मिथुन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात असामान्य यश | पुढारी

मिथुन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात असामान्य यश

आपणाकडे निसर्गत:च उत्तम ग्रहणशक्ती आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता आहे. पांडित्य आहे. तीव्र स्मरणशक्ती आहे. ज्ञान साधने करीता आपला जन्म असतो. वाचन, चिंतन, मनन, संशोधन, व्यासंग याबद्दल आपली ख्याती असते. आपल्याकडे शोधकपणा असतो. प्रसंगावधान, समयसूचकता, हजरजबाबीपणा, चातुर्य, नर्मविनोद, हसत हसत दुसर्‍यावर टीका करण्याची सवय असते. ही सर्व उत्तम वकिलाला लागणारी गुण वैशिष्ट्ये आपणाकडे असतात. अनेक भाषांवर आपले प्रभुत्व असू शकते. बँकिंग, पोस्ट, टेलिग्राफ, वकील, बातमीदार, संपादक, विमा एजंट, दलाल  जनसंपर्क व प्रसिद्धी अधिकारी, दुभाषी, स्टेनो टायपिस्ट, कॉप्युटर, प्राध्यापक, शिक्षक, संशोधन, प्रिंटिंग प्रेस, आकाशवाणी, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात मिथुन व्यक्ती असामान्य यश संपादन करू शकतात.

smileyआरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे जाणार आहे. संपूर्ण वर्षभर शनीची प्रथमस्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे तुमच्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. मात्र, गुरू अनुकूल आहे. ११ ऑक्टोबर  पर्यंत गुरूची प्रथमस्थानावर दृष्टी असल्यामुळे सौख्य लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आत्मविश्‍वास व मनोबल वाढणार आहे. १२ ऑक्टोबर नंतरच्या कालखंडामध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे भासेल. 
खालील कालखंडात आरोग्याच्या संदर्भात काही प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. काहींना मानसिक अस्वास्थ्य वाटेल. मनावर एक प्रकारचा ताणतणाव राहील. मानसिक उमेद, उत्साह, आशावाद थोडासा कमी होईल. सर्वसामान्यपणे खालील कालखंडात मानसिक कमजोरी राहील. ८ मार्च ते २ मे या कालखंडात आरोग्य बिघडण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या कमकुवतपणा राहील. जबाबदार्‍या थोड्या वाढतील. ६ जानेवारी ते २७ जानेवारी, २० फेब्रुवारी ते १३ मार्च,  ३ मे ते २६ मे, १० जून ते २५ जून, ३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर, ७ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर हा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. १ जानेवारी ते ६ जानेवारी, १४ मार्च ते २ मे, २७ मे ते ९ जून, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडात आपण आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी, २७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालखंडात तुमच्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढेल. त्यामुळे कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. 

smileyव्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
व्यवसाय, व्यापार, उद्योगधंदा, कारखानदारी या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे संपूर्ण वर्ष विशेष समाधानकारक राहणार आहे. हे वर्ष यशदायक व लाभदायक जाणार आहे. विशेषत: ११ ऑक्टोबर पर्यंत व्यवसायात उलाढाल करू शकाल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. १२ सप्टेंबर  नंतरच्या कालखंडात कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. व्यवसायाच्या उलाढालीकडे लक्ष देवू शकाल. 
यावर्षात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाची शाखा सुरू करू शकता. यावर्षी आपणाला व्यवसायात गुरू या ग्रहाचे चांगले पाठबळ लाभणार आहे.  व्यवसायात तुमच्या मनासारखी प्रगती होईल. व्यवसायाची प्रगती करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. परंतु व्यवसायाच्या उलाढालीमध्ये काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी. १ जानेवारी ते १४ जानेवारी, ६ फेब्रुवारी ते २६ मार्च, १० मे ते २६ मे, २६ जून ते ३० जुलै, १९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर हा कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने व अनेकांचे सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने यशदायक ठरेल. १५ जानेवारी ते २६ जानेवारी, २८ मार्च ते २ मे या कालखंडात आपण व्यवसायातील निर्णय विशेष विचारपूर्वक घ्यावेत. १० नोव्हेंबर ते २२ डिसेंबर हा कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगला राहणार आहे.

smileyनोकरी
नोकरीतील मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष विशेष चांगले जाणार आहे.  नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमची नोकरीची जागा चांगली असेल. नोकरीमध्ये वातावरण चांगले असेल. हे संपूर्ण वर्ष बढतीच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. तुमच्या अनुभवाचे, तुमच्या कार्याचे, तुमच्या ज्ञानाचे, तुमच्या बुद्धिमत्तेचे चीज होणार आहे. 
यावर्षी आपणाला वरिष्ठांचे व कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. तुमच्या कार्याचा ठसा उमटविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे कष्ट, तुमचे परिश्रम, तुमचा अनुभव हा कारणी लागणार आहे. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरीच्या संदर्भात संधी लाभेल. हे वर्ष मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या संदर्भात लाभदायक ठरणार आहे.१८ मार्च ते १३ मे, १७ जुलै ते १९ सप्टेंबर, १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर हा कालखंड नोकरीतील व्यक्तींना चांगला जाणार आहे. १ जानेवारी ते १३ फेब्रुवारी, १५ मे ते १४ जून हा कालखंड नोकरीतील व्यक्तींना त्रासदायक जाण्याची शक्यता आहे. १५ फेब्रुवारी ते १७ मार्च, १५ जून ते १६ जुलै, २० सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर, १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड नोकरीतील व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचा ठरेल.

smileyप्रॉपर्टी
मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष प्रॉपर्टी, गाडी, बंगला, जागा, जमिनी, प्लॉट, फ्लॅट, वाहन खरेदी यासाठी हे वर्ष सर्वसामान्य राहणार आहे. या वर्षात मिथुन व्यक्तींना प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात काहीवेळा विलंबाला सामोरे जावे लागणार आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भातील महत्त्वाची कामे रखडल्यास निराश होवू नये. यावर्षी मिथुन राशीच्या व्यक्तींनी प्रॉपर्टीच्या संदर्भातील व्यवहारांमध्ये आपण कोठेही अडकणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच आपण इतरांच्या गुंतवणुकीच्या कामांमध्ये अडकणार नाही याची देखील काळजी घ्यावी.१५ फेब्रुवारी ते १७ मार्च, १ एप्रिल ते २६ मे, २६ जून ते २ सप्टेंबर, १९ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर हा कालखंड प्रॉपर्टी, जागा, गुंतवणूक, वाहन खरेदी यासाठी सौख्यकारक ठरेल. २७ मे ते ९ जून, २७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालखंडात प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. १० जून ते २५ जून, ११ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे.

yesसंततीसौख्य
संततिसौख्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींंना हे वर्ष अत्यंत चांगले जाणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश लाभेल. विशेषत: ११ ऑक्टोबर पर्यंतचा कालखंड हा संततिसौख्यासाठी व विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभण्यासाठी अत्यंत चांगला आहे. या कालखंडात तुमच्या आशाआकांक्षा पूर्ण होतील. 
मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. संततिसौख्य, मुलामुलींची प्रगती, त्यांच्या शाळा, कॉलेजच्या प्रवेशाचे प्रश्‍न, परीक्षांचे निकाल, त्यांचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्‍न व त्यांची एकूण प्रगती या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष लाभदायक आहे. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. विद्यार्थिनींना सुयश लाभेल. मुलामुलींना योग्य शैक्षणिक संस्थेत प्रवेश लाभेल. बरेचसे मुलामुलींच्या व्यक्तिगत पत्रिकेवर अवलंबून राहील. ७ फेब्रुवारी ते १३ मार्च, २५ मार्च ते १९ एप्रिल, ९ जून ते १५ जुलै, २ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड संततीसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, १५ मे ते ८ जून, १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट हा कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे. २० एप्रिल ते १४ मे या कालखंडात संततिसौख्याच्या संदर्भात थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. 

smileyविवाह / वैवाहिक सौख्य
वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. आपणास गुरू वर्षभर अनुकूल आहे. तरी सुद्धा ११ ऑक्टोबर  पर्यंतचा कालखंड विवाहेच्छुंचे विवाह जमण्यासाठी जास्त चांगला आहे. या कालखंडात विवाहेच्छुंचे विवाह जमणे व विवाह होणे या दृष्टीने कालखंड चांगला आहे. 
१२ ऑक्टोबर  नंतरच्या कालखंडात ज्यांच्या जीवनामध्ये अगोदरचेच मतभेद आहेत त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हे मतभेद अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालखंडात सामंजस्याने निर्णय घ्यावेत. गैरसमजांपासून दूर रहावे. वादविवाद टाळावेत. ६ फेब्रुवारी ते १ मार्च, १५ मे ते ८ जून, १ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर हा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. ८ मार्च ते १ मे हा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत. पती-पत्नीमध्ये मतभेदाची शक्यता आहे. ज्यांच्या वैवाहिक जीवनात अगोदरच मतभेद आहेत ते खालील कालखंडात वाढण्याची शक्यता आहे. १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट, २० ऑक्टोबर ते २२ डिसेंबर हा कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे.

yesप्रवास / तीर्थयात्रा
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास, सहली या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक ठरेल. यावर्षी काही विद्यार्थ्यांना शिक्षणानिमित्त प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. तसेच काहींना व्यवसायाच्या उलाढालीकरिता, व्यवसायामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने प्रवासाचे योग येतील. अनेक व्यक्तींना परदेश प्रवासाची संधी मिळेल. अनेकजण तीर्थयात्रेचा लाभ घेवू शकतील. प्रवास सुखकर होतील.
यावर्षी आपण अनेक तीर्थस्थळांना भेटी देवू शकाल. प्रवासामुळे तुमच्या अनुभवात संपन्नतेची भर पडणार आहे. शैक्षणिक कार्यासाठी किंवा उद्योग, व्यवसायासाठी तुम्ही  प्रवास करू शकाल. १५ मार्च ते १४ मे, १८ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर, १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर हा कालखंड प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने चांगला आहे. १७ जानेवारी ते १ मार्च, १५ मे ते १४ जून हा कालखंड प्रवासाच्या दृष्टीने त्रासदायक ठरेल. १८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या कालखंडात प्रवासामध्ये काळजी घेणे महत्त्वाचे आहे. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत किंवा हरविणार नाहीत याची काळजी घ्यावी.

smileyसुसंधी / प्रसिद्धी व सुयश
सुसंधी व प्रसिद्धीच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष विशेष समाधानकारक ठरणार आहे. तुमच्या कर्तृत्त्वाला अपेक्षित संधी लाभणार आहे.  शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना हे वर्ष खूपच चांगले जाणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्ती या मुळातच हुशार असतात. कारण मिथुन ही बौद्धिक राशी आहे. त्यामुळे हे वर्ष आपणाला बौद्धिकदृष्ट्या चांगले जाणार आहे.
हे वर्ष उत्साहाचे आहे. उमेद वाढेल. आशावाद वाढेल. तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार कराल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. तुमच्या अनुभवाच्या कक्षा विस्तारणार आहेत. नवीन स्नेहसंबंध जुळतील. तुमच्या बुद्धिमत्तेचे चीज होईल. तुम्हाला सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमच्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. तुमच्या हातून लेखन होईल व त्याला चांगली प्रसिद्धी लाभेल. 
नवीन ओळखी व परिचय होतील. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार आहेत. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळणार आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. मानसिक सौख्य लाभेल, प्रसन्नता लाभेल, कौटुंबिक सौख्य लाभेल. ७ फेब्रुवारी ते १७ मार्च, १५ एप्रिल ते १० मे, १७ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर, २५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर, २९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड सुसंधी व प्रसिद्धी या दृष्टीने यशदायक ठरेल.

smileyप्रतिष्ठा, मानसन्मान
मिथुन राशीच्या व्यक्तींना प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकारपद यादृष्टीने हे वर्ष विशेष समाधानकारक ठरणार आहे. या वर्षी मिथुन व्यक्तींना सार्वजनिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभणार आहे. तत्यामुळे हे वर्ष विशेष प्रगतीचे, विकासाचे व लाभाचे जाणार आहे. तुमची पावले पुढे पडणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे. तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल.  हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला, कर्तबगारीला संधी मिळणार आहे. तुमच्या अनुभवाचे, बुद्धिमत्तेचे चीज होईल. १३ फेब्रुवारी ते १४ मार्च, २५ मार्च ते २६ मे, १३ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर, ६ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर, २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकारपद या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. याच कालखंडात आपणास सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक क्षेत्रामध्ये सहभागी होण्याची संधी लाभेल. विशेषत: शासकीय क्षेत्रातील अधिकार्‍यांना हा कालखंड यशदायक ठरणार आहे. १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, २८ मे ते ९ जून या कालखंडात मिथुन राशीच्य व्यक्तींनी आपण कोणत्याही गैरव्यवहारात अडकणार नाही याची दक्षता घ्यावी.

laughसारांश
‘मिथुन’ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष व्यवसाय, आरोग्य, संततिसौख्य, अनेकांचे सहकार्य, विद्यार्थ्यांना सुयश, बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश या दृष्टीने चांगले आहे. यावर्षी कौटुंबिक क्षेत्रात, नोकरी, व्यवसायात व सार्वजनिक क्षेत्रात आपली जबाबदारी वाढणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. हे वर्ष विद्यार्थ्यांना असामान्य यशाचे आहे. तुम्हाला हव्या त्या महाविद्यालयामध्ये प्रवास मिळेल. तुम्ही उत्तम कामगिरी करून तुम्ही आपले कर्तृत्व सिद्ध करू शकाल. एका असामान्य कामगिरीची नोंद करू शकाल. संशोधनाच्या क्षेत्रात, साहित्यात, नाट्य, कादंबरी इ. क्षेत्रात महनीय कामगिरी करू शकाल. मिथुन व्यक्ती या बौद्धिक क्षेत्रात चमकतात. त्यामुळे हे वर्ष गुरू अनुकूल असल्यामुळे मिथुन व्यक्तींच्या कला गुणांना चांगली संधी प्राप्त होणार आहे.

Back to top button