#Positive : जरा पॉझिटीव्ह भी जिके देखो | पुढारी

#Positive : जरा पॉझिटीव्ह भी जिके देखो

पुढारी ऑनलाईन टीम 

जीवनात अनेक बरे वाईट प्रसंग येत असतात. अशा प्रसंगांवरूनच तुमचे येणारे भविष्य ठरत असतं. भविष्यात तुमचा स्वभाव, तुमच्या जीवनशैलीमध्ये होणारे बदल हे जीवनात येणारे असे प्रसंगच ठरवत असतात. कोणाच्या जीवनात जर एकामागोमाग वाईट प्रसंग आले तर त्याचा स्वभाव चिडचीडा बनू लागतो. तो व्यक्ती निराश होऊन जातो. पण, याऊलट जर एखाद्याला फक्त सुखच मिळत गेलं तर तो स्वत:ही आनंदी राहतो व इतरांनाही सकारात्मक विचारांनी प्रभावित करतो.  आनंदी असताना आपल्याला एकप्रकारचा एनर्जेटीक फिल येतो. ताण- तणावामध्ये आपण कोणत्याही बाबतीत योग्य निर्णय घेऊ शकत नाही. तेव्हा नेहमी आनंदी आणि पॉझिटीव्ह राहण्याचा प्रयत्न करा. या काही टीप्समूळे तुम्हाला तुमच्या जीवनातील हरवलेला आनंद पून्हा गवसेल. 

smiley तुमचा जीवन जगण्याचा दृढनिश्चय हे आनंदी राहण्यामागचे मुख्य कारण असू शकतं. जीवनात काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहील्यास तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस एन्जॉय करू शकता. heart

smiley तुम्ही तुमच्या ध्येयाविषयी नेहमी फोकस असंणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं तुम्ही येणारे अडथळे आणि तणावावर यशस्वीरित्या मात करू शकता. heart

smiley एखाद्याला मदत करावी असं वाटल्यास नि:स्वार्थीपणे त्यांना मदत करा. कारण यामुळे तुम्हाला मनातून आनंद होईल. heart 

smiley तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला अयशस्वी होण्याची भिती घालत असतात. प्रत्येकाच्याच बाजूला एखादा तरी असा नकारात्कम व्यक्ती असतो.  पण, स्वत:वर विश्वास ठेऊन काम करत राहील्यास त्यातून मिळणारा आनंद अमूल्य असतो.  heart

smiley धाडस आणि आनंद यांच्यामध्ये परस्परसंबंध आहे. तुम्ही जर बोल्ड असाल तर कोणतागी निर्णय घेण्याची भिती तुम्हाला वाटत नाही आणि त्यामुळे अशा स्वभावाच्या व्यक्ती नेहमी तणावमुक्त असतात. मनातून भिती दूर करून तुम्ही एखादे धाडस करून पहाच. heart

smiley तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींचाच नेहमी विचार करत रहा. उदास वाटत असल्यास तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी भेट दिल्याचे किंवा तुमच्या पसंतीची डिश एंजॉस करत असल्याचे इमॅजिन करत रहा. heart 

indecision नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती माझ्याकडून होईल की नाही, असा विचार करत बसू नका. मी घेतलेले काम व्यवस्थित आणि यशस्वीरीत्या पूर्ण करेन, हा विश्वास बाळगा आणि काम पूर्ण करा. heart

smiley असं म्हणतात की जीवनात फक्त एकच व्यक्ती तुम्हाला जींकवू शकते आणि तीच व्यक्ती तुम्हाला हारवूही शकते ती म्हणजे तुम्ही स्वत:…तुम्ही जो  विचार करता त्यावर तुमचं यश आणि अपयश ठरलेलं असतं. So Frinds Think Positive ..And Be Happy heart

Back to top button