गुगल जीबोर्डवरून पाठवा जीआयएफ | पुढारी | पुढारी

गुगल जीबोर्डवरून पाठवा जीआयएफ | पुढारी

सांगली : अमोल हंकारे  

गुगलचा जीबोर्ड हे एक की-बोर्डचे  अ‍ॅप आहे. त्यावर बर्‍याच गोष्टी करता येतात त्यामध्ये एकदम जलद गतीने टाईप करता येते. तसेच आवजाद्वारेही टाईप करता येते. सर्च करून आहे त्या अ‍ॅपमध्ये लगेच टाकता येते. त्यामध्ये क्रिकेट स्कोर असू दे किंवा हवामान लगेच माहिती सर्च करून आहे त्या अ‍ॅपमध्ये राहून पाठवता येते. तसेच इमोजी सर्च करून टाकता येते. अगदी जीआयएफ सुद्धा टाकता येते. गुगलने आपल्या जीबोर्ड अ‍ॅपचे अपडेट सादर केले आहे. यात कुणाही युजरला स्वत:ची जीआयएफ या प्रकारातील प्रतिमा काढून ती शेअर करता येणार आहे. गुगलच्या जीबोर्ड अ‍ॅपवर गतकाही महिन्यांपासून जीआयएफ प्रतिमा घेण्याची सुविधा होती. मात्र ही प्रक्रिया काहीशी क्लिष्ट होती. आता याला सुलभ करण्यात आले आहे. जीबोर्ड अ‍ॅकपचे ताजे अपडेट अँडरॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आले आहे. यात जीआयएफ प्रतिमा घेण्याची सुविधा अधिक सुलभ करण्यात आली आहे. यात अ‍ॅपवर असणार्‍या अक्षरांच्या वर कॅमेर्‍यात लूपचे चिन्ह दर्शविण्यात आले आहे. यावर क्लिक केल्यावर स्मार्टफोनमधील कॅमेरा सुरू होतो. यानंतर कुणीही  सेंकदचा लूप  व्हिडीओ जीआयएफ अ‍ॅनिमेशनच्या स्वरूपात घेऊ शकतो. ही जीआयएफ प्रतिमा सोशल मीडियात शेअर करता येते. याशिवाय, फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये एक मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो शेअर करण्याची सुविधाही आहे.         

Back to top button