पायाचे सौंदर्य खुलवणारा दागिना ‘पैंजण’ | पुढारी

पायाचे सौंदर्य खुलवणारा दागिना 'पैंजण'

पुढारी ऑनलाईन :  

फॅशन हा सर्व महिला वर्गाचा आवडता विषय आहे. हाताच्‍या नखापासून ते पायापर्यंत आपण कसे छान दिसू यासाठी त्‍या नेहमी प्रयत्‍न करत असतात. बाजारात कोणता फॅशन ट्रेंड आहे याविषयी महिला नेहमी जागरुक असतात. त्‍यातही पायाच्या सौंदर्याविषयी महिलावर्ग विशेष जागरूक असतो.  त्‍यासाठी पायाच्‍या नखांना नेल पॉलीश लावणे, टोज रिंग घालणे एवढेच नाहीतर पायात पैंजण घालण्याचीही अनेकींना आवड असते. पैंजण हा तर महिलांचा आवडता दागिना आहे. लहान-मोठ्या मुली आणि महिलावर्ग सर्वच याला पसंती देतात. सध्या फॅशनेबल आणि विविध प्रकारचे पैंजण बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची निवड करू शकता.

 

Image result for anklet

पूर्वी या पैंजणला ‘तोडे’ असेही म्हटले जायचे. यामध्ये चांदी, सोने, डायमंड, कुंदण, हॅम्प, वूडन, प्लास्टिक, ज्यूट अँकलेट आदी प्रकार आहेत. यामुळे पाय नाजूक आणि आकर्षक दिसून त्यांचा लुकच बदलतो. तुमच्‍या पायाची शोभा वाढविण्‍यास मदत होते.

Image result for anklet

महिला चांदीच्या पैंजणला अधिक पसंती देतात. तसेच डायमंड, क्रिस्टल आणि सोन्याचे पैंजणही आपणास बाजारात मिळतात.  यामध्ये छोट्या-मोठ्या सर्वच प्रकारच्या अनेक डिझाईनची पैंजण उपलब्ध आहेत. 

 

Image result for anklet

छोट्या बाळांना छमछम वाजणारे घुंगराचे पैंजण सर्वजण घालताना दिसतात. तसेच हल्‍ली मुली वेगवेळा ड्रेसअप करत असतात. अशावेळी काही ड्रेसवर पैंजण उठून दिसत नाही. मग याला पर्याय बाजारात उपलब्‍ध आहे. आपण फॅशनेबल अँकलेट घालू शकतो.  हॅम्प अँकलेट हे ॲडजेस्ट करुन घालायचे असते. त्यात आपण पेंडंट सुद्धा घालू शकतो.  काही पैंजण हे क्रिस्टल, मोती, लोकरपासून सुद्धा बनवली जातात. यामुळे हे जीन्सवरही घालण्याची फॅशन आहे.

 

Related image

Back to top button