#Teddyday आपका टेडी आपका इंतजार कर रहा है | पुढारी

#Teddyday आपका टेडी आपका इंतजार कर रहा है

पुढारी ऑनलाईन टीम

व्हॅलेनटाईन वीक सेलिब्रेट करत असणऱ्यांसाठी आजचा दिवस खासच म्हणावा लागेल. कारण, आज टेडी डे आहे…प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एखादा व्यक्ती असतो जो त्याला समजून घेतो. त्याची काळजी घेतो त्याला नेहमी प्रोत्साहन देत असतो…या स्पेशल व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्यातील टेडी म्हणू शकता..त्याला एक छानसा टेडी गिफ्ट करू शकता. heart

‘प्रेम’ ही भावना व्यक्त करण्यासाठी खरंतर  कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. पण, व्हॅलेनटाईन वीकमधील प्रत्येक दिवस अगदी खासच असतो. या सर्व दिवसात तुम्ही तुमच्या पार्टनरला अनेक गिफ्ट देऊन खुश (इम्प्रेस) करू शकता. पार्टनरचा होकार हवा असेल तर मात्र तुम्हाला या टेडीचा आधार घ्यावाच लागेल. heart

व्हॅलेनटाईन डेच्या उत्साहात भर घालण्यासाठी हा वीक साजरा केला जातो. रोज डे, प्रपोज डे नंतर तरूणाई आज टेडी डे साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. एकमेकांना गिफ्ट देऊन, मित्रांसोबत ट्रीप एन्जॉय करत तरूणाई ऐकमेकांना टेडी बिअर गिफ्ट करते. हे टेडी लहानापासून मोठ्या साईजमध्ये परवडतील अशा दरात  बाजारात उपलब्ध आहेत. अगदी ५० रूपयांपासून ५००० हजार रूपयांपर्यत आकर्षक टेडी मिळतात. heart

असं म्हणतात की, प्रेमाचे आणि प्रत्येक ऋतूचे वेगळ नाते आहे. प्रेम पावसाळ्यात तुम्हला चिंब भिजवून मनाला गारवा देते तर हिवाळ्यात गवतावर साचलेल्या चमकदार दवबिंदूप्रमाणे प्रेम चमकदार भासते. प्रेम म्हणजे, शिशीर ऋतूमध्ये वाळलेल्या झाडावर नव्याने येणारी कोवळी पालवी असते त्याच झाडावरील नव्या पालवीसोबत गाणाऱ्या कोकीळेचं गाणंही प्रेमच असतं. प्रेम निसर्गातील प्रत्येक जीवामध्ये आहे. फक्त ते समजून घेण्याची गरज आहे. heart

टेडी बियर गिफ्ट करण्याची काही खास कारणे आहेत. यापैकी एक म्हणजे, मुलींना टेडी खूप आवडतो. तो क्यूट असतो. मुली त्याच्याशी गप्पा मारत असतात. जर तुम्हालाही एखाद्या मुलीला गिफ्ट द्यायचे असेल तर ते टेडीच द्या. टेडीमध्ये अनेक रंग आहेत. त्यापैकी ‘बेबी पिंक’, किंवा सॉफ्ट पिंक रंगाचे टेडी मुलींना आवडतात. प्रियकराच्या विरहात असलेली प्रेयसी या टेडीसोबत प्रियकराच्या आठवणी शेअर करते. मग तुम्हलाही तुमच्या प्रेयसीला आठवणी रमवायचे असेल तर खास रंगाचे आकर्षक टेडी गिफ्ट करा. heart

टेडी डे साजरा करताना तुम्ही फक्त प्रियकर अथवा प्रेयसी यांनाच नाही तर तुमच्या मित्र-मैत्रीणींनाही गिफ्ट देऊ शकता.so friends…चलो उठो ..और अपने इस स्पेशल दिन को और भी स्पेशल बनाओ…आपका टेडी आपका इंतजार कर रहा है….heartheartheartheartheartheart

 

Image result for teddy

Back to top button