मकर : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती  | पुढारी

मकर : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती 

मकर राशीचे स्वामित्त्व या राशीवर असल्यामुळे आपण शनीप्रधान लोक आहात. शनीचे मुख्य कारकत्व म्हणजे जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव. अव्याहतपणे, चिकाटीने व अखंडपणे काम करणे हे आपले वैशिष्ट्य असते. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चिकाटी असते. शनीचा मुख्य गुणधर्म म्हणजे कायद्याचे पालन करणे. कायदा व न्याय या संदर्भात आपण विशेष जागरूक असता. मकर व्यक्ती या अत्यंत काटकसरी, हिशेबी व व्यवहार जाणणार्‍या असल्यामुळे प्रपंचात व संसारात त्या यशस्वी होतात. न्याय व अन्याय या बाबतीत तडजोड न करण्याची आपली वृत्ती आहे. कडक शिस्त, व्यवहारीपणा, आर्थिकबाबतीत विशेष जागरूक हे आपले वैशिष्ट्य आहे. शनीकडे संयम आहे, शिस्त आहे, सहनशिलता आहे. विवेक आहे, विचार आहे. व्यवहारचातुर्य आहे. समाजापासून दूर राहण्याची आपली प्रवृत्ती आहे. एकांतवासाकडे आपला अधिक कल आहे. आत्मसंयमन ही आपली शक्ती आहे. 

smileyआरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष कमी-जास्त प्रमाणात सर्वसामान्य ठरणार आहे. यावर्षी आपल्यावरील जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे प्रकृतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी २६ ऑक्टोबरला शनीचा धनु राशीत प्रवेश झाला आहे व त्यावेळी आपली साडेसाती सुरू झाली आहे. साडेसाती सुरू झाल्यामुळे काहीवेळा महत्त्वाची कामे रखडतात. कामाचा ताण व दगदग जास्त प्रमाणात जाणवते. काहीवेळा तुम्ही केलेली वेळापत्रके चुकण्याची शक्यता आहे. परंतु ११ ऑक्टोबर पर्यंत गुरू दशमात आहे. त्यामुळे व्यवसायाकडे लक्ष देवू शकाल. व्यवसायातील जबाबदारी वाढणार आहे. गुरू अनुकूल असल्यामुळे अनेकांचे सहकार्य मिळवू शकाल. मन आशावादी राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. परंतु यावर्षी जेवढे सकारात्मक राहते येईल तेवढे सकारात्मक राहणे गरजेचे आहे. यावर्षी आपण शांत व संयमी राहणे गरजेचे आहे. १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, ८ मार्च ते १७ मार्च, ३ मे ते १४ मे, ९ जून ते ४ जुलै, २ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. ६ फेब्रुवारी ते ६ मार्च, १८ मार्च ते १ मे हा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. 

smileyव्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
व्यवसाय, उद्योगधंदा, व्यापार, कारखानदारी या दृष्टीने मकर राशीच्या  व्यक्तींना हे वर्ष विशेष समाधानकारक ठरणार आहे. हे वर्ष यशदायक व लाभदायक ठरणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींना मागील वर्षी  २६ जानेवारी पासून साडेसाती सुरू झाली आहे. परंतु त्याचा यावर्षी तरी व्यवसायाच्या दृष्टीने फारसा परिणाम होणार नाही. शिवाय मकर ही शनीचीच रास असल्यामुळे इतर राशीइतका मकर राशीच्या व्यक्तींना साडेसातीचा फारसा त्रास होत नाही. ११ ऑक्टोबर पर्यंतचा कालखंड व्यवसायाच्या दृष्टीने  विशेष चांगला ठरेल. हा कालखंड आपण नवीन व्यवसाय सुरू करण्यास किंवा व्यवसायाची नवीन शाखा सुरू करण्यास कालखंड अनुकूल आहे. या कालखंडात आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. या कालखंडात आपण व्यवसायातील जागेचे प्रश्‍न सोडवू शकाल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने ८ मार्च ते २ मे हा कालखंड सोडला तर संपूर्ण कालखंड ढोबळमानाने चांगला आहे. १५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, ३ मार्च ते १० एप्रिल, २५ एप्रिल ते १४ मे, ९ जून ते ३ जुलै, ३ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर, २ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने लाभदायक आहेत.
१९ मे ६ जून, ५ जुलै ते ३१ जुलै हा कालखंड व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल ठरतील. तसेच शासकीय कामाच्या दृष्टीने प्रतिकूल ठरतील. 

yesनोकरी
नोकरीतील मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष यशदायक ठरणार आहे.  यावर्षी नोकरीतील व्यक्तींना ११ ऑक्टोबर पर्यंतच्या कालखंडामध्ये बढतीची शक्यता आहे. जे बदलीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना या कालखंडामध्ये बदली मिळेल. तुमच्या वैचारिक व बौद्धिक पातळीवर अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. नोकरीमध्ये आपणाला वरिष्ठांचे तसेच सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. 
साडेसाती सुरू झाली आहे. त्यामुळे यावर्षी कामाचा ताण राहणार आहे, दगदग राहणार आहे. जबाबदारी वाढणार आहे. तरीही गुरू अनुकूल आहे व त्याचा फायदा होणार आहे. विरोधकावर मात कराल. १२ ऑक्टोबर नंतरच्या कालखंडामध्ये काहींना नोकरीच्या दृष्टीने एखादी संधी लाभेल. १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, १६ मार्च ते ९ जून, १८ जुलै ते १६ ऑगस्ट, २० ऑक्टोबर ते ८ नोव्हेबर, १५ नोव्हेबर ते १४ डिसेंबरहा कालखंड नोकरीतील व्यक्तींना प्रगतीचे व बढतीचे ठरणार आहेत.१ जानेवारी ते ११ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १२ मार्च, १५ जून ते १५ जुलै, १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे.

smileyप्रॉपर्टी
प्रॉपर्टी, गुंतवणूक, प्लॉट, फ्लॅट, बंगला, वाहन खरेदी या दृष्टीने मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत लाभदायक व यशदायक असे ठरणार आहे. यावर्षी आपण आपल्या राहत्या घराचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सोडवू शकाल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्तींना म्हणजेच बिल्डर्स, डेव्हलपर्स, लँड डिलर्स यांच्या दृष्टीने हे वर्ष विशेष लाभदायक ठरणार आहे. ज्यांना आयुष्यात एकदाच प्रॉपर्टीचे व्यवहार करायचे आहेत किंवा फ्लॅट, बंगला हे घ्यावयाचे आहेत त्यांना १२ ऑक्टोबर पर्यंतचा कालखंड अधिक अनुकूल आहे. १ जानेवारी ते ३१ जानेवारी, ९ फेब्रुवारी ते ७ मार्च, ३ मे ते ५ जुलै, २० जुलै ते २० सप्टेंबर, २ ऑक्टोबर ते ५ नोव्हेबर, २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबरहा कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने चांगले व अनुकूल ठरेल. ९ मार्च ते २ मे या कालखंडात प्रॉपर्टीचे व्यवहार, वाहन खरेदीचे व्यवहार शक्यतो टाळावेत. 

smileyसंततीसौख्य
संततिसौख्याच्या दृष्टीने मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत चांगले व सौख्यकारक ठरणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींना संततिसौख्य अत्यंत चांगले लाभणार आहे. मुलामुलींची प्रगती संतोषजनक असेल. मुलामुलींचे व्यवसायाचे प्रश्‍न तसेच नोकरीचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. त्यांचे उपक‘म, त्यांचे छंद, त्यांचे कलानैपुण्य यामध्ये चांगली संधी लाभणार आहे. सर्व क्षेत्रात मकर राशीच्या व्यक्तींच्या मुली वेगवान प्रगती करणार आहेत. मुलामुलींची प्रगती संतोषजनक व समाधानकारक असेल. १५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, ४ मार्च ते ७ मे, १० जून ते ३ जुलै, १० ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर, २४ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड मकर राशीच्या व्यक्तींना संततिसौख्याच्या दृष्टीने चांगले जाणार आहे. १ जानेवारी ते १२ जानेवारी, १६ मे ७ जून, ८ जुलै ते १ ऑगस्ट हा कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरेल.

heartविवाह / वैवाहिक सौख्य
विवाह, वैवाहिक सौख्य तसेच विवाह इच्छुकाचे विवाह जमणे या दृष्टीने मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले ठरणार आहे. संपूर्ण वर्षभर गुरू आपणाला अनुकूल आहे. लग्नासाठी जे गुरूबळ लागते ते गुरूबळ संपूर्ण वर्षभर आहे. त्यामुळे या गुरूचा फायदा आपणाला होणार आहे. तरीही १२ ऑक्टोबर  नंतरचा कालखंड हा अपेक्षित साथीदार मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. वैवाहिक सौ‘य लाभेल. वैवाहिक जीवनातील प्रश्‍न सोडवू शकाल. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष चांगले आहे. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने साडेसातीचा विशेष परिणाम  होणार नाही. ८ मार्च ते १७ मार्च, २ मे १३ मे, १० जून ते ४ जुलै, ४ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर, ३१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने सौख्यकारक आहे. १७ जानेवारी ते ७ मार्च, १८ मार्च ते ३० एप्रिल हा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. 

yesप्रवास
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत चांगले आहे. काहींना शिक्षणासाठी व व्यवसायासाठी व सहल म्हणून परदेशी जाण्याची संधी मिळेल. प्रवास सुखकारक होतील. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. एकूणच मकर राशीच्या व्यक्तींना प्रवासाच्या, तीर्थयात्रेच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत चांगले आहे. यावर्षी तीर्थयात्रेला, परदेश प्रवासाला चांगली संधी मिळणार आहे. ३ मार्च ते १७ मार्च, १ एप्रिल ते ७ मे, २६ जून ते ९ सप्टेंबर, १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर, २ नोव्हेबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने चांगला आहे.
१० जून ते २५ जून हा कालखंड परदेश प्रवासाच्या दृष्टीने प्रतिकूल ठरेल.
 
smileyसुसंधी / प्रसिद्धी व सुयश
सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत चांगले आहे. समाधानकारक आहे. नवा रस्ता दिसेल, नवी दिशा सापडेल. तुमच्या बौद्धिक व वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना गुरूकृपा लाभेल. तुमचा एका नव्या वर्तुळात प्रवेश होईल. तुमची प्रगती एका वेगळ्या उंचीवर जावून पोहोचणार आहे. १२ ऑक्टोबर नंतरचा कालखंड हा सुसंधी व प्रसिद्धीच्या दृष्टीने अधिक यशदायक व लाभदायक आहे. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात चांगली संधी प्राप्त होणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. तुमची स्वप्ने व मनोरथ साकार होतील. कला, संगीत, नाट्य, लेखन, प्रकाशन या क्षेत्रात तुम्हाला नावलौकिक प्राप्त होईल. तुमची बुद्धिमत्ता, तुमचे कलागुण, तुमचा अनुभव याला दाद मिळणार आहे. यावर्षी तुमचा जनसंपर्क वाढेल. तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. 
या वर्षात नवनवीन ज्ञान प्राप्त करणार आहात. नवनवीन अनुभव मिळतील.  सुसंधीच्या दृष्टीने हे वर्ष नोंद करून ठेवण्यासारखे राहील. बौद्धिक, संशोधन क्षेत्रात अपूर्व यश मिळेल. वर्षाअखेरीस एक विलक्षण मानसिक समाधान, प्रसन्नता लाभेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरणार आहेत. अनेकांचे चांगले मार्गदर्शन लाभणार आहे. २ मार्च ते २५ मार्च, २० एप्रिल ते १३ मे, २८ मे ९ जून, २१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर हा कालखंड सुसंधी, प्रसिद्धी या दृष्टीने यशदायक आहे.

yesप्रतिष्ठा, मानसन्मान
प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकारयोग या दृष्टीने मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत चांगले जाणार आहे. विशेषत: ११ आक्टोबर पर्यंतचा कालखंड हा विशेष चांगला आहे. मागील वर्षी तुम्ही जे कार्य केले, जे परिश्रम घेतले, जे कष्ट केले त्याचा फायदा तुम्हाला आत मिळणार आहे. यावर्षी आपणाला अनेकांचा वरदहस्त लाभणार आहे. थोरामोठ्यांचे परिचय होणार आहेत. त्यांचा आशिर्वाद लाभणार आहे. सहकार्य लाभणार आहे. 
सहकार, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्र, धार्मिक व आध्यात्मिक संस्था, राजकारण या सर्व क्षेत्रात तुम्ही तुमच्या कार्याचा ठसा उमटवू शकाल. मकर व्यक्तींकडे मुळातच चिकाटी खूप असते. कामामध्ये सातत्य असते. अत्यंत धीमेपणाने, अथकपणाने, अव्याहतपणाने व अखंडपणे काम करण्याची आपली पद्धत असते. यशासाठी कितीही काळ थांबण्याची आपली तयारी असते. यावर्षी आपणाला चांगली संधी लाभणार आहे. ११ ऑक्टोबर पर्यंतच्या काळात आपणाला एखादे अधिकारपद मिळेल. नावलौकिक मिळेल, प्रतिष्ठा मिळेल. मानमान्यता मिळेल. कीर्ती लाभेल. १५ मार्च ते १७ मार्च, १५ मार्च ते १४ मे, २ सप्टेबर ते ८ ऑक्टोबर, २० ऑक्टोबर ते १५ डिसेंबर हा कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मानाच्या दृष्टीने चांगला आहे. १ जानेवारी ते १२ जानेवारी, १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडामध्ये आपण कोणत्याही शासकीय कामांमध्ये अडकणार नाही. आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

laughसारांश 
मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने कमी-जास्त प्रमाणात संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. व्यवसायातील कारभार वाढणार आहे. व्यवसायात आपण नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. परंतु त्याचवेळी आपल्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे कामाचा ताण व दगदग जाणवेल. विशेषत: ११ ऑक्टोबर पर्यंतचा कालखंड हा नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने अधिक चांगला आहे. या कालखंडात आपण व्यवसायातील महत्त्वपूर्ण कामे पार पाडू शकाल. या कालखंडात काहींना एखादे महत्त्वाचे पद लाभेल. बढतीच्या दृष्टीने, मानसन्मान-प्रतिष्ठा मिळण्याच्या दृष्टीने, प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या दृष्टीने हा कालखंड अत्यंत चांगला आहे. संपूर्ण वर्षभर गुरू अनुकूल आहे. 
विद्यार्थी, विद्यार्थिनींना, युवतींना १२ ऑक्टोबर नंतरचा कालखंड हा परीक्षा, अभ्यासक‘म, तुमचे छंद, तुमच्या कला यामध्ये चांगली सुसंधी मिळवून देणारा आहे. विवाह इच्छूक मुलामुलींचे विवाह ठरतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. परदेश प्रवासाचे, तीर्थयात्रेचे योग आहेत. यावर्षी तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरणार आहेत. कामाचा थोडा ताण जाणवेल, दगदग जाणवेल. 
साडेसातीचा कालखंड सुरू असल्याने जागरूक रहावे. सर्व गोष्टींचा चौफेर अभ्यास करून, विचार करून मगच निर्णय घ्यावेत.

Back to top button