कस्तुरींसाठी डीजे पार्टी, बाईक रॅली | पुढारी

कस्तुरींसाठी डीजे पार्टी, बाईक रॅली

सांगली : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त कस्तुरी क्लबतर्फे  सभासदांसाठी डीजे पार्टी व बाईक रॅलीचे आयोजन गुरुवारी( दि. 7)  व शुक्रवारी ( दि. 8) केले आहे. सभासदांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कस्तुरी क्लबमार्फत करण्यात आले. गुरुवारी (दि. 7) कस्तुरी सभासदांसाठी विज्ञान माने – स्टेप अप फाउंडेशन प्रायोजित  ‘बॉलिवूड  ऑन  डान्स फ्लोअर’ (डीजे पार्टी) आयोजित केले आहे. बॉलिवूड थीम असलेला हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे.

हा  कार्यक्रम विश्रामबाग येथील खुल्या नाट्यगृहात सायंकाळी 4.30 वाजता सुरू होणार आहे.  या  शोमध्ये पॅशन झुंबा फिटनेस स्टुडिओच्या संचालिका वसुंधरा माळी यांच्यासोबत डान्स करण्याची संधी मिळणार आहे. याबरोबरच शुक्रवारी ( दि. 8) सायंकाळी 4 वाजता ‘लेक वाचवा’ या बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. याव्दारे प्रबोधन केले जाणार आहे. या रॅलीत सभासदांना पैठणी जिंकण्याची संधी आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी नऊवारी साडी व फेटा परिधान करणे आवश्यक आहे. रॅलीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.   

संबंधित बातम्या

अधिक माहितीसाठी संपर्क : तनीम अत्तार – 9325477714,  दै. पुढारी भवन, जिल्हा परिषदेसमोर, सांगली.

Back to top button