पुढारी ऑनलाईन डेस्क : Apple ने भारतात iPhone 16 series लाँच केली आहे. या फोनमध्ये कंपनीने कॅमेरा मॉड्यूलमध्ये बदल केले आहेत. या फोनमध्ये नवीन डिझाईनसह कंपनीने पिलच्या आकाराचा डिस्प्ले दिला आहे. तसेच अनेक फिचर्स दिले आहेत. परंतु नवीन iPhone 16 ची सीरीज बाजारात येताच iPhone 15 सिरीजमधील मॉडेल्सच्या दरात कपात केली आहे. जाणून घेवूयात त्याबद्दल...
दरवर्षीप्रमाणेच नवीन आयफोन सीरिज लाँच होताच जुन्या आयफोन मॉडेल्सच्या किमती कमी केल्या जातात. iPhone 16 सीरीज लाँच होताच Apple ने गेल्या वर्षी लाँच केलेल्या iPhone 15 आणि iPhone 15 Plus च्या किमती कमी केल्या आहेत. यामध्ये iPhone 15 आणि iPhone 15 Plus च्या किमती साधारणत: 9,700 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
आयफोन 15 चा 128 जीबी व्हेरिएंट आता 79,600 रुपयांऐवजी 69,900 रुपयांना तर, 256 जीबी व्हेरिएंट 89,600 रुपयांऐवजी 79,900 रुपयांना आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 99,190 रुपयांऐवजी 99,900 रुपयांना मिळणार आहे. तर iPhone 15 ची किंमत 9,700 रुपये करण्यात आली आहे. दुसरीकडे, जर आपण नवीनतम iPhone 16 बद्दल बोललो तर, या मॉडेलचा 128GB वेरिएंट 79,900 रुपयांना, 256GB व्हेरिएंट 89,900 रुपयांना आणि 512GB व्हेरिएंट 1,09,900 रुपयांना उपलब्ध होईल.
iPhone 15 Plus चा 128GB व्हेरिएंट 89,600 रुपयांऐवजी 79,900 रुपयांना विकला जात आहे, 256GB व्हेरिएंट 99,600 रुपयांऐवजी 89,900 रुपयांना आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट 1,09,900 रुपयांऐवजी 1,09,900 रुपयांना विकला जात आहे. किमतीत कपात केल्यानंतर iPhone 15 Plus 9700 रुपयांच्या स्वस्त किमतीत मिळेल.
iPhone 16 ची प्रारंभिक किंमत सुमारे 67,000 रुपये आहे, तर iPhone 16 Plus ची किंमत सुमारे 75,500 रुपये आहे. iPhone 16 Pro ची किंमत 128GB साठी सुमारे 83,870 रुपये आणि 256GB साठी iPhone 16 Pro Max साठी सुमारे 1 लाख रुपये पासून सुरू होते. या किंमती अमेरिकन बाजारासाठी आहेत. भारतात आयफोन 16 ची किंमत 79,900 रुपये आहे आणि आयफोन 16 प्लस 89,900 रुपये आहे. दुसरीकडे, आयफोन 16 प्रो भारतात 1,19,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह येतो. सर्वात प्रीमियम आयफोन 16 प्रो मॅक्स भारतीय बाजारपेठेत किंमत 1,44900 रुपये असेल.