स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद | पुढारी | पुढारी

स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद | पुढारी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

दैनिक पुढारी कस्तुरी क्लब तर्फे महिलांसाठी विविध प्रशिक्षण आणि मनोरंजनाबरोबर स्त्रियांच्या आरोग्यासाठी विविध डॉक्टरांचे सेमीनार या लॉकडाऊनच्या काळात घेतले आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून ‘स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद’ या विषयावर आज बुधवार दि. 15 रोजी सायं. 5 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे सर्व महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे मार्गदर्शन पुण्याचे अ‍ॅडव्हान्स आयुर्वेदा हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉ. विद्याधर गिरी हे करणार आहेत.

या कार्यक्रमात सहभागाकरिता फेसबुकवर PudhariKasturi  किंवा pudhari online हे पेज सर्च करा, लाईक करा आणि फॉलो करा. अधिक माहितीसाठी 8483926989, 9096853977 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. कस्तुरी क्लबच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ तुम्हाला नंतरही Pudhari Events या यू ट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहेत.

या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

आधीचे मासिक पाळीचे वय 12 ते 14 वर्षे होते. आता ते

9 ते 10 वर्षे आहे.

60 ते 70 टक्के मुलींना नियमित मासिक पाळी येत नाही.

PCOD/ PCOS यासारख्या समस्या 35 ते 40 टक्के मुलींना आहेत.

वजन वाढणे, लठ्ठपणा, थायरॉईड आदी समस्या तरुण मुलींमध्ये वाढत आहेत.

तारुण्य पिटिका (पिंपल्स), अनावश्यक जागी केसांची वाढ उदा. ओठांवर, गालावर लव वाढणे यासारख्या समस्या जाणवत आहेत.

गर्भपात, वेळेपूर्वी प्रसूती यांचे प्रमाण पण वाढत आहे.

वैद्यकीय सर्वेक्षणानुसार 40 टक्के प्रसूती कृत्रिमरीत्या म्हणजे टेस्टट्यूब बेबीने होतात. म्हणजेच नैसर्गिकरीत्या काहीच व्हायला तयार नाही. हे प्रमाण असेच वाढत राहिले तर भविष्यात सर्वच मुले

कृत्रिमरीत्या होतील व आपण एक मशिन बनून जाऊ. यासाठी आताच सावध होऊन आयुर्वेदाची कास धरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

Back to top button