सेल्फी स्पेशल | पुढारी | पुढारी

सेल्फी स्पेशल | पुढारी

मेकअप छान असेल तरच सेल्फी चांगला येतो, हे आतापर्यंत आपल्यातल्या अनेक जणींनी अनुभवलं असेल. सेल्फी छान यावा आणि आपल्याला तो डीपी म्हणून वापरता यावा, असं मात्र आपल्यातल्या जवळपास सर्वजणींनाच वाटत असतं. म्हणूनच चांगला सेल्फी यावा यासाठी मेकअपच्या या काही टिप्स वाचा आणि वापरूनही पाहा.

• उगाच काही भडक किंवा अघोरी मेकअपच्या पाठी लागू नका. आपल्या स्किन कलरशी जुळता मेकअप करा आणि मगच सेल्फी घ्या.• जर आपण नैसर्गिक लाईटमध्ये सेल्फी घेत असाल तर डोळ्यावर काजळ आणि मस्कारा लावा. चेहर्‍यावर फाऊंडेशनची हलकी लेअर आणि नंतर हलका ब्लशर अप्लाय करा. असा हलका मेकअप सेल्फीला फ्रेश लूक देईल.• नॅचरल लूक देण्यासाठी बीबी क्रीम वापरा. याने चेहरा स्मूथ आणि रंग उजळ दिसेल. आपण टिंटिड मॉईश्‍चराइजरही यासाठी तुम्ही वापरू शकता.• सेल्फी घेण्यासाठी आयब्रो डार्क असावी. यासाठी डार्क आयब्रो पेन्सिल वापरा. कारण अधिकशा कॅमेर्‍यांच्या फ्लॅशने आयब्रो हलक्या दिसतात म्हणूनच आयब्रो डार्क आणि सेट असेल तर सेल्फी छान येईल.

• सेल्फीसाठी लिप्सय मेकअपकडे विशेष लक्ष द्यायला हवं. लाईट मेकअपवर हलका बोल्ड लिप कलर लावा आणि ब्राईट मेकअपवर त्या टोनला सूट करत असलेला लाईट शेड अप्लाय करा.

अशा या छोट्या छोट्या टिप्स समजून घ्या, प्रत्यक्षात वापरून पाहा म्हणजे मग कदाचित प्रत्येक सेल्फी तुम्हाला तुमचा डीपी म्हणून वापरावासा वाटेल, इतका फ्रेश आणि परफेक्ट येईल.

संबंधित बातम्या

Back to top button