मेष : नोकरी, व्यवसाय, आरोग्य, सुसंधी व प्रतिष्ठा लाभणारे वर्ष | पुढारी

मेष : नोकरी, व्यवसाय, आरोग्य, सुसंधी व प्रतिष्ठा लाभणारे वर्ष

मूर्तीमंत, चैतन्य, उसळणारे तारुण्य व ओसंडून जाणारा उत्साह हे मेष राशीचे वैशिष्ट्य आहे. युद्धभूमीवर, रणांगणावर, कुस्तीच्या आखाड्यात धैर्याने व तेजाने पराक्रम करून चमकणारी आपली रास आहे. आपल्याच धुंदीत व मस्तीत बेगुमानपणे व उन्मत्तपणे आक्राळविक्राळ लाटांनी फेसाळत दुथडी भरुन पूर आलेल्या व वेगाने वाहणार्‍या नदीसारखा आपला स्वभाव आहे. संकटकाळी न घाबरणारी साक्षात मृत्युच्या जबड्यात प्रवेश करणारी आपली रास आहे. कसल्याही नाठाळ घोड्याला वठणीवर आणणारी आपली रास आहे. कसलेल्या स्वाराप्रमाणे आपली घोड्यावरील मांड पक्की असते. झुंजारपणा हे आपले खास वैशिष्ट्य आहे. 

yesआरोग्य

आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगल्या स्वरूपाचे ठरणार आहे. विशेषत: दि. १२ ऑक्टोबर पर्यंतचा कालखंड आरोग्याच्याच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. या कालखंडात सौख्य व समाधान लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. या कालखंडात आपण व्यवसायाकडे लक्ष देवू शकाल. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडू शकाल. दि. १२ ऑक्टोबर  पर्यंतच्या कालखंडात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. या कालखंडात व्यवसायामध्ये वाढ करू शकाल. सर्वसाधारणपणे हे वर्ष मेष व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने चांगले जाणार आहे. ०२ जानेवारी ते १८ जानेवारी, ०३ मे ते ०७ जुलै, ०१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २० सप्टेंबर ते ०४ नोव्हेंबर या कालखंडामध्ये आरोग्य चांगले राहणार आहे. १८ जानेवारी ते ०७ मार्च, २९ मार्च ते ३१ एप्रिल, २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडामध्ये आपल्याला प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे भासेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  या कालखंडात प्रकृतीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.   ०८ मार्च ते २८ मार्च, ०८ नोव्हेंबर या कालखंडामध्ये तुमच्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. 

yesव्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूपच चांगले जाणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकता. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात धाडस करू शकता. व्यवसायामध्ये नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. यावर्षी आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने दि. 12 ऑक्टोबर 2018 पर्यंतचा कालखंड चांगला आहे. या कालखंडात आपल्याला नवनवीन योजनांची अंमलबजावणी करता येईल.  खालील कालखंड आपणाला आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले जाणार आहेत. २७ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, २१ फेब्रुवारी ते ०१ मार्च, १९ एप्रिल ते १४ जून, १७ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर, ०१ सप्टेंबर ते ०८ नोव्हेंबर, २२ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर हे कालखंड व्यवसाय करणार्‍या व्यक्तींना लाभदायक ठरणार आहेत तर व्यवसाय न करणार्‍या व्यक्तींनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आर्थिक लाभ होणार आहेत. ०६ मार्च ते १८ एप्रिल हा कालखंड व्यवसायाच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. या कालखंडात महत्त्वाचे निर्णय बाजारपेठेचा चौफेर अभ्यास करून घ्यावेत.

laughनोकरी
हे वर्ष मेष व्यक्तींना नोकरीमध्ये समाधानकारक राहणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. या वर्षी आपल्यावरील जबाबदारीचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या संधीचा फायदा करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या कर्तृत्त्वाला अपेक्षित संधी लाभेल. नोकरीमध्ये आपले म्हणणे इतरांनी ऐकलेच पाहिजे असा दृष्टिकोन ठेवून चालणार नाही. हे वर्ष यशाचे आहे व बढतीचे आहे. तुमच्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. तुमच्या कर्तृत्त्वाची, कर्तबगारीची, ज्ञानाची व अनुभवाची दखल घेतली जाणार आहे व तुम्हाला पदोन्नती किंवा बढती लाभणार आहे. १५ जानेवारी ते १४ मार्च, १५ जून ते १६ जुलै, १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड नोकरीतील व्यक्तींना अनुकूल ठरणार आहेत.१५ एप्रिल ते १४ मे, १७ आक्टोबर ते ०७ नोव्हेंबर हा कालखंड मेष व्यक्तींना बढतीच्या दृष्टीने चांगला आहे. 
१७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर हा कालखंड नोकरीच्या दृष्टीने चांगला जाणारच आहे. परंतु या कालखंडा वरिष्ठांचे व थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. ०१ जानेवारी ते १३ जानेवारी, १७ सप्टेंबर ते १६ आक्टोबर, १८ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर हे कालखंड नोकरीतील व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहेत. या कालखंडात वरिष्ठांकडून फार सहकार्याची अपेक्षा करू नये. थोरामोठ्यांबरोबर मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

laughप्रॉपर्टी
प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या दृष्टीने मेष व्यक्तींना हे वर्ष सामान्य स्वरूपाचे ठरणार आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारपेठेचा संपूर्ण अभ्यास करावा. घाई, गडबडीत कोणतीही गुंतवणूक करू नये. गडबडीने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. तरीही दि. १२ ऑक्टोबर नंतर प्रॉपर्टीच्या व्यवहारात येणार्‍या अडीअडचणी कमी होतील. प्रॉपर्टी, गाडी, बंगला, जागा, जमिनी, गुंतवणूक या दृष्टीने हे वर्ष सर्वसामान्य आहे. परंतु ज्यांना प्रॉपर्टीचे व्यवहार करणे गरजेचे आहे त्यांना खालील कालखंड लाभदायक ठरतील. १४ जानेवारी ते ०१ मार्च, २७ मार्च ते १८ एप्रिल, ०९ जून ते ०३ जुलै, ०२ सप्टेंबर ते ०८ नोव्हेंबर, ०५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने अनुकूल ठरतील. ०१ जानेवारी ते १२ जानेवारी, ०२ मार्च ते २६ मार्च, १५मे ते ०८ जून, ०१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट हे कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरेल.

smileyसंततीसौख्य
हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींना संततिसौख्याच्या दृष्टीने चांगले जाणार आहे. मागील वर्षी आपणाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असेल. परंतु त्या अडचणी आता कमी होणार आहेत. मुलामुलींना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढेल. मागील वर्षी दि. २५ ऑक्टोबर २०१७  रोजी शनीचा धनु राशीमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्या समस्यांना, कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले ते आता संपणार आहे. हे वर्ष मुलामुलींच्या प्रगतीसाठी, विकासासाठी अत्यंत चांगला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे अपेक्षित फळ मिळेल.
मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. शाळा, कॉलेजच्या प्रवेशाचे प्रश्‍न मार्गी लागतील.विद्यार्थ्यांची जिद्द व चिकाटी वाढणार आहे. सर्वसामान्यपणे संततिसौख्याच्या दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत चांगले ठरणार आहे. मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत उरकून घ्यावेत. १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, १४ एप्रिल ते १४ मे, १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर, १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर, १७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने मुलामुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल व यशदायक ठरणार आहेत. ०१ जानेवारी ते १२ जानेवारी, १५ मार्च ते १२ एप्रिल, १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर, २० नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालखंडात काहींना मुलामुलींच्या प्रगतीसाठी जादा खर्च करावा लागेल. या कालखंडात विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत. या कालखंडात अपेक्षित यश न मिळाल्यास निराशावादी होवू नये. १४ फेब्रुवारी ते १४ मार्च, १७ जुलै ते १५ ऑगस्ट हा कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने मेष व्यक्तींना संमिश्र स्वरुपाचा ठरणार आहे.

heartविवाह / वैवाहिक सौख्य
वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींना समाधानकारक ठरणार आहे. विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. सध्या गुरू सातवा आहे. परंतु दि. १२ ऑक्टोबर २०१८ ला गुरू वृश्‍चिक राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे दि. १२ ऑक्टोबर २०१८  नंतर मेष राशीच्या व्यक्तींना गुरू आठवा होणार आहे. दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा कालखंड विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. या कालखंडामध्ये प्रयत्नवादी रहावे. या कालखंडात सर्वसामान्यपणे वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. आरोग्याची अपेक्षित साथ लाभेल. दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतर वैवाहिक जीवनात शांत व संयमी रहावे. या कालखंडात महत्त्वाची कामे मार्गी न लागल्यास निराश होवू नये. या कालखंडात मतभेद टाळावेत. १६ जानेवारी ते ०१ मार्च, २७ मार्च ते १० मे, १० जून ते ०४ जूलै, ०१ आक्टोबर ते ०५ नोव्हेंबर, २७ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर हा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.१५ मे ते ०८ जून, ०१ ऑगस्ट ते ३१ सप्टेंबर हा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत. ०१ जानेवारी ते १३ जानेवारी, ०२ मार्च ते २६ मार्च हे कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचे आहेत.

smileyप्रवास / तीर्थयात्रा
प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे. यावर्षी काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. काहींना परदेश प्रवासाची संधी मिळेल. परंतु प्रवासामध्ये काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रवासामध्ये वस्तू हरविणार नाही किंवा गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना व्यवसायानिमित्त प्रवास घडतील. दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा कालखंड स्थूलमानाने प्रवासासाठी चांगला आहे.  २८ जानेवारी ते ०२ मार्च, २७ मार्च ते १८ एप्रिल, १० जून ते ०४ जुलै, ०३ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर हे कालखंड प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने चांगले आहेत. ०३ मार्च ते १७ मार्च, ०४ जुलै ते ०२ सप्टेंबर, २७  ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड मेष राशीच्या व्यक्तींना प्रवासाच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहेत. ०१ जानेवारी ते २४ जानेवारी, १८ मार्च ते २६ मार्च, १९ एप्रिल ते ०२ मे हे कालखंड मेष राशीच्या व्यक्तींना प्रवासाच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत. या कालखंडामध्ये प्रवासात वस्तू गहाळ होणार नाही किंवा हरविणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये सावधगिरी बाळगावी.

smileyसुसंधी / प्रसिद्धी व सुयश
सुसंधी, प्रसिद्धीच्या दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत चांगले जाणार आहे. विशेषत: दि. 12 ऑक्टोबर 2018 पर्यंतचा कालखंड अपेक्षित संधी मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. या कालखंडात तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल. या कालखंडात काहींना गुरूकृपा लाभेल. तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. नवीन परिचय होतील. सामाजिक व सांस्कृतिक व धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमचे क्षेत्र व्यापक व विशाल होईल. नवीन परिचय होतील. नवीन स्नेहसंबंध जुळतील. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. लेखन, प्रकाशन, कला, संगीत, नाट्य, चित्रकला, शिल्पकला व इतर तुमच्या आवडीच्या क्षेत्रात व तुमच्या छंदात तुम्हाला चांगली संधी लाभणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. तुमची कामे मार्गी लागतील. ०७ जानेवोरी ते ०१ मार्च, १४ मे ते २५ जून, ०४ जुलै ते ०१ ऑगस्ट, ०६ आक्टोबर ते १२ आक्टोबर हे कालखंड सुसंधी, प्रसिद्धी व कार्यामध्ये सफलता या दृष्टीने अनुकूल ठरणार आहेत.०३ मार्च ते ०९ मे. २७ आक्टोबर ते ०८ नोव्हेंबर, २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड सुसंधीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे. 

smileyप्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता
प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता, सार्वजनिक, राजकीय, सामाजिक, सहकार या सर्व क्षेत्रातील मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत यशदायक, लाभदायक  ठरणार आहे. शक्यतो दि. 12 ऑक्टोबर 2018 पर्यंत आपण ज्या पदाची अपेक्षा करत आहात ते पद या कालखंडापर्यंत लाभणार आहे.  वृत्तपत्रातून तुम्हाला प्रसिद्धी लाभेल. वरिष्ठांच्या, थोरामोठ्यांच्या प्रशंसेला तुम्ही पात्र व्हाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या कार्याचे, अनुभवाचे चीज होईल. प्रशंसा होईल. एखादी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. मानसन्मानाचे योग येतील. पद, प्रतिष्ठा लाभेल. त्यामुळे महत्त्वाची कामे शक्यतो दि.१२ ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या कालखंडातच उरकून घ्यावीत.  तुमच्या यशाचा अनेकांना हेवा वाटेल.  प्रतिष्ठा, अधिकार यावर्षी लाभणार आहे. तुमच्या यशाच्या आड आता कोणी येवू शकत नाही. तुमची पावले प्रगतीच्या दिशेने पडणार आहेत. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. यावर्षी तुम्ही आघाडीवर राहणार आहात. नेतृत्त्व करणार आहात. नेतृत्त्व तुमच्याकडे आपोआप चालून येईल. तुम्ही तुमची योग्यता सिद्ध कराल. 
१४ जानेवारी ते ११ फेब्रुवारी, १५ एप्रिल ते १३ मे, २० ऑगस्ट ते १५ सप्टेंबर, १८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड प्रतिष्ठा, पद या दृष्टीने चांगले आहेत. ०१ जानेवारी ते १३ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १३ मार्च, १७ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालखंडात मेष व्यक्तींनी आपल्या मानसन्मान, प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. १५ जून ते १२ जुलै हा कालखंड मेष राशीच्या व्यक्तींना मानसन्मान व प्रतिष्ठेच्या दृष्टीने संमिश्र स्वरुपाचा ठरणार आहे. 

laughlaughlaugh

सारांश

मेष राशीच्या व्यक्तींना आगामी वर्ष आरोग्याच्या दृष्टीने चांगले जाणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाईक़ांचे, मित्रांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील. हे वर्ष मेष व्यक्तींना अयंत आनंदाचे, साफल्याचे, आर्थिक लाभाचे व संपन्नतेचे जाणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. तुम्ही ज्या एका चांगल्या काळाची अपेक्षा करत होता तो कालखंड व ते वर्ष आता आपणाला लाभणार आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. अनेक कामे मनासारखी होतील. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. नोकरी, व्यवसाय, प्रॉपर्टी या सर्व दृष्टीने आपल्या आशाआकांक्षा सफल होणारे असे हे वर्ष आहे.  मेष व्यक्तींनी या वर्षाकडे आशेने व अपेक्षेने पहावयास हरकत नाही. 

Back to top button