मुंबईत ९३ वर्षापूर्वी धावली पहिली इलेक्ट्रीकल ट्रेन! | पुढारी

मुंबईत ९३ वर्षापूर्वी धावली पहिली इलेक्ट्रीकल ट्रेन!

मुंबई: पुढारी ऑनलाईन

मुंबई म्हटले की नजरेसमोर अख्या मुंबईला घेऊन धावणाऱ्या ट्रेनचे चित्र उभा राहते. अनेकदा आपण या धावत्या ट्रेनचा आनंद लुटत असतो. पण या ट्रेन कधी सुरू झाल्या हा प्रश्न अनेकदा पडत असतो. 

भारतामध्ये आजच्या दिवशी म्हणजेच ३ फेब्रुवारी १९२५ ला पहिल्यांदा इलेक्टीकल ट्रेन धावली. या ट्रेनचा मार्ग मुंबईतमधील व्हिटी ते कुर्ला हार्बर असा होता. ही इलेक्ट्रीकल ट्रेन १५०० व्होल्टेजची होती. या ट्रेनला आज ९३ वर्ष पूर्ण झाले आहेत. 

मुंबई गर्व्हनर सर लेस्ली ओरमे विल्सन यांनी पहिल्या मल्टीपल इलेक्ट्रीकल युनीटच्या ४ गाड्यांचे अनावरण केले होते. व्हिटी ते कुर्ला या हार्बर लाईनवर पहिल्यांदा ही ट्रेन धावली. मुंबईची वाढती लोकसंख्या पाहून १९२७ मध्ये ८ गाड्यांची संख्या वाढवण्यात आली. १९८६ मध्ये नऊ तर २०१२ मध्ये १५  गाड्यांची संख्या वाढवण्यात आली. 

विजेवर धावणाऱ्या या ट्रेनला मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळखले जाते. १९८१ मध्ये १३.३ लाख प्रवासी या ट्रेनमधुन प्रवास करत होते. देशामध्ये सध्या हार्बर लाईन झपाट्याने वाढत आहे. मागील दहा दशकांमधील वार्षिक प्रवाशांच्या वाढीचा दर ९ % पेक्षा जास्त आहे.

Back to top button