आपली सर्व आर्थिक कामे करून घ्यावीत. या कालखंडापर्यैंतचाच कालखंड विद्यार्थ्यांना चांगला आहे.संततिसौख्यासाठी चागंला आहे. वैवाहिक सौख्यासाठी चांगला आहे. प्रॉपर्टीसाठी चांगला आहे. प्रवासासाठी चांगला आहे. त्याचप्रमाणे जनसंपर्क, व्यवसायातील सुधारणा, प्रवास, नातेवाईकांचे सहकार्य, मित्रांचे सहकार्य या सर्व दृष्टीने हा कालखंड चांगला आहे. 
 

Back to top button