Google Chrome वापरता? बातमी आपल्यासाठी! | पुढारी

Google Chrome वापरता? बातमी आपल्यासाठी!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

आपण Google Chrome ब्राउझर वापरत असल्यास, Google कडून इशारा देण्यात आला आहे. टेक कंपनीने Google Chrome वापरणार्‍या सर्व वापरकर्त्यांना तत्काळ लेटेस्ट व्हर्जन अपडेट करण्यास सांगितले आहे. कंपनीने दिलेल्या या सुचनेचे कारण म्हणजे गूगल क्रोमशी संबंधित दोष. वापरकर्त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी Google ने  लेटेस्ट व्हर्जेन बाजारात आणले आहे. 

अधिक वाचा : लठ्ठपणामुळे मोडले होते लग्न; आता जिंकली सौंदर्य स्पर्धा!

कंपनीने म्हटले आहे की त्यांना झालेल्या गडबडीबद्दल माहिती मिळाली आणि त्यांच्या वतीने दोष निश्चित करण्यात आला. गुगलने लेटेस्ट क्रोम 80.0.3987.122 रोल आऊट केले आहे. अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने म्हटले आहे की, कंपनीने क्रोम 80 मधील उच्च-स्तरीय समस्येची पुष्टी केली आहे. या गोंधळाचा गैरफायदा घेऊन, हॅकर्स लोकांना अडकवू शकत होते. बनावट वेबसाइटवर रिडायरेक्ट करु शकले असते. संपूर्ण संगणक प्रणाली त्याद्वारे लक्ष्य केली गेली असती. 

अधिक वाचा : पहाटेच्या शपथविधीचा किस्सा सांगण्यासाठी अजित पवार उभा राहिले अन्‌ फडणवीस म्हणाले..

क्रोम ब्राउजर लेटेस्ट अपडेट नोटिफिकेशन यूझर्सना दाखवून देते. परंतु, आपण मॅन्यूअली सुद्धा करू शकता. यासाठी प्रथम आपल्या विंडोज किंवा मॅक संगणकावर गुगल क्रोम ब्राउझर उघडा. यानंतर, वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणार्‍या तीन ठिपक्यांवर क्लिक करा, ज्यावरून तुम्हाला ड्रॉप डाऊन मेन्यू दिसेल. या मेनूमधून Help आणि तेथील about Google Chrome मेन्यूवर जा. हे पेज उघडताच अपडेट प्रारंभ होईल. एकदा अपडेट झाल्यानंतर Chrome पुन्हा लाँच करावे लागेल.

Back to top button