कर्क: नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती | पुढारी

कर्क: नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती

चंद्राचा अंमल आपल्यावर असल्याने आपल्या वृत्तीत सतत चढ – उतार होत असतात. कधी हसू तर कधी अश्रू. कधी एकदम आनंदी तर लगेच दु:खी असे आपल्या स्वभावात चढ – उतार होत असतात. आपण अत्यंत भावनाप्रधान आहात. आपण प्रेमळ, दयाळू, पाण्यासारखे शुद्ध व निर्मळ आहात. पाण्यासारखे सतत वहात जाण्याचा आपला स्वभाव आहे. आपण व्यवहार्य आहात, काटकसरी आहात त्यामुळे आपण प्रपंचात यशस्वी होणार आहात. प्रपंच यशस्वी होण्यासाठी लागणारे आवश्यक गुण आपणाकडे आहेत. आपला मैत्र परिवार अफाट असतो. आपल्या परिवारात सर्व प्रकारच्या व्यक्‍ती असतात व आपल्या सभोवतालची माणसे आपल्यावर निस्सीम प्रेम करत असतात. त्याबाबत आपण नशिबवान असता. मनापासून प्रेम करणे हे आपले वैशिष्ट्य असते. आपल्या भावना तीव्र व उत्कट असतात. एकाचवेळी पारिजातकासारखे कोमल व वज्राप्रमाणे आपण कठोर होवू शकता.

yes आरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक जाणार आहे. यावर्षी तुम्ही व्यवसायाकडे प्रामुख्याने लक्ष देवू शकाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. विशेषत: दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतरचा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला जाणार आहे. तुम्ही आशावादी व सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पहाल. तुम्हाला नवीन संधी प्राप्‍त होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात कार्य करण्यासाठी मनासारखे वातावरण असेल. सौख्य व समाधान लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. 14 जानेवारी ते ५ फेब्रुवारी, २ मार्च ते १३ मे, २ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, १३ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर, २९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हे  कालखंड आरोग्याच्या दृष्टीने विशेष सौख्यकारक आहेत.  १ जानेवारी ते १२ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते  १ मार्च या कालखंडात कामाचा ताण वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे. कौटुंबिक जीवनात, नोकरी, व्यवसायात, सार्वजनिक जीवनात जबाबदारी वाढेल. त्याचा ताण आरोग्यावर होण्याची शक्यता आहे
.

yes व्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
कर्क राशीच्या व्यक्‍तींना संपूर्ण वर्ष व्यवसाय, कारखानदारी, उद्योगधंदा या दृष्टीने अत्यंत यशदायक व लाभदायक ठरणार आहे. यावर्षी तुम्ही व्यवसायाकडे प्रामुख्याने लक्ष देवू शकाल व्यवसायात वाढ करू शकाल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय यावर्षी घेवू शकाल. व्यवसायाच्या नव्या शाखा निर्माण करू शकाल. ८ मार्च ते २ मे या कालखंडात मात्र व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेणे अत्यंत गरजेचे आहे. बाकीचा कालखंड चांगला असला तरीही हा कालखंड तेवढाच प्रतिकूल जाणार आहे. या कालखंडात मोठे व्यवहार करताना जपून करावेत. सर्व गोष्टींची दक्षता घेणे या कालखंडामध्ये गरजेचे आहे.  १५ जानेवारी ते ६ मार्च, ३ मे ते ६ जून, २६ जून ते २८ सप्टेंबर, ११ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर, २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने व व्यवसायाच्या दृष्टीने चांगले आहेत. तुमची व्यवसायातील कामे जलदगतीने व गतिमानतेने होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. तुम्ही कल्पनाही केली नाही अशा वेगळ्याच व्यक्‍तींकडून आपणाला फार मोठे सहकार्य मिळणार आहे. ८ मार्च ते २ मे, ७ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या कालखंडात आपण अतिशय जागरूक रहावयास हवे. मोठे व्यवहार करताना बाजारपेठेचा चौफेर अभ्यास करावयास हवा. नुकसानीची शक्यता अधिक आहे. आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. फसवणुकीची शक्यता आहे. 

yes नोकरी
कर्क राशीच्या व्यक्‍तींना नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष  समाधानकारक राहणार आहे. यावर्षी विरोधकावर मात कराल. तुमच्या जबाबदारीत वाढ होणार आहे. या जबाबदारीच्या जागेसंदर्भातील कामाचे ताणतणाव वाढतील.  तुमच्या कर्तृत्त्वाला व कर्तबगारीला संधी मिळणार आहे. नोकरीमध्ये तुमचे पाऊल पुढे पडणार आहे. कामामध्ये येणार्‍या अडचणींवर मात कराल. हितशत्रुंच्या कारवायांवर मात कराल. नोकरीमध्ये चांगले वातावरण राहणार आहे.  
१७ जानेवारी ते ११ फेब्रुवारी, १५ मार्च ते १३ जून, १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर,  १८ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हे कालखंड नोकरीतील व्यक्‍तींना चांगले आहेत. या कालखंडात तुमच्यावर वरिष्ठांची कृपा राहील. 

yes प्रॉपर्टी
कर्क राशीच्या व्यक्‍तींना प्रॉपर्टीच्या दृष्टीने हे वर्ष विशेष समाधानकारक ठरणार आहे. हे वर्ष गुंतवणुकीसाठी चांगले आहे. मागील वर्षी रखडलेल्या प्रॉपर्टींचे व्यवहार यावर्षी करणे योग्य राहील. तुमच्या राहत्या घराचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न यावर्षी सोडवू शकाल. विशेषत: दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा कालखंड गुंतवणूक, जागा, जमिनी, प्लॉट, फ्लॅट, वाहन खरेदीसाठी हे वर्ष चांगले आहे. व्यवसाय व आर्थिक लाभ या गोष्टी चांगल्या असल्यामुळे आपण समर्थपणे प्रॉपर्टीची कामे करू शकाल. ज्या व्यक्‍तींनांचा प्रॉपर्टीच्या संदर्भातील किंवा बिल्डिंग मटेरिअल, जागेचे व्यवहार हा व्यवसाय आहे त्यांना विशेष आर्थिक लाभ होणार आहेत. यावर्षी प्रॉपर्टी संदर्भातील तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. प्रॉपर्टीच्या संदर्भात फारशा अडचणी व अडथळे येणार नाहीत. हे संपूर्ण वर्ष सर्वसामान्यपणे प्रॉपर्टीच्या दृष्टीने चांगले ठरणार आहे. १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, १८ मार्च ते १४ मे, ९ जून ते ३० जुलै, २ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंड प्रॉपर्टी, वाहन खरेदी, प्लॉट, फ्लॅट खरेदी व गुंतवणूक यासाठी चांगले आहेत. ८ मार्च ते १७ मार्च, १५ मे ते ८ सहा या खालील कालखंड नोकरीतील व्यक्‍तींना संमिश्र स्वरूपाचे जातील.

heart संततीसौख्य
संततिसौख्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. गेल्या वर्षी कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागले असेल. जास्त परिश्रम घ्यावे लागले असतील. परंतु हे वर्ष मागील वर्षापेक्षा अनेक दृष्टीने चांगले जाईल. मुलामुलींच्या संदर्भातील रखडलेले निर्णय मार्गी लावू शकाल. विद्यार्थ्यांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढणार आहे. विशेषत: दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतरचा कालखंड हा अत्यंत चांगला जाणार आहे. या कालखंडात आपण आपली स्वप्ने साकार करू शकाल. काहींना शिक्षणासाठी परदेश प्रवास संभवतो. या कालखंडात आपणाला अपेक्षित ठिकाणी संधी लाभेल. तुमच्या कष्टांचे फळ तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळतील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल.  १७ जानेवारी ते ६ मार्च, ३ मे ते २३ जून, ८ जुलै ते ३० सप्टेंबर, ११ ऑक्टोबर ते ५ मे, २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने अनुकूल जातील. ९ मार्च ते ३० एप्रिल, ६ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर हे कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरतील. वरील कालखंडात मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावेत. या कालखंडात मुलामुलींबरोबर मतभेदाची शक्यता आहे. या कालखंडात विद्यार्थ्यांनी अत्यंत शांत व संयम रहावे. तसेच विद्यार्थ्यांनी व युवकांनी या कालखंडात सतत कार्यरत रहावे.

 
heart विवाह / वैवाहिक सौख्य
वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वसामान्य स्वरूपाचे ठरणार आहे. विवाहासाठी जो गुरू हा ग्रह अनुकूल असावा लागतो तो गुरू यावर्षी फारसा अनुकूल नाही. यावर्षी कर्क राशीच्या व्यक्‍तींना दि. ११ ऑक्टोबर २०१८ पर्यंत गुरूबळ नाही. कारण गुरू आपल्या राशी कुंडलीत चौथा आहे. त्यामुळे हा गुरू शुभ कार्यासाठी अनुकूल नसतो. हा गुरू  १२ ऑक्टोबर नंतर अनुकूल आहे. विवाहासाठी गुरूची अनुकूलता लागते. १२ ऑक्टोबर नंतर गुरू पंचमस्थानात येत आहे. त्यामुळे या कालखंडात योग्य साथीदार मिळण्याच्या दृष्टीने चांगला कालखंड आहे. या कालखंडात विवाहेच्छुंचे विवाह होतील. हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्‍तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने कमी-अधिक प्रमाणात संमिश्र स्वरूपाचे राहणार आहे. ज्यांच्या वैवाहिक जीवनात मूळचेच मतभेद आहेत त्यांनी संयमी राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यावर्षी  शांतपणा, सोशिकता, सहनशिलता, मिळतेजुळते घेण्याची वृत्ती व वैचारिक देवाण-घेवाण यांची गरज आहे.  १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, १ मे ते १४ मे, २ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने समाधानकारक आहेत. खालील कालखंडात वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. ८ मार्च ते २८ एप्रिल, १६ मे ते ५ जून हे कालखंड वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने कमी-जास्त प्रमाणात प्रतिकूल राहील. या कालखंडात मतभेदांना प्रोत्साहन देवू नये. वादविवादात शांत रहावे. ६ फेब्रुवारी ते १ मार्च, ९ जून ते ४ जुलै हे कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे.

yes प्रवास / तीर्थयात्रा

प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे.  तीर्थयात्रेचे, सहलीचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये काळजी घेणे गरजेचे भासेल. ऐतिहासिक व प्रसिद्ध अशा सौंदर्यस्थळांना भेटी देण्याचे योग येतील.  परंतु आपली मौल्यवान वस्तू हरविणार नाही किंवा गहाळ होणार नाही याची काळजी घ्यावी. परदेश प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये काळजी घ्यावी. तरीही खालील कालखंडामध्ये प्रवासामध्ये सौख्य लाभेल. ६ मार्च ते १५ मे, १९ सप्टेंबर ११ ऑक्टोबर, २२ ऑक्टोबर ते २७ डिसेंबर हे कालखंड प्रवासासाठी अनुकूल आहेत. १८ जानेवारी ते ५ मार्च, १०न जून ते २५ जून  या कालखंडात प्रवासात अडचणी येणे, वस्तू गहाळ होणे, हरविणे याची शक्यता आहे. तसेच खालील कालखंडात वाहने चालवताना काळजी घेण्याची गरज आहे. खालील कालखंडात आपण प्रवासात जागरूक राहण्याची गरज आहे. परदेशात आपले पासपोर्ट गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्यावयास हवी. अनपेक्षितपणे काही प्रश्‍न निर्माण होवू शकतात.

yes सुसंधी / प्रसिद्धी व सुयश
कर्क राशीच्या व्यक्‍तींना सुसंधी प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने हे वर्ष सर्वसामान्य ठरणार आहे. यावर्षी व्यवसायात वाढ होणार आहे. वर्षाच्या उत्तरार्धात अपेक्षित संधी मिळाल्यास त्या संधीचा फायदा घ्यावा.  
कर्क व्यक्‍तींना सुसंधीच्या दृष्टीने दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतरचा कालखंड हा अधिक चांगला आहे. या कालखंडात तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. नवीन दिशा सापडेल, नवा रस्ता दिसेल. नवा मार्ग आपण आक्रमू शकता. ज्या संधीची आपण वाट पहात आहात ती संधी या कालखंडात लाभणार आहे. कला, संगीत, नाट्य, चित्रकला, लेखन, प्रकाशन, चित्रपट व वेगवेगळ्या तुमच्या छंदांना व्यासपीठ लाभणार आहे. तुम्हाला तुमच्या कलेचा आविष्कार दाखवण्याची संधी लाभणार आहे. २ मार्च ते २६ मार्च, १५ एप्रिल ते २० मे, २६ जून ते २६ जुलै, १९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड आपणाला सुसंधी व प्रसिद्धी या दृष्टीने चांगले आहेत.

heart प्रतिष्ठा, मानसन्मान
कर्क राशीच्या व्यक्‍तींना प्रतिष्ठा, मानसन्मान, सार्वजनिक, राजकीय कार्यात यश या दृष्टीने हे वर्ष अत्यंत यशदायक, लाभदायक असे ठरणार आहे. यावर्षी तुमच्या कष्टांची फळे तुम्हाला मिळणार आहेत. प्रतिष्ठा लाभेल, कीर्ती लाभेल, सुयश लाभेल. नावलौकिक लाभेल. मानसन्मानाचे योग येतील. राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, सांस्कृतिक व नाट्य क्षेत्र या कोणत्याही क्षेत्रात आपणाला एखादे पद, अधिकारपद लाभणार आहे.  १७ जानेवारी ते ११ फेब्रुवारी, १५ मार्च ते ६ जून, १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर, १७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हे कालखंड आपणाला प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकारयोग यादृष्टीने चांगले आहेत. १ जानेवारी ते १२ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १४ मार्च, १५ जून ते १६ जुलै, १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडात सावधगिरी बाळगावी 

सारांश

कर्क राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष व्यवसाय, व्यवसायातील वाढ, गुंतवणूक, प्रॉपर्टी, खरेदी-विक्रीचे व्यवहार, मानसन्मान, प्रतिष्ठा, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील सहभाग या दृष्टीने खूपच यशाचा, प्रगतीचा, विकासाचा असा ठरणार आहे. व्यवसायात अर्थप्राप्‍त चांगली होईल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे.  विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज प्रवेशाच्या दृष्टीने अनेकांचे सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने, आरोग्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष चांगले असले तरी दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतरचा कालखंड हा अधिक चांगला आहे. विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतरचा कालखंड चांगला आहे. या कालखंडात इच्छित वधू किंवा वर मिळण्याची शक्यता आहे. परंतु वैवाहिक जीवनात यावर्षी कर्क व्यक्‍तींनी शांत व संयमी राहणे गरजेचे आहे. भागीदारी व्यवसायामध्ये होणार्‍या मतभेदांना देखील आळा घालावा. भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय सर्वांच्या संमतीने घ्यावेत. वर्ष अखेरीस आपणाला कृतकृत्यता व सफलतेचा आनंद अनुभवायास मिळणार आहे.

Back to top button