कुंभ : सर्व दृष्टीने असामान्य यशाचे व प्रगतीचे वर्ष | पुढारी

कुंभ : सर्व दृष्टीने असामान्य यशाचे व प्रगतीचे वर्ष

कुंभ ही रास शनी ग्रहाच्या स्वामित्वाखालील ही रास आहे. उच्च प्रतीची ज्ञानलालसा हे या राशीचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानाचा सतत शोध व प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे. प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणे हे आपल्या राशीचे वैशिष्ट्य आहे. आपल्यावर उच्च ध्येयाचे, थोर विचारांचे व तत्त्वज्ञानाचे संस्कार झालेले असतात. संशोधन कार्यात, शास्त्रीय संशोधनात कुंभ व्यक्ती विशेष आढळून येतात. प्रामाणिकपणा हे कुंभ राशीचे विशेष वैशिष्ट्य आहे. कोणतेही काम मनापासून करायचे ही आपली वृत्ती असते. मानवतेची पूजा करणारी ही रास आहे. जनसामान्यांच्यावर प्रेम करणारी ही रास आहे. या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला ही रास परंपरेची पूजक असलेली रास आहे. आध्यात्मिक वृत्तीची ही रास आहे. 

yesआरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत समाधानकारक आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. संपूर्ण वर्षभर गुरूसारख्या बलवान व शुभ ग्रहांची आपणाला साथ आहे. यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना आगामी वर्षभर शनी व गुरू हे दोन्ही ग्रह लाभदायक आहेत. व्यवसाय, व्यापार, उद्योग, नोकरी, सार्वजनिक जीवन या सर्व ठिकाणी आपणाला साफल्य मिळणार असल्यामुळे मानसिक स्थिती चांगली राहणार आहे व आरोग्यही चांगले राहणार आहे. स्वास्थ्य लाभणार आहे. सौख्य लाभणार आहे.  ०३ मे ते ०८ जून, ०५ जुलै ते ३१ जुलै, ०२ सप्टेंबर ते १० आक्टोबर, २४ आक्टोबर ते ०७ नोव्हेंबर, २५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडात आरोग्याच्या दृष्टीने विशेष चांगले आहेत. १७ जानेवारी ते ०७ मार्च या कालखंडात आपल्याला कामाचा ताण पडणार आहे. जबाबदारी वाढणार आहे. दगदग वाढेल. 

yesव्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने  कुंभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत चांगले ठरणार आहे. संपूर्ण वर्षभर गुरू व शनी हे ग्रह चांगले आहेत. गुरूचे भाग्यस्थानातून व दशमस्थानातू भ्रमण होणार आहे. हे आपणाला व्यवसायात, उद्योगात यश मिळवून देणारे ठरणार आहेत. तुमचा जनसंपर्क वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. दि. ११ ऑक्टोबर २०१८ पासून कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभेल. हे वर्ष नवनवीन संधीचे आहे. त्यामुळे व्यापारात व व्यवसायात नवीन प्रयोग करू शकाल. नवीन सुधारणा करू शकाल. नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.  ०१ जानेवारी ते १६ जानेवारी, २८ जानेवारी ०६ मार्च, ११ आक्टोबर ते ०३ नोव्हेंबर, २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल आहेत. २७ मार्च ते ०२ मे हा कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने प्रतिकूल ठरतील. ०७ मार्च ते २६ मार्च, ०५ मे ते ३० ऑगस्ट, ०७ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर हे कालखंड व्यवसायाच्या दृष्टीने व आर्थिक लाभाच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे.

laughनोकरी
कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. यावर्षी वरिष्ठांबरोबर तुमचे चांगले संबंध राहणार आहेत. वरिष्ठांचे, उच्च पदस्थांचे, राजकीय व्यक्तींचे तुमचे संबंध चांगले राहतील. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. थोरामोठ्यांचे परिचय होतील. या वर्षी पगारवाढीची निश्‍चित शक्यता आहे. नोकरीतील तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. बढतीच्या दृष्टीने दि. ११ ऑक्टोबर नंतरचा कालखंड आपणाला अत्यंत चांगला ठरेल.  १५ मार्च ते १४ मे, १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर, १८ ऑक्टोबर ते १२ डिसेंबर कालखंडात नोकरीतील कुंभ राशीच्या व्यक्तींना चांगले ठरणार आहेत. ०१ जानेवारी ते १३ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १४ मार्च, १७ जुलै ते १६ ऑगस्ट या कालखंडात तुमची नोकरीमध्ये जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण पडेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. 
१४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, १५ जुन ते १६ जुलै, १७ सप्टेंबर ते १७ आक्टोबर, १७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड कुंभ व्यक्तींना नोकरीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे.

laughप्रॉपर्टी
प्रॉपर्टीच्या दृष्टीने कुंभ राशीच्या व्यक्तींना हे संपूर्ण वर्ष चांगले जाणार आहे. मागील वर्षी प्रॉपर्टीच्या कामामध्ये ज्या अडचणी आल्या, जो विलंब झाला ते आता सर्व कमी होणार आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी प्रतिकूलता जाणवणार नाही. हे वर्ष प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या दृष्टीने यशदायक ठरेल. विशेषत: दि. १२ ऑक्टोबर नंतरचा कालखंड हा अत्यंत चांगला ठरणार आहे. या कालखंडात तुम्ही तुमच्या राहत्या घराचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सोडवाल. व्यवसायासाठी लागणार्‍या जागेची कामे यशस्वीरित्या मार्गी लावू शकाल. तुमची घरासंदर्भातील असणारी स्वप्ने साकार करू शकाल. 

०२ मार्च ते २६ मार्च, २० एप्रिल ते १४ मे, ०२ सप्टेंबर ते ०८ नोव्हेंबर, २३ नोव्हेंबर ते ३१ नोव्हेंबर हा कालखंड अत्यंत यशदायक व लाभदायक असा कालखंड आहे. या कालखंडामध्ये प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी, जमीन खरेदी-विक्रीसाठी अत्यंत चांगला कालखंड आहे. बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, डेव्हलपर्स, लँड डिलर्स या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या महिलांच्या दृष्टीने हा कालखंड अत्यंत चांगला आहे. या कालखंडामध्ये आपण आपली स्वप्ने साकार करू शकाल. महत्त्वाचे प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे निर्णय वरील कालखंडात घेणे अत्यंत फायद्याचे ठरेल. ०२ मार्च ते १४ मे, ०५ जुलै ते ३१ जुलै, ०२ सप्टेंबर ते ०८ नोव्हेंबर हे कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने व गुंतवणुकीच्या दृष्टीने अनुकूल ठरतील. १४ जानेवारी ते ०५ फेब्रुवारी, ०९ जुन ते ०४ जुलै, ०१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट हे कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत. ज्यांना आयुष्यात एकदाच फ्लॅट, बंगला घ्यावयचे आहेत, वाहन खरेदी करायचे आहे व गुंतवणूक करायची आहे त्यांनी १४ जानेवारी ते ०५ फेब्रुवारी, ०९ जून त; ०४ जुलै, ०१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट हे कालखंड कटाक्षाने टाळावेत.

०१ जानेवारी ते १३ जानेवारी, १५ मे ते ०८ जून हा कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे. 

smileyसंततीसौख्य
कुंभ राशीच्या व्यक्तींना संततिसौख्याच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत चांगले ठरणार आहे. यावर्षी तुमच्या मुलामुलींबद्दल असणार्‍या आशाआकांक्षा पूर्ण होणार आहेत. हे संपूर्ण वर्ष गुरू अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. मागील वर्षी मुलामुलींच्या संदर्भातील अनेक प्रश्‍नांना सामोरे जावे लागले असेल. मुलामुलींसाठी जादा खर्च करावा लागला असेल. परंतु यावर्षी मुलामुलींच्या संदर्भात फारशा प्रश्‍नांना सामोरे जावे लागणार नाही.  सर्वसामान्यपणे वर्षाच्या पूर्वार्धात म्हणजेच दि. १७ जानेवारी ते दि. ३० एप्रिल या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करावा लागणार आहे. या कालखंडामध्ये पालकांना विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. मुलामुलींचे प्रश्‍न या कालखंडात पालकांना सोडवावे लागतील. ०१ मे ते २६ मे, १० जून ते २५ जून, ०३ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर, ०७ आक्टोबर ते ११ नोव्हेंबर, २६ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड संततीसौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत. ०७ जानेवारी ते १४ फेब्रुवारी, ०१ मार्च ते ३० एप्रिल, १९ सप्टेंबर ०५ ऑक्टोबर हे कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरतील. मुलामुलींच्या संदर्भात अनपेक्षित प्रश्‍न व समस्या निर्माण होतील.

heartविवाह / वैवाहिक सौख्य
कुंभ राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हे वर्ष विशेष समाधानकारक जाणार आहे. विवाहेच्छुंचे विवाह ठरतील. विवाहासाठी जे गुरूबळ लागते ते गुरूबळ हे संपूर्ण वर्षभर कुंभ व्यक्तींना लाभणार आहे. त्यामुळे शुभ कार्यासाठी हा गुरू चांगला आहे. विवाहेच्छुंचे विवाह ठरतील. वैवाहिक जीवनात यावर्षी सुसंवाद साधू शकाल. साथीदाराला अपेक्षित सहकार्य करू शकाल. कौटुंबिक जीवनात निर्माण होणार्‍या प्रश्‍नांवर मिळून मार्ग काढू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये यावर्षी सौख्य व समाधान लाभणार आहे. १५ मार्च ते १४ मे, १७ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर, १७ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर, १७ ऑक्टोबर ते ०५ नोव्हेंबर, २२ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हे कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत. ०१ जानेवारी ते १३ जानेवारी, ३० जानेवारी ते १४ मार्च, १७ जुलै ते १६ ऑगस्ट, २० सप्टेंबर ते १६ आक्टोबर, १८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने प्रतिकूल ठरतील.

smileyप्रवास / तीर्थयात्रा
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने कुंभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले जाणार आहे. तीर्थयात्रेचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. मुलामुलींना शिक्षणानिमित्त परदेश गमनाचे योग येतील. अनेक जणांना सहली, जवळचे प्रवास यांचे योग येतील. ०१ जानेवारी ते १४ जानेवारी, ०१ फेब्रुवारी ते ०७ मार्च, ०२ मे ते १४ मे, ०४ सप्टेंबर ते २० आक्टोबर, १० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास यासाठी अनुकूल आहेत. १६ मे ते ०६ जुलै, २२ जुलै ते ०३ सप्टेंबर या कालखंडात परदेश प्रवासाचे योग येतील. तीर्थयात्रेचे योग येतील. परंतु या कालखंडात काळजी घ्यावी. आपला पासपोर्ट हरविणार नाही याची काळजी घ्यावी.

smileyसुसंधी / प्रसिद्धी व सुयश
सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगले जाणार आहे. हे वर्ष सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्य यामध्ये आपणाला यश मिळवून देणारे राहणार आहे. मागील वर्षात आपण जे कष्ट केले, जे परिश्रम घेतले त्याची फळे तुम्हाला यावर्षी मिळणार आहेत. आपणला अपेक्षित असणार्‍या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभणार आहे. आपणाला आपल्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल, यश लाभेल, प्रसिद्धी लाभेल. नवा मार्ग दिसेल, नवी दिशा सापडेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. ०१ जानेवारी ते ३१ जानेवारी, १२ फेब्रुवारी ते ०६ मार्च, ०१ एप्रिल ते १३ मे, १७ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर, १७ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर, १० आक्टोबर ते ३१ डिसेंबर  हा कालखंड सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने चांगले आहेत.

smileyप्रतिष्ठा, मानसन्मान
प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने कुंभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष विशेष समाधानकारक ठरणार आहे. तुम्ही घेतलेल्या कष्टांची व परिश्रमांची फळे तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील आपला सहभाग वाढणार आहे. यावर्षी वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. काहींना एखादी महत्त्वाची जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेषत: दि. १२ ऑक्टोबर नंतरच्या कालखंडामध्ये काहींची महत्त्वाच्या ठिकाणी नेमणूक होईल. या कालखंडात मानसन्मान व प्रतिष्ठा नक्की लाभणार आहे. आपणाला अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे अनुभवाचे विश्‍व व्यापक होईल. अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करू शकाल. सारांश, कुंभ राशीच्या व्यक्तींना मानसन्मान, प्रतिष्ठेच्या दृष्टीने हे वर्ष विशेष लाभदायक, यशदायक व भाग्यकारक ठरणार आहे. 
१५ मार्च ते १४ जून, १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर, १७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हा कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने कुंभ राशीच्या व्यक्तींना अनुकूल आहेत. २० जानेवारी ते १४ फेब्रुवारी हा कालखंड कुंभ राशीच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचे जातील. या कालखंडात आपण कोणत्याही बेकायदेशीर कामात अडकणार नाही याची काळजी घ्यावी.

laughlaughlaugh

सारांश

संपूर्ण वर्ष गुरू आपणाला चांगला आहे. त्यामुळे आपले निर्णय अचूक येणार आहेत. संततिसौख्य लाभणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. घरात मंगलकार्य घडणार आहे.  वैवाहिक जीवनातील मनस्ताप कमी होणार आहेत. मतभेद कमी होणार आहेत. विवाहेच्छुंचे विवाह होणार आहेत. विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल.  तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार आहेत. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विरोधकावर मात कराल. शत्रुपिडा नाही. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लागणार आहेत. प्रॉपर्टी खरेदी-विक्री, जागा खरेदी-विक्री या दृष्टीने वर्ष चांगले आहे.  तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे. दि. 12 ऑक्टोबर 2018 नंतरच्या कालखंडात आपणाला प्रतिष्ठा लाभणार आहे. राजकीय क्षेत्रात एखादे पद लाभेल. तुम्ही आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवू शकाल. नोकरीत बढती लाभेल. परदेश प्रवासाचे योग येतील. तीर्थयात्रेचे योग येतील.  या कालखंडात व्यवसायात वाढ करू शकाल. काहींना एखादी महत्त्वाची जागा मिळण्याची शक्यता आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सारांश हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींना सर्व दृष्टीने यशदायक, लाभदायक, संपन्नतेचे ठरणार आहे.

Back to top button