कस्तुरी क्लब मार्फत कबाब-टिक्का कार्यशाळा | पुढारी

कस्तुरी क्लब मार्फत कबाब-टिक्का कार्यशाळा

कोल्हापूर :अगदी हॉटेलप्रमाणेच कबाब आणि टिक्का आता घरच्या घरी बनवता येणार आहेत कारण कस्तुरी क्लब मार्फत ऑनलाईन कबाब-टिक्का कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळा 22 सप्टेंबर रोजी दु. 4 वाजता होणार आहे.

कार्यशाळेत रेशमी चिकन टिक्का, सीख कबाब, अफगाणी कबाब, बंजारा कबाब, तंदूर चिकन, मलई कबाब, आशा प्रकारचे कबाब, स्पेशल तंदुरी कांदा आणि तंदुरी चटणी सह शिकविले जाणार आहेत.सहभागी प्रत्येकास पदार्थांच्या नोट्स पाठविल्या जातील.

झूम अँप वरून ऑनलाइन कार्यशाळा घेतली जाणार असून फक्त 350/- रु शुल्क आकारले जाणार आहे. शुल्क मंगळवार दि. 22 सप्टेंबर दु. 12 पर्यंत गुगल पे किंवा फोन पे करायचे आहे. गुगल पे साठी 8483926989 आणि फोन पे साठी 9096853977 या नंबर वर संपर्क साधा.

Back to top button