चॉकलेट डे स्‍पेशल २०१९ : गोडवा वाढवा आणि आपुलकी जपा | पुढारी

चॉकलेट डे स्‍पेशल २०१९ : गोडवा वाढवा आणि आपुलकी जपा

 कोल्‍हापूर :  पुढारी ऑनलाईन 

असं म्‍हणतात प्रेमाला वय नसते, म्‍हणजे कधी, कुठे, कसं प्रेम होईल हे सांगता येत नाही. अगदी तसचं चॉकलेट कोणाला आवडत नाही असं कोण तरी अपवादानेच सापडेल. लहानांपासून थोरांपर्यंत चॉकलेट म्‍हटल की जणू सगळी चॉकलेटीच होतात. घरात एखादी सुखद घटना घडली, सण-समारंभ, एखाद्‍याचा रुसवा काढायचा आहे, प्रेम व्‍यक्‍त करायचे असेल तर यासाठी चॉकलेटची गरज पडते. चॉकलेट म्‍हटल की मुली,  मुले झोपलेली जागी होतात. काही जण चॉकलेट खाण्‍याचं निमित्त शोधत असतात तर काही जण निमित्त नसताना चॉकलेट खातात. आज चॉकलेट खायला निमित्त आहे. कारण ‘व्हॅलेंटाईन’ वीकमधील सर्वांना आवडणारा  चॉकलेट दिवस आज (ता.९) आहे.  त्‍यानिमित्त कुछ मिठा हो जाऐ…

सर्व वयाचे लोक खास करून युवा, युगल आणि मित्रांसोबत संपूर्ण जगभरात ‘व्हॅलेंटाईन’ वीकमधील  चॉकलेट दिवस साजरा करतात. चॉकलेट डे सर्वांचा आवडता दिवस असतो कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजन, मित्र, इत्यादींसोबत चॉकलेटचा डब्बा देणे आणि घेणे पसंत करतो. 

चॉकलेट, आकाराने तशी खूप लहान गोष्ट. पण, त्याच्या साखर पेरणीने गोड झालेल्या नात्यातील गोडवा चिरंतन  जपण्‍यास मदत होते. कारण, या चॉकलेटच्या देवाण-घेवाणीत त्याचा आकार व दर्जा नाही तर भावना महत्त्वाच्या असतात. चॉकलेटला बोलता येत नाही. शब्द, भाषा कळत नाही. पण, त्याच्या देण्याघेण्यात एक समग्र संहिता असते प्रेमाची. जी उर्वरित जगाला वाचता येत नाही. प्रेमवीर मात्र वाचून घेतात चॉकलेटवर कोरलेल्या अदृश्य भावनांचा शब्द नि शब्द. म्‍हणून एकमेकांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करतात.

चॉकलेट दिवस साजरा करण्‍याचा हेतू 

चॉकलेट दिवस प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यात गोडवा घेउन येतो. याच्‍यापाठीमागे एकच हेतू आहे, लोकांच्‍यात प्रेम निर्माण करणे. चॉकलेट नात्‍यात गोडवा निर्माण करते. एकमेकांच्‍यातील प्रेमाचे नाते मजबूत कराण्‍यासाठी चॉकलेट दिवस साजरा करतात. या दिवशी नातेवाईक, मित्र, प्रिय व्‍यक्‍ती यांना त्‍यांच्‍या आवडती चॉकलेट गिफ्‍ट म्‍हणून दिली जाते. नात्‍यातील गोडवा वाढविण्‍यासाठी चॉकलेट मदत करते. म्‍हणून आज कुछ तो मिठा हो जाऐ, यासाठी आपल्‍या जवळच्‍या व्‍यक्‍तीला त्‍याची आवडती चॉकलेट द्‍या आणि नात्‍यातील गोडवा वाढवा आणि आपुलकी जपा.

चॉकलेट डे कसा साजरा करतात 

प्रत्येकाच्या जीवनात चॉकलेट डे हा दिवस एक नवीन चव घेऊन येतो, सर्वजण याला फारच शांतिपूर्वक आणि मनातून साजरा करतात. हा पश्चिमी संस्कृतीचा उत्सव आहे जो पूर्ण विश्वात फार मोठ्या संख्येत लोकांमध्ये चॉकलेट प्रेमाने वास्तविक प्रेमाची एक क्रांती घेऊन येतो. या खास दिवसात सर्वजण आपल्या आवडत्या लोकांसाठी मिठाईच्या दुकानातून किंवा बेकरीहून चॉकलेट विकत घेण्यासाठी गर्दी करत असतो. चॉकलेट डे उत्सव सर्वांना स्वादिष्ट चॉकलेटला खाणे आणि गिफ्टमध्ये देण्यासाठी एक तार्किक कारण देतो. नात्यात गोडवा वाढवण्यासाठी त्यांना एकत्र आणतो तसेच प्रियजन आणि मित्रांसाठी कुठल्याही प्रसंगी चॉकलेट भेट केल्याने सर्व प्रकारच्या चिंता, दुःख आणि गैरसमज दूर करण्यात मदत करतो. आपले प्रेम आणि आकर्षणाला प्रदर्शित करण्यासाठी चॉकलेट दिली जाते. मैत्रीच्या स्तराला वाढवण्यासाठी किंवा प्रेम प्रस्ताव देण्यासाठी चॉकलेट दिली जाते.

कुठले चॉकलेट देणार?

चॉकलेट केक हा मस्त पर्याय आहे. शिवाय तो ऑर्डर देऊनही बनवता येऊ शकतो. त्याला आणखी आकर्षक करण्यासाठी हृदयाचा आकार देता येईल. यावर क्रीमने आपल्या आवडत्या व्यक्तीचे नाव लिहिले तर हा दिवस अविस्मरणीय होऊन जाईल. चॉकलेट कुकीज, चॉकलेट फाऊंटेन, चॉकलेट पेस्ट्री, चॉकलेट आईसक्रीम याची गोड झालर या केकला लावता येऊ शकेल.

आज एक आणखी विशेष करता येईल. तुम्ही आपल्या जिवलगाला चॉकलेट घेऊन भेटायला जाताना चॉकलेटी रंगाचा ड्रेस घाला. हे सरप्राईज तुमच्या जोडीदाराला सुखावणारे असेल. तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या आरोग्याची विशेष काळजी असेल तर ड्रायफ्रूट चॉकलेट हा उत्तम पर्याय आहे. शिवाय यात व्हरायटीही खूप आहेत.


 

Back to top button