UAE तील ‘आमी’ परिवाराच्या ‘आर्मी’ची चर्चा तर होणारच! | पुढारी

UAE तील 'आमी' परिवाराच्या 'आर्मी'ची चर्चा तर होणारच!

पुढारी ऑनलाईन टीम 

सध्याच्या डिजिटल युगात व्हॉट्सअॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपली प्रिय व्यक्ती किंवा आपल्या परिसरातील व्यक्तीं कनेक्टिंग ठेवून निर्माण झालेले स्नहाचे नाते अतूट ठेवण्याचे प्रमुख व्हॉटसअॅप हे प्रमुख माध्यम बनले आहे. याच माध्यमाच्या आधारावर महाराष्ट्रातील मराठी भाषिकांनी सातासमुद्रापलिकडे आमी परिवार अर्थात ‘अखिल अमिराती मराठी इंडियन्स’ या नावाने व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नवी वस्ती बसवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा ग्रुप दिवसेंदिवस विस्तारत गेला. सध्याच्या घडीला हा ग्रुप आखाती देशातील सर्वात मोठ्या संख्येचा व्हाट्सअँप ग्रुप बनला आहे.  नुकतीच या ग्रुपला दोन वर्षे पूर्ण झाली.  

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून  नोकरी, उद्योगधंदा करण्यासाठी स्थायिक झालेले किंवा नोकरीच्या शोधात आलेल्या बांधवांच्या समस्या दूर करण्याच्या हेतूने  आमीचे संस्थापक श्री. संतोष कारंडे यांनी कल्पना सुचल्यानंतर ती लगेच अंमलात आणली. अल्पावधीतच २५६ जणांची मर्यादा पार केल्यानंतर याच नावने तब्बल अनुक्रमे १,२. ३ असे एकूण सतरा आणि फक्त डॉक्टरांचा अशा अठरा  ग्रुपमध्ये तब्बल ४००० पेक्षा अधिक सभासद आहेत.  

विशेष म्हणजे  AAMI (आमी) परिवार गटचे सभासद होण्यासाठी  नियमावलीचे पालन करणे अनिवार्य आहे. १) या गटात जोडला जाणारा सभासद हा यूएई मधील मराठी भाषिक असावा. २) त्या सभासदाचा स्थानिक संपर्क क्रमांक असावा. (व्हॉटसअँप क्रमांक भारताचा असेल तर चालेल)  ३) जर एखादा सभासद थोड्या कालावधीसाठी पर्यटक अथवा नोकरी शोधण्यासाठी आला असल्यास तसे प्रशासनाला कळविणे गरजेचे आहे.  ४) या गटामध्ये शुभसकाळ, शुभरात्र, दिनविशेष  राजकिय संस्था किंवा व्यक्ती यांच्याबद्दल माहिती अथवा चर्चा करता येत नाही. ५) आमीच्या प्रत्येक सभासदाने यूएई सरकारच्या नियमा वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमांचे पालन करावे. ६) जर एखाद्या सभासदाला वाटले कि मी दिलेली माहिती खूप महत्वाची आहे, अशी माहिती किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.   

Tags : Maharashtra, Biggest whatsapp Group, UAE 

Back to top button