बारावीनंतर नोकरीची खात्री देणारे 'हे' ५ कोर्स! | पुढारी

बारावीनंतर नोकरीची खात्री देणारे 'हे' ५ कोर्स!

पुढारी ऑनलाईन डेस्क : इयत्ता बारावीनंतर काय करायचं? असा प्रश्न नेहमीचं विद्यार्थ्यांना पडतो. आज शैक्षणिक क्षेत्रात अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. पण, जॉब शोधताना हे कोर्स केल्यास तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. कोरोना महामारीमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. आता तुम्ही विचार करू शकता की, तुम्हाला बारावीनंतर काय करायचं आहे. आम्ही येथे ५ जॉब ओरिएंटेड कोर्स देत आहोत, जेणेकरून तुम्हाला नोकरी शोधताना हे कोर्स नक्कीचं उपयोगी पडतील. याविषयी जाणून घ्या सविस्तर माहिती…

१) फोटोग्राफी 

अनेक विद्यापीठांमध्ये आणि इन्स्टिट्यूटमध्ये फोटोग्राफी कोर्सेस असतात. या कोर्समध्ये फोटोग्राफीचा टेक्निकल अभ्यास समाविष्ट असतो. जर तुम्हाला फोटोग्राफी करायला आवडत असेल तर हा कोर्स करायला काहीचं हरकत नाही. फोटोग्राफीच्या क्षेत्रात स्कोप आहे. तुम्ही भविष्यात फोटोजर्नालिझममध्ये पदवी घेऊ शकता. 

२) ज्वेलरी डिझायनिंग कोर्स

ज्वेलरी डिझाइनमध्ये करिअर करण्यासाठी डिप्लोमा, डिग्री वा सर्टीफिकेट कोर्स करू शकतो. ज्वेलरी डिझाईनमध्ये करिअर करण्यासाठी १२ पास असणे खूप गरजेचं आहे. बारावी पास झाल्यानंतर तुम्हा हा कोर्स करू शकता. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीही ज्वेलरी डिझाईनमध्ये उत्तम करिअर करता येऊ शकते. 

Which is the best 3d Animation Course? 2021

३) ॲनिमेशन कोर्स

ॲनिमेशन फील्ड सर्वात क्रिएटिव्ह फील्डपैकी एक आहे. ॲनिमेशन असा कोर्स आहे जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर १२ वीनंतर ॲनिमेशन-3D, BA (ऑनर्स) ॲनिमेशन, BFA (ॲनीमेशन), BA इन ॲनिमेशन ॲण्ड डिजिटल आर्ट्सची पदवी घेऊ शकता. 

Popular Foreign Language Courses in India | CollegeDekho

४) लँग्वेज कोर्स

जर तुम्हाला वेगवेगळ्या भाषा शिकायचं आहे, तर तुम्ही हे लॅंग्वेज कोर्स करू शकता. आपण जर्मन, स्पॅनिश आणि फ्रेंच भाषा शिकण्यासाठी कोर्स करू शकता. कोर्सनंतर एखाद्या कंपनीमध्ये भाषा अधिकारीची नोकरी करू शकता. त्याशिवाय तुम्ही ट्रॅव्हल गाईड म्हणून पार्ट टाईम जॉब करून चांगले पैसेदेखी कमवू शकता. 

Best Marriage Halls in Chennai to Host your Auspicious Large Scale Wedding  | Wedding Venues | Wedding Blog

५) इव्हेंट मॅनेजमेंट

आजकाल अनेक मोठे सोहळे, समारंभ, कार्यक्रम, पार्टीसाठी इव्हेंट मॅनेजनमेंट कंपनी असतात. यासाठी प्रत्येक गोष्ट मॅनेज करणे, कार्यक्रमासाठी लागणाऱ्या त्या – त्या गोष्टी उपलब्ध करून देणे हा नोकरीचा चांगला पर्याय आहे. इव्हेंट मॅनेजमेंट एक चांगला कोर्स आहे. इव्हेंट मॅनेजमेंटसाठी स्कोप आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगले आहे.

Back to top button