निसर्ग ट्रेकर्सकचा आवडता माहुली किल्ला (Video)  | पुढारी

निसर्ग ट्रेकर्सकचा आवडता माहुली किल्ला (Video) 

ठाणे : अमोल कदम

ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळील डोंगररांगेतील माहुली किल्ला हा ट्रेकर्सच्या दृष्टीने चढाई करण्याकरीता सोपा समजला जातो. त्यामुळे या किल्यावर सुट्टीच्या दिवशी किल्याचा परिसर ऐतिहासिक पाहुल खुणा पाहण्याकरिता राज्यातील ट्रेकर्स मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. तसेच परदेशातून येणारे ट्रेकर्स देखील या ठिकाणी ट्रेकिंग करण्याकरीता येत आहेत. त्यामुळे या किल्यावर सतत गिर्यारोहक येत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=OfKDG63kyhU

ठाणे जिल्ह्यात शहापूरपासून काही अंतरावर्ती हा किल्ला आहे. तसेच आसनगाव रेल्वे स्थानक जवळून देखील या किल्यावर जाता येते. इतिहासकालीन माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून असे तीन किल्ले या डोंगररांगेत आहेत. त्यापैकी माहुली किल्ला आणि भंडारगड किल्ला पाहण्याकरिता ट्रेकर्स गर्दी करत असतात. किल्ल्यावर्ती मुख्य दरवाजा, राजवाडे, तलाव, मंदिर, कल्याण दरवाजा, हनूमान दरवाजा, वीरगळ तसेच जंगलाचा निसर्ग पाहण्याकरिता अनेक ट्रेकर्स तसेच नागरिक या माहुली किल्यावर गर्दी करत असतात. किल्ल्याच्या पायथ्याशी वनविभागाच्या वतीने राहण्याकरीता कॉर्टर्स बांधण्यात आल्या आहेत. या कॉर्टर्सचे भाडे प्रति नागरिक शंभर रुपये असून पहिल्यांदा आठवड्यातून तीन दिवस या किल्यावर ट्रेकर्सची गर्दी असायची परंतु आता या किल्यावर जाण्याकरिता वनविभागाच्या वतीने पायवाटा तसेच दरीच्या ठिकाणी लोखंडी ग्रील लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे या किल्यावर जाणे अगदी सोपे झाले आहे. 

दररोज या किल्ल्यावर्ती राज्यातील पर्यटक तसेच परदेशी पाहुणे देखील येत आहेत. सुमारे अडीच तास या किल्यावर जाण्याकरीता लागतात तसेच किल्यावरुन शहापूर परिसर डोंगररांग तसेच ठाणे जिल्ह्याचा परिसर दिसतो. त्यामुळे या निसर्ग रम्य माहुली किल्ला परिसर मध्ये राज्यभरातून तसेच परदेशातून ट्रेकर्स, गिर्यारोहक येऊन ट्रेकिंगचा आनंद घेत आहेत.

Back to top button