आजची रेसिपी; झटपट रव्याचा डोसा | पुढारी

आजची रेसिपी; झटपट रव्याचा डोसा

थंडीच्या दिवसात जीभेचे चोचले पुरवण्यासाठी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. पण, झटपट होईल असे काय करावे हा प्रश्न गृहीणींना पडलेला असतो. यासाठी जाणून घ्या ‘झटपट होणारा रवा डोसा’

yesबनवण्यासाठी लागणारे साहित्य
१ वाटी बारीक रवा

१ वाटी तांदळाची पिठी

१ वाटी मैदा

१ वाटी आंबट दही

तेल आणि मीठ

yesपाककृती

>रवा, तांदळाची पिठी,मैदा आणि आंबट दही एकत्र भिजवावे. 

>दोन तास हे मिश्रण असेच ठेवावे. 

>या मिश्रणात २ टेबलस्पून तेलाचे मोहन आणि मिठ घालावे.

>मीठाचे पाणी मारून डोश्यासाठी तवा तयार करून घ्यावा. 

>डावाने पातळ धिरड्याप्रमाणे डोसे घालावेत.

>पाव चमचा तेल सोडून हलकेच काढून चटणीबरोबर खाण्यास द्यावा.

 

Back to top button