कन्या : आर्थिक सुयश आणि नोकरीत बढती | पुढारी

कन्या : आर्थिक सुयश आणि नोकरीत बढती

बुधाच्या अंमलाखालील ही रास असल्याने आपणाकडे ज्ञानाची जिज्ञासा आहे. तसेच कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्‍ती, तर्कशुद्ध विचारसरणी या गोष्टी आपणाकडे असतात. कल्पकता, शोधक बुद्धी, नवीन संशोधनाकडे कल, बुद्धि चातुर्य यामुळे विज्ञानात व संशोधनात अनेक कन्या व्यक्‍तींनी मोलाची भर टाकली आहे. आपण धोरणी व मुत्सद्दी आहात. आपल्याला अनेक भाषा येवू शकतात. कोणताही विषय आपल्याला अवघड नसतो. कोणत्याही कामात भावनेच्या भरात झोकून देण्याचा आपला स्वभाव नाही. आपणाकडे हजरजबाबीपणा, वाक्चातुर्य, दूरदर्शीपणा हे गुण निसर्गत: असतात. 

sadआरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वसामान्य जाणार आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी आपल्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. वाढत्या व्यवसायाचा आरोग्यावरही ताण जाणवून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्याबद्दल कोणत्याही तक्रारी जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्‍ला घेणे महत्त्वाचे आहे. गुरू धनस्थानात तुळ या राशीत प्रवेश करत आहे व यावेळी शनी चतुर्थस्थानात धनु या राशीत असल्यामुळे शनीची आरोग्य स्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे यावर्षी काहींना व्यवसायातील किंवा नोकरीतील कामाचा ताण व दगदग जाणवण्याची शक्यता आहे. या कालखंडात जेवढे शांत व संयमी राहता येईल तेवढे शांत रहावे. १ जानेवारी ते ६ जानेवारी, २८जानेवारी ते १४ फेब्रुवारी, ४ मार्च ते १७ मार्च, ४ एप्रिल ते ४ मे, २७ मे ते ९ जून, २८ जून ते ३० ऑगस्ट, ६ ऑक्टोबर ते २२ डिसेंबर हा  कालखंड आरोग्याच्या दृष्टीने चांगला जाईल. तर, ७ जानेवारी ते २७ जानेवारी, १५ फेब्रुवारी ते २ मार्च, ३ सप्टेबर ते १८ सप्टेबर, २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडात आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप, जबाबदारी यामुळे दगदग वाढण्याची शक्यता आहे. खालील कालखंडात आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

sadव्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
कन्या राशीच्या व्यक्‍तींना व्यवसाय, उद्योग या दृष्टीने हे वर्ष सर्वसाधारण ठरणार आहे.  गुरू अनुकूल आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत गुरू धनस्थानात आहे व या गुरूची व्यवसायाच्या स्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे व्यवसायाच्या उलाढालीकडे लक्ष देवू शकाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. १२ ऑक्टोबरनंतर व्यवसायानिमित्त प्रवास घडतील. तुमच्या कर्तृत्त्वाला अपेक्षित संधी लाभेल. व्यवसायात काही चांगल्या गोष्टी घडतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायाच्या दृष्टीने नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. २८ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, ४ मार्च ते १३ मार्च, २५ एप्रिल ते ८ मे, २७ मे ते ९ जून, २८ जून ते १ सप्टेबर, १० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर, २६ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हा  कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले आहेत. ८ जानेवारी ते २६ जानेवारी, १६ फेब्रुवारी ते १ मार्च, ३ सप्टेबर ते १९ सप्टेबर हा कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत.

laughनोकरी
नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष अत्यंत चांगले ठरणार आहे. नोकरीत वातावरण चांगले राहील. प्रगतीला पोषक राहील. यावर्षी बदलीची शक्यता नाही. मात्र, बढतीसाठी आपणाला ११ ऑक्टोबरपर्यंतचा कालखंड चांगला आहे. या कालखंडात तुमच्या पगारवाढीची शक्यता आहे. तुम्हाला वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार आहे. यावर्षीच्या तुमच्या कामाचा, तुमच्या कर्तृत्त्वाचा व तुमच्या कार्याचा आढावा घेवून त्याचा फायदा तुम्हाला यावर्षी होणार आहे. शत्रुपिडा नाही. विरोधक तुम्हाला त्रास देवू शकणार नाहीत. हितशत्रुंच्या कारवाया थंड पडतील. १२ ऑक्टोबरनंतरच्या कालखंडामध्ये तुम्हाला नोकरीच्या संदर्भात नवीन संधी मिळतील. या संधीचा आपण फायदा करून घेतल्यास आपणाला यश लाभेल. १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, १५ मार्च ते १३ एप्रिल, १६ मे ते १४ जून, १७ जुलै ते १५ ऑगस्ट, तर १८ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर हा कालखंड नोकरीतील व्यक्‍तींना चांगले आहेत. १ जानेवारी ते १२ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १३ मार्च, १४ एप्रिल ते १५ मे, १९ ऑगस्ट ते १६ ऑक्टोबर, १७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडात वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

laughप्रॉपर्टी
प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या दृष्टीने हे वर्ष कन्या व्यक्‍तीला चांगले जाणार आहे. प्रॉपर्टी, गुंतवणूक, घर, गाडी, बंगला, जागा, जमिनी, वाहन खरेदी या सर्व दृष्टीने कन्या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक आहे.  जागा, जमिनी, प्रॉपर्टी, गुंतवणूक या दृष्टीने तसेच राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे वरील कालखंडात प्रश्‍न सुटतील. ८ मार्च ते २ मे या कालखंडात मात्र महत्त्वाचे प्रॉपर्टीचे निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे महत्त्वाचे आहे. या कालखंडामध्ये प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात काही प्रश्‍न निर्माण होवू शकतात. २ मे ते १५ मे, २ सप्टेबर ते ७ नोव्हेंबर या कालखंड जागा, जमिनी, वाहन खरेदी, गुंतवणुकीसाठी चांगले आहेत. ८ मार्च ते २ मे या कालखंडात प्रॉपर्टीचे व्यवहार कटाक्षाने टाळावेत.

surpriseसंततीसौख्य
संततिसौख्य, मुलामुलींची प्रगती, शैक्षणिक यश, मुलामुलींचे विवाह या सर्व दृष्टीने कन्या राशीच्या व्यक्‍तींनहा हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे जाणार आहे. परीक्षांच्या संदर्भात मुलामुलींना जास्त परिश्रम करावे लागणार आहे. मुलामुलींच्या शाळा, कॉलेजच्या प्रवेशाचे प्रश्‍न विलंबिाने सुटतील. विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना सुयश मिळण्यासाठी अधिक अभ्यास करावा लागणार आहे. शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे राहणार आहे. मुलामुलींचे नोकरीचे प्रश्‍न सुटतील. मुलामुलींना ११ ऑक्टोबरनंतर अपेक्षित कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. त्यांच्या कर्तृत्त्वाला, कर्तबगारीला वाव मिळणार आहे. ९ मार्च ते २ हा कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. वरील कालखंडात मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक व मुलामुलींच्या संमतीने घ्यावेत. सर्वसामान्यपणे ३ मे ते ५ नोव्हेंबर हा कालखंड मुलामुलींच्या कॉलेजचे प्रश्‍न सुटण्यासाठी चांगला आहे.  
१७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, १८ मार्च ते ३० मार्च, १० मे ते १६ जून, ७ जुलै ते ८ ऑगस्ट, ३९ सप्टेबर ते ५ नोव्हेंबर या कालखंड संततीसौख्याच्या दृष्टीने यशदायक व सौख्यकारक आहेत. १ जानेवारी ते १४ जानेवारी, ८ मार्च ते १७ मार्च, ८ एप्रिल ते २ मे हा कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरणार आहेत. यामध्ये मुलामुलींचे आरोग्य बिघडू शकतो, त्यांच्या क्षेत्रात अडचणी निर्माण होवू शकतात. अभ्यासातील एकाग्रता कमी होऊ शकते. 

विवाह / वैवाहिक सौख्य
वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने व विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्‍तींना चांगले आहे. विवाहाला जे गुरूबळ लागते ते गुरूबळ वर्षभर आहे. यावर्षी गुरू द्वितीय व तृतीय स्थानात आहे. यावर्षी आपण कुटुंबातील महत्त्वाचे प्रश्‍न सोडवू शकाल. कौटुंबिक सौख्य व समाधान लाभेल. १२ ऑक्टोबरनंतरचा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला जाणार आहे. या कालखंडात विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची जास्त शक्यता आहे. सामान्यत: संपूर्ण वर्ष कन्या राशीच्या व्यक्‍तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगले आहे. २ मार्च ते २६ मार्च, ३ मे ते ३ जून, २० जून ते ४ जुलै, ३ सप्टेबर ते ८ नोव्हेंबर आणि २४ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने व विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने चांगला आहे. ६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालखंडात वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

smileyप्रवास
प्रवासाच्या दृष्टीने हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्‍तींना समाधानकारक ठरणार आहे. सहलीचे योग येतील. तीर्थयात्रेचे योग येतील. काहींना परदेश प्रवासाचे योग येतील. शिक्षणासाठी, उद्योगासाठी, व्यवसायासाठी परदेश प्रवासाचे योग येवू शकतात. प्रवास सुखकर होणार आहेत. प्रवासात ऐनवेळी विघ्न येणार नाही. मात्र, ८ मार्च २ मे या कालखंडात प्रवासामध्ये काळजी घ्यावी लागणार आहे. २१ जानेवारी ते ६ मार्च, २ मे ते २० मे, १२ जून ते १७ जुलै, २० ऑगस्ट ते १८ सप्टेबर आणि ११ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड प्रवासाच्या दृष्टीने चांगले आहेत. ९ मार्च ते १७ मार्च आणि एक एप्रिल ते २ मे या कालखंडात प्रवासात त्रास होवू शकतो. वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्यता आहे. प्रवासात अनपेक्षितपणे त्रास होवू शकतो. 

smileyसुसंधी / प्रसिद्धी व सुयश
सुसंधी, प्रसिद्धी, नावलौकीक या दृष्टीने कन्या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. तुम्हाला नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. तुम्ही ज्या संधीची वाट पहात आहात ती संधी यावर्षी प्राप्‍त होणार आहे. एका नव्या वर्तुळात, एका नवीन जगात तुमचा प्रवेश होईल. तुम्हाला मिळालेल्या संधीचे तुम्ही सोने करू शकाल. यावर्षी तुम्हाला सुसंधी मिळणार आहे, प्रसिद्धी मिळणार आहे. विशेषत: १२ ऑक्टोबर २०१८ नंतरचा कालखंड हा सुसंधीच्या दृष्टीने अत्यंत चांगला जाणार आहे. तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. नवा रस्ता दिसेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. नवे स्नेहसंबंध जुळतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.  कला, संगीत, नाट्य, लेखन, प्रकाशन, चित्रकला, चित्रपट या सर्व क्षेत्रात तुम्हाला गौरीशंकरासारखे यश लाभेल. हे वर्ष संधी प्राप्‍त होण्याच्या दृष्टीने, लेखनाचे प्रकाशन होण्याच्या दृष्टीने किंवा चित्रपट, विविध प्रसारमाध्यमे व तुमच्या सर्व कला या सर्व ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्हाला अनेकांचे सहकार्य लाभेल. १७ जानेवारी ते ७ मार्च, २० एप्रिल ते १४ मे, २७ मे ते २० जून, १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट, ११ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर, १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड सुसंधीच्या दृष्टीने चांगला आहे.

laughमानसन्मान, प्रतिष्ठा
मानसन्मान, प्रतिष्ठा या दृष्टीने हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्‍तींना चांगले जाणार आहे. विशेषत: ११ ऑक्टोबरपर्यंतचा कालखंड सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होण्याच्या दृष्टीने तसेच मानसन्मान व प्रतिष्ठा लाभण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. जे पद, अधिकार मिळणार आहे त्याची तयारी आपणास यावर्षात करता येईल. यावर्षी सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला विशेष अनुभव मिळणार आहे. नवीन अनुभव मिळतील. हे वर्ष तुमचे ज्ञानार्जनाचे आहे. नवनवीन अनुभव मिळतील, ज्ञान मिळेल. तुम्हाला सार्वजनिक, सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रामध्ये पद, अधिकारपद, मानमान्यता, कीर्ती, यश सर्वकाही लाभेल. मात्र, त्यासाठी काही काळ थांबावे लागेल. यावर्षी तुमची पावले योग्य मार्गाने पडणार आहेत. तुमची दिशा योग्य असणार आहे. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरणार आहेत. तेव्हा हे वर्ष भावीकाळाच्या यशाचा पाया म्हणून समजावे लागेल. १५ मे ते २० जून आणि १८ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालखंडात आपणाला प्रतिष्ठा, पद लाभेल. १ जानेवारी ते १२ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १४ मार्च, २५ मार्च ते एक मे या कालखंडात आपल्या मानसन्मान, प्रतिष्ठेला धक्‍का लागणार नाही याची काळजी घ्यावी. 

 

smileyसारांश

कन्या राशीच्या व्यक्‍तींवर यावर्षी जबाबदारीचे प्रमाण राहणार आहे. व्यवसायातील उलाढाल वाढणार आहे. व्यवसायातील उलाढालीचा व जबाबदारीचे प्रमाण वाढल्यामुळे काहींना कामाचा ताण व दगदग जाणवण्याची शक्यता आहे. जीवनात वैचारिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक अनुकूल बदल होतील. आर्थिक लाभ, व्यवसाय यापेक्षा भावनेच्या अंगाने, बौद्धिक अंगाने हे वर्ष चांगले आहे. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आनंदाचे आहे. मुलामुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने वर्षाचा उत्तरार्ध चांगला आहे. या कालखंडात त्यांना सुयश लाभेल. त्यांचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्‍न मार्गी लागतील. विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह जमतील. तीर्थयात्रेचे, परदेश प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. कन्या व्यक्‍तींना हे वर्ष आर्थिक लाभाच्या द‍ृष्टीने अत्यंत चांगले आहे. यावर्षी आपण व्यवसायाकडे अधिक लक्ष द्यावे व आर्थिक प्रश्‍नाकडे लक्ष केंद्रीत करावे. नोकरीतही बढती लाभणार आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभणार आहे. सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात एखादे पद, अधिकार मिळेल. ११ ऑक्टोबरनंतरचा कालखंड हा विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने व वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे तसेच तीर्थयात्रा व परदेश प्रवास यासाठीही चांगला आहे.

Back to top button