तोंडी लावण्यासाठी मुलांना हवा असलेला आवडता पदार्थ म्हणजे शेजवान सॉस. बाहेर मिळणाऱ्या सॉसमध्ये अनेक preservative असतात. तसेच ते बनवताना पोषणमूल्यांची पुरेशी काळजी घेतलेली असेलच असे नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत घरच्या घरी शेजवान सॉस कसा बनवावा ते. हा कांद्या आणि लसणाशिवाय असला तरी चवीला अगदी बाहेरच्या सॉससारखा लागतो.
काश्मिरी लाल मिरची : 15
लाल मिरची : 20
पाणी : ¾ कप
आलं : 2 इंच
तेल : पाव कप
मिरे पावडर : ½ टी स्पून
ओरिगयानो : ½ टी स्पून
कोथिंबीरीचे देठ : 2 चमचे
सोया सॉस : ½ चमचा
टोमॅटो सॉस : 2 मोठे चमचे
साखर : 2 मोठे चमचे
व्हीनेगर : 2 मोठे चमचे
मीठ : चविपुरत
पातेल्यात पाणी गरम करून घ्या. यात दोन्ही प्रकारच्या मिरच्या घालून 20 मिनिटे भिजवून ठेवा. 20 मिनिटानंतर या मिरची आलं आणि थोडं पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्या.
एका कढईत तेल गरम करून घ्या. यात मिरचीची पेस्ट, मिरे पावडर, ओरिगयानो, कोथिंबीरीचे देठ, मीठ आणि साखर टाका. एकसारखे ढवळत रहा. मसल्याला तेल सुटू लागले की मंद आचेवर 5-7 मिनिटे शिजवा.
यानंतर यात सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि व्हीनेगर टाका. व्यवस्थित मिसळून थंड होण्यासाठी ठेवून द्या. तुमचा शेजवान सॉस तयार आहे.