वृश्‍चिक : प्रॉपर्टीच्या व्यवहारातून फायदा  | पुढारी

वृश्‍चिक : प्रॉपर्टीच्या व्यवहारातून फायदा 

 

मंगळ हा ग्रह उग्र आहे. तामसी आहे. आपल्याकडे यामुळे असामान्य धैर्य, दृढ इच्छाशक्‍ती, विलक्षण मनोबल या गोष्टी असतात. काम परिपूर्ण करण्यासाठी जी चिकाटी लागते, जे सातत्य लागते ते आपणाकडे असते. एखाद्या कामाला चिकटून बसणे, ते काम परिपूर्ण करणे याला जी चिकाटी व सातत्य लागते ते आपल्याकडे भरपूर असते. आत्मसंयमन, विवेक, निग्रह, निश्‍चयात्मकता, निर्धार या ज्या गोष्टी यशासाठी लागतात त्या आपणाकडे भरपूर आहेत. कोणतेही काम मनावर घेतल्यानंतर ते तडीला नेण्याची, ते काम शेवटापर्यंत नेण्याची जी निग्रह शक्‍ती लागते ती आपणाकडे असते. अव्याहतपणे, अप्रतिहतपणे, अविरतपणे, अखंडपणे काम करण्यामुळे यश मिळविण्याच्या बाबतीत वृश्‍चिक व्यक्‍ती आघाडीवर असतात. 

smileyआरोग्य
वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे समाधानकारक जाणार आहे. विशेषत: ३ मेनंतरच्या कालखंडामध्ये जिद्द व चिकाटी वाढणार आहे. धाडसाने हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. तुम्हाला अपेक्षित क्षेत्रात संधी लाभेल. आरोग्य चांगले राहील. तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहे. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. ११ ऑक्टोबरनंतरचा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने अधिक चांगला जाईल. या कालखंडात महत्त्वाची रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्यावरील कामाचा ताणतणाव कमी होणार आहे. 
३ मे ते ५ नोव्हेंबर हा कालखंड आपणाला स्थूलमानाने अनुकूल जाणार आहेत. ८ मार्च ते २ मे हा कालखंड आपणाला स्थूलमानाने प्रतिकूल ठरणार आहे. या कालखंडात आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे भासेल. कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. या कालखंडात कौटुंबिक जीवनात काही प्रश्‍नांना सामोरे जावे लागेल. या कालखंडात महत्त्वाचे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावेत. १७ जानेवारी ते ७ मार्च, ४ मे ते ५ जून, २० जून ते १ सप्टेबर, २० सप्टेबर ते ५ नोव्हेंबर २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत. ८ मार्च ते १७ मार्च १ एप्रिल ते २ मे हा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरणार आहेत.

smileyव्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, व्यापर, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील उलाढालींकडे लक्ष देवू शकाल. ११ ऑक्टोबरनंतरचा काळ हा व्यवसायाच्या दृष्टीने अधिक चांगला आहे. या कालखंडामध्ये आपण आपल्या व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकाल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. ११ ऑक्टोबरपर्यंतच्या काळामध्ये महत्त्वाचे निर्णय बाजारपेठेचा संपूर्ण अभ्यास करून नंतरच घ्यावेत. यावर्षी आपली जिद्द व चिकाटी वाढणार आहे. विशेषत: बिल्डर्स, डेव्हलपर्स, लँड डिलर्स या क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्‍या व्यक्‍तींच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. साडेसाती सुरू असल्यामुळे हा कालखंड प्रत्येकाच्या वैयक्‍तिक पत्रिकेवर थोड्या फार प्रमाणावर अवलंबून राहणार आहे. १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, १५ मार्च ते १३ एप्रिल, १५ मे ते १४ जून, १७ जुलै ते १६ सप्टेबर, १७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हा कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले आहेत. १ जानेवारी ते १३ जानेवारी, १५ जन ते १६ जुलै, १८ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर हा कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने प्रतिकूल ठरतील. 

laughनोकरी
नोकरीतील वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष यशदायक व लाभदायक ठरणार आहे. साडेसाती असली तरी फार काळजी करण्याचे कारण नाही. परंतु महत्त्वाची कामे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करावीत. तुमच्यावर एखादी जबाबदारी सोपवली जाईल. यावर्षी तुम्ही वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. पूर्ण कार्यक्षमतेने आपली जबाबदारी पार पाडाल. कर्तृत्त्व सिद्ध कराल. वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना नोकरीमध्ये सहकारी वर्गाचे अपेक्षित यश लाभणार आहे. १५ जानेवारी ते ११ फेब्रुवारी, १६ मार्च ते १४ एप्रिल, १६ मे ते १२ जून, २० जुलै ते १५ सप्टेबर, १८ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हा काळ नोकरीतील व्यक्‍तींना लाभदायक ठरतील. खालील कालखंड आपणाला नोकरीमध्ये त्रासाचे, अस्वास्थ्याचे व मनस्तापाचे ठरण्याची शक्यता आहे. जबाबदारी वाढेल. कामाचा ताण वाढेल. काहीवेळा वरिष्ठांची गैरमर्जी होईल. 
१ जानेवारी ते ११ जानेवारी, १६ जून ते १५ जुलै आणि २० सप्टेबर ते १५ नोव्हेंबर या कालखंडात कालखंडात वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना बेकायदेशीर गोष्टींपासून अलिप्‍त राहण्याची आवश्यकता आहे. हितशत्रुंचा त्रास होण्याची शक्यता आहे.

laughप्रॉपर्टी
प्रॉपर्टीच्या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष गेल्या वर्षापेक्षा अनेक दृष्टीने चांगले जाणार आहे. यावर्षात प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात नवीन प्रस्ताव समोर येतील. त्यामधून आर्थिक लाभ होईल. काही दिवसांपासून रखडलेली प्रॉपर्टीची कामे यावर्षी मार्गी लावू शकाल. सर्वसाधारणपणे जागा खरेदी-विक्री, गुंतवणूक या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष चांगले जाणार आहे.
६ फेब्रुवारी ते १ मार्च, ५ जुलै ते ३१ जुलै, ३ सप्टेबर ते १८ सप्टेबर हा  कालखंड प्रॉपर्टीसाठी अनुकूल आहेत. १८ मार्च ते २ मे या कालखंडात प्रॉपर्टीचे व्यवहार कटाक्षाने टाळावेत.

smileyसंततीसौख्य
संततिसौख्याच्या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वसामान्य असे ठरणार आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत. जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत. पालकांनी विद्यार्थ्यांवर कोणताही ताणतणाव येवू देवू नये. मुलामुलींबरोबर मतभेदाची शक्यता आहे. यावर्षी अपेक्षित कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यास निराश होवू नये. महत्त्वाचे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावेत. मात्र, १२ ऑक्टोबरपासूनचा कालखंड संततिसौख्यासाठी अत्यंत चांगला आहे. या कालखंडापासून पुढे मुलामुलींचे महत्त्वाचे प्रश्‍न  सुटणार आहेत. संततिसौख्य लाभेल. मुलामुलींबरोबर सुसंवाद साधू शकाल. ३ मार्च ते १९ मार्च, १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट, १७ सप्टेबर ते ८ नोव्हेंबर, २ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने सौख्यकारक आहेत. २० मार्च ते ३० एप्रिल हा कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरणार आहेत.

heartविवाह / वैवाहिक सौख्य
वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष  वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगले जाणार आहे. साडेसातीचा जो परिणाम मागील वर्षी वैवाहिक जीवनावर झाला तो आता पूर्ण संपला आहे. त्यामुळे यावर्षी वैवाहिक जीवनात कमी-अधिक प्रमाणात समाधानकारक स्थिती राहणार आहे. वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींच्या दृष्टीने वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला काळ म्हणजे ११ ऑक्टोबरनंतरचा कालखंड. विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने ११ ऑक्टोबरनंतरचा कालखंड अत्यंत चांगला आहे. १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, २ मार्च ते २५ मार्च, २० एप्रिल ते १४ मे, १० जून ते ३१ जुलै, १२ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर हा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत. २७ मार्च १९ एप्रिल तर १५ मे ते ८ जून या कालखंडात वैवाहिक जीवनात मतभेद होणार आहेत.

yesप्रवास / तीर्थयात्रा
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. प्रवासाचे, तीर्थयात्रेचे व परदेश प्रवासाचे योग येतील. २७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी, ३ मे ते १९ जून, १५ जुलै ते १५ ऑगस्ट, ११ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हा  कालखंड प्रवास. तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने अनुकूल आहे. २५ मार्च ते १ मे या  कालखंडात प्रवासामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे.

smileyसुसंधी / प्रसिद्धी व सुयश
सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वसामान्य स्वरूपाचे राहणार आहे. यावर्षी साडेसाती असली तरीही आपली जिद्द व चिकाटी वाढणार आहे. आपल्यातील उमेद वाढणार आहे. याचा फायदा आपल्याला होणार आहे. विशेषत: ११ ऑक्टोबरनंतरचा कालखंड हा सुसंधी लाभण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. या कालखंडात आपल्या कर्तृत्वाला व कर्तबगारीला अपेक्षित अशी संधी लाभेल. वरिष्ठांचे व थोरामोठ्यांचे सहकार्य या कालखंडात आपण मिळवू शकाल.  आपल्या कार्यामध्ये, आपल्या कलेमध्ये, आपल्या अंगिकृत कार्यामध्ये यश मिळणार आहे. तुमच्या कार्यकक्षा रुंदावणार आहेत. तुमचे अनुभवाचे क्षितीज व्यापक होणार आहे. ज्या ज्या गोष्टींची आपण अपेक्षा करत होता ते ते सर्व आपणाला ११ ऑक्टोबरनंतरच्या कालखंडात नक्‍कीच मिळणार आहेत. तुमचे अंदाज अचूक ठरतील. मित्रांचे व नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. १३ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, २ मार्च ते २६ मार्च, ९ जून ते ४ जुलै, २५ जुलै ते २ सप्टेबर, २० सप्टेबर ते ४ ऑक्टोबर, ११ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर, २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड सुसंधीच्या दृष्टीने चांगले आहेत. 

smileyमानसन्मान, प्रतिष्ठा
मानसन्मान, प्रतिष्ठा, एखाद्या मंडळावर नेमणूक, राजकीय कार्यात यश, सार्वजनिक कार्यात गौरव या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना  हे वर्ष सर्वसामान्य स्वरूपाचे ठरणार आहे. तुम्हाला यावर्षी कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. अपेक्षित पद, जागा मिळण्याच्या दृष्टीने ११ ऑक्टोबर नंतरचा कालखंड सर्वात चांगला आहे. या कालखंडात तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. ११ ऑक्टोबरनंतरच्या कालखंडात तुम्हाला राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, आध्यात्मिक संस्था, सांस्कृतिक संस्था या ठिकाणी पद, प्रतिष्ठा लाभेल. आपणाला प्रतिष्ठा लाभेल, अधिकारपद लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा ठसा आपण उमटवू शकाल. आपली चिकाटी, आपले परिश्रम, आपले अनुभव, आपला व्यासंग यांचे चीज होणार आहे. थोरामोठ्यांचे, उच्च पदस्थांचे सहकार्य लाभेल. यामध्ये तुमचे कर्तृत्त्व विशेष उजळून निघणार आहे. साडेसातीची फारशी काळजी करण्याचे कारण नाही. फक्‍त साडेसातीमुळे कामाचा ताण वाढतो, दगदग वाढते, जबाबदारी वाढते. पण या सार्‍यांना तुम्ही समर्थपणाने सामोरे जाल व अंगिकृत कार्यात यशस्वी व्हाल. १५ जानेवारी ते १० फेब्रुवारी, १५ मार्च ते १७ मार्च, १५ मे ते १३ जून, १९ जुलै ते १४ सप्टेबर, १७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हा कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकारपद या दृष्टीने अनुकूल आहेत.
१ जानेवारी ते १३ जानेवारी, १५ जून ते १६ जुलै, १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालखंडात सार्वजनिक कामात थोड्या अडचणी येणार आहेत. 

yesसारांश 
वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना आरोग्याच्या दृष्टीने, सुसंधी मिळण्याच्या दृष्टीने, संततिसौख्याच्या दृष्टीने, मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागण्याच्या दृष्टीने, वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभण्याच्या दृष्टीने, विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने ११ ऑक्टोबर नंतरचा कालखंड अत्यंत चांगला आहे.  आपणाला यावर्षी साडेसाती चालू आहे हे विसरून चालणार नाही. कारण साडेसाती हा प्रकार असा आहे, की यामध्ये आपली गणिते चुकतात, आपले वेळापत्रक मागे-पुढे होते. प्रगतीमध्ये चढ-उतार होत राहतो. आपले अंदाज चुकतात, निर्णय चुकतात व आपण अत्यंत विचारपूर्वक, योजनापूर्वक निर्णय घेवून सुद्धा परिपूर्ण तयारी करूनसुद्धा कामामध्ये अपेक्षित यश लाभत नाही. कामे विलंबाने होतात. अनपेक्षित अडथळे येतात, अडचणी येतात. ११ ऑक्टोबरपासूनचा कालखंड आपणाला सर्व दृष्टीने चांगला आहे. या कालखंडानंतरच आपली सर्व क्षेत्रात प्रगती होईल व आपण आगेकूच करू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल, कौटुंबिक सौख्य लाभेल. साडेसाती आहे तेव्हा अपेक्षित यश न लाभल्यास निराश होवू नये. यशाचे शिखर लाभणार नाही. वर्षाच्या अखेरीस वर्षाचा ताळेबंद पाहता आपल्याला सौख्य, समाधान व प्रगती, यश, उन्नती ही झालेली आहे हे पाहून समाधान लाभेल.

Back to top button