फॅशन-पॅशन : फॅशन प्रिंटेड पँटची | पुढारी

फॅशन-पॅशन : फॅशन प्रिंटेड पँटची

सुंदर सुंदर फुले, त्यांचे लाल-पिवळे असे डोळ्यांना सुखावणारे रंग जर तुम्हाला पायांमध्ये दिसू लागले, तर साहजिकच डोळ्यासमोर आश्चर्यचकित भाव उभे राहतील. आतापर्यंत प्रिंटेड साडी आणि प्रिंटेड सलवार कमिजवर अशा प्रकारच्या प्रिंट आपण पाहिल्या असतील. वापरल्याही असतील. आत प्रिंटेड पँटची फॅशनही आली आहे. फ्लॉवर प्रिंटपासून अ‍ॅनिमल प्रिंट्स आणि बाटीकच्या डिझाईन्स तसेच पोल्का डॉट्स, चेक्स, सर्व प्रकारच्या प्रिंटेड पँट सध्या फॅशनच्या दुनियेत पाहायला मिळत आहेत. पेट्स, स्कीन फिटेड जीन्स आणि ट्राऊझर यामध्ये वर्षानुवर्षांपासून चालणारे ब्लॅक, ब्लू आणि ब्राऊन हे रंग कंटाळवाणे वाटत असतील, तर प्रिंटेड पँट्स एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

प्रिंटेड पँटप्रमाणेच सध्या बाजारात प्रिंटेड लेगिंग्ज, प्रिंटेड जेगिंग्ज आणि प्रिंटेड पॅलेजोपेट, स्किनी जीन्स, पटियाला सलवार हे सर्व प्रकार  चलतीत आहेत.  काही काळापूर्वी, केवळ तरुणींनाच अशा प्रकारच्या पँट्स उठून दिसतात, शोभतात असे मानले जात होते. मात्र आता द़ृष्टिकोन बदललेला दिसतो. आता महिलाही प्रिंटेड पँट्स पसंत करत आहेत. महिलांना प्रिंटेड पँट्स घालायच्या असल्यास त्यावर जिप्सी ब्लाऊज, प्लेन टॅक टॉप किंवा सॉफ्ट सिल्क शर्टसोबतदेखील घालता येऊ शकतात. प्रिंटेड पँट शिवून घेत असाल, तर फॅब्रिक आणि कटबाबत विशेष लक्ष द्यावे. सॉफ्ट फॅब्रिकमध्ये पँटचा फॉल आणि लूक दोन्ही चांगले राहते. सध्या प्रिंटेड ट्राऊझर आणि सिगारेट पँटमध्येदेखील मार्केटमध्ये नव्या डिझाईन्ससोबत बरेच प्रकार बघायला मिळतात. हॅरम्स स्टाईलमध्ये प्रिंटेड पँटदेखील उपलब्ध आहेत. तुम्ही जर पहिल्यांदाच प्रिंटेड पँट्स ट्राय करत असाल, तर मायक्रो प्रिंट म्हणजे छोट्या प्रिंटची प्रथम निवड करावी. साध्या आणि सोबर प्रिंटच्या या पँट्स अगदी स्टायलीश लूक देतात. यासोबत टॉप किंवा शर्ट घालता येतो. सोबत हाय हिल्स सँडल किंवा प्लॅटफॉर्म हिल सँडल चांगल्या दिसतात. अ‍ॅक्सेसरीजची निवड करताना वूडन ज्वेलरी, जूट किंवा लेदरच्या मोठ्या बॅग, बीड्सचे नेकलेस आणि वाईड बेल्ट्स इत्यादींची निवड करावी.

संबंधित बातम्या
Back to top button