..आणि कंपनीने परत मागवल्या ४ लाखांहून अधिक गाड्या! | पुढारी

..आणि कंपनीने परत मागवल्या ४ लाखांहून अधिक गाड्या!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वाहन चालवताना अपघाताचा धोका नेहमीच असतो, यामध्ये आजच्या युगातील गाड्या खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. अपघाताच्या वेळी चालक आणि प्रवाशांना सुरक्षित ठेवणाऱ्या आधुनिक कारमध्ये आता अनेक एअरबॅग बसवण्यात आल्या आहेत. परंतु अपघाताच्या वेळी एअरबॅग उघडल्या नाहीत तर..! या धोक्याचा अंदाज घेत किआ या कंपनीने 4 लाख 10 हजार वाहने परत मागवली आहेत. ग्राहकांच्या कारची मोफत दुरुस्तीदेखील कंपनी करून देणार आहे.

Election Commission : जाहीर सभांसाठी पाचशेऐवजी एक हजार लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

या मध्ये 2017ची किआ फोर्ट कॉप्स, 2017-18ची किआ फोर्टेस, 2017-19 ची किआ सेडोनास, 2017-19ची किआ सोल आणि 2017-19 ची किआ सोल ईव्ही या मोठया प्रमाणात बदलून देण्यात येणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या वाहनांमधील एअरबॅग कंट्रोल युनिट मुद्रित सर्किट बोर्डवरील मेमरी चिपच्या संपर्कात येऊ शकते आणि इलेक्ट्रिकल सर्किटला नुकसान पोचवू शकते. त्यामुळे टक्कर झाल्यास एअरबॅग उघडू शकणार नाहीत आणि अपघातात दुखापत होण्याची शक्यता वाढू शकेल, अशी शंका राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाकडून उपस्थित करण्यात आली आहे.

समाज आणि देश सुरक्षेसाठी लावा एक कॅमेरा : कोळसेवाडी पोलिसांचे दुकानदारांना आवाहन

सॉफ्टवेअर मोफत अपडेट करून मिळणार..

किया कार्स चे मालक डीलरकडे जाऊन आपली कार तपासून घेऊन शकतात. तपासाअंतर्गत एअरबॅग कंट्रोल युनिटवर लक्ष ठेवले जाणार असून, हे युनिट बदलण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम मोफत केले जाणार आहे. याशिवाय ग्राहक ३१ मार्चपर्यंत कियाच्या अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करून त्यांचे वाहन तपासण्यासाठी वेळ बुक करू शकतात.

Back to top button