स्‍मार्टफोनधारकांनो थर्ड पार्टी अॅपपासून सावधान! | पुढारी

स्‍मार्टफोनधारकांनो थर्ड पार्टी अॅपपासून सावधान!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

स्मार्टफोन धारकांनी थर्ड पार्टी अॅपला परवनागी देताना सावधानता बाळगण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. फेसबुक डाटा लीकच्या प्रकरणानंतर इंटरनेट तज्ञांनी अॅपद्वारे डेटा चोरीच्या प्रकार सहज शक्य असल्याचे म्हटले आहे. थर्ड पार्टी अॅप तुमच्या नकळत तुमची वैयक्तिक माहिती मिळवणे सहज शक्य असल्याचे तज्ञांनी मान्य केले आहे. 

 

नेटवर्क इंटेलीजेंसचे ग्‍लोबल बिजनेस हेड अल्‍ताफ यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन युजर्सनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापर करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही थर्ड पार्टी अॅपला परवानगी देताना अटी व नियम बारकाईने पाहावे, असे त्यांनी म्हटले आहे.  यासंदर्भात उदाहरण देताना ते म्हणाले की, अनेक ऑनलाईन गेमसाठी संबंधित अॅप युजर्सला मोबाईल नंबर आणि ई-मेल नोंदवण्याची अट घातलेली असते. गेमसाठी या गोष्टींचा काहीही संबंध नसतो. पण युजर्स कोणताही विचार न करता सूचनांचे पालन करतो. ही सवय भविष्यात मोठ्या धोक्याला आमंत्रण देणारी आहे, असे अल्‍ताफ यांनी सांगितले.

भारतात थर्डपार्टी अॅपचे मोठे जाळे  

दक्षिण आशियातील कॅस्परस्काय लॅबचे जनरल मॅनेजर श्रेणिक भयानी म्हणाले की, डिजिटल युगात डाटा चोरी प्रकार हा अतिशय धक्कादायक आहे. फेसबुकप्रमाणे डाटा चोरी होण्याचा प्रकार पहिला आणि शेवटचा नाही, असेही ते म्हणाले.  आणखी एका तज्ज्ञाच्यामते, सायबर वर्ल्‍ड में डाटा चोरी नवीन नाही.  हे प्रकार रोखण्यासाठी सरकार आणि खासगी संस्थांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. पी फ्रोस्‍ट एंड सुल्‍लीवन इंडस्‍ट्री एनालिस्‍ट डिजिटल ट्रान्सफरमेशन (आईसीटी) राजर्षी धर यांनी भारतामध्ये सर्वाधिक युजर्स असल्याचे सांगत भारत थर्ड पार्टी अॅप डेव्हलपर्स आणि डाटा हार्वेस्‍टर्ससाठी मोठी बाजारपेठच असल्याचे म्हटले आहे.   

राजर्षी धर पुढे म्हणाले की, कोणत्याही अकाऊंटमधील युजर्स  प्रोफाइलमध्ये कमीत कमी माहिती देण्याचा प्रयत्न करा. अधिक हिट, लाइक्स आणि शेयर करण्याच्या फंदात युजर्संनी व्‍यक्तिगत डाटा शेअर करुन जोखीम स्वीकारु नये, अशी सुचनाही त्यांनी दिली आहे.  

Back to top button