पॅकेजिंग टेक्नॉलॉजी करिअर्स | पुढारी | पुढारी

पॅकेजिंग टेक्नॉलॉजी करिअर्स | पुढारी

प्रा. मनोहर हिरीकुडे

अन्‍न पदार्थ उत्पादने, टेक्सटाईल्स,फॉर्मास्यूटिकल्स, कॉस्मेटिक्स, अ‍ॅटोमोबाईल्स इत्यादी क्षेत्रात पॅकेजिंग प्रशिक्षीतांना नोकर्‍या उपलब्ध होऊ शकतात. देशात 600 ते 700 पॅकेजिंग मशिन मॅन्यूफॅक्‍चर्स असून त्यापैकी 95% लघू आणि मध्यम सेक्टरमध्ये आहेत आणि ते देशभर विखुरलेले आहेत. अलीकडेच  प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार 22000 पेक्षा अधिक रजिस्टर्ड  पॅकेजिंग कंपन्या भारतामध्ये आहेत. या क्षेत्रातील उमेदवारांचा सुरुवातीचा पगार 3 ते 4 लाख इतक्या पॅकेजीसचा असतो. आयटीसी लिमिटेड, नेसले, जीएसके, रॅनबॅक्सी, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, डाबर इंडिया लि., कॅडबरी इंडिया लिमिटेड, रेकिट बेन्किसर, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन लिमिटेड, कॅस्ट्रोल इंडिया लि., कोकोकोला इंडिया लि., यूफ्लिस, सन फॉर्मा प्रायव्हेट लि., आई मिल फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लि., ऑटोमोबाईल कंपनीज टेक्स्टाईल कंपनीज या नामवंत कंपन्यांमध्ये सातत्याने संधी उपलब्ध होत असतात. 

 

प्रशिक्षण संस्था : आय आय पी (खखझ), अण्णा युनिव्हर्सिटी, तामिळनाडू, गुरु जाम्बेरवर, युनिव्हर्सिटीहिसार, एसआयइएस (डखएड) स्कूल ऑफ पॅकेजिंग, कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुुरुक्षेत्र, आय. आय. टी. खरकी इत्यादी फार थोड्या संस्था पॅकेजिंग प्रशिक्षण बहाल करतात. यापैकी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग ही संस्था आद्यप्रवर्तक असून पॅकेजिंगमधील नामवंत संस्था आहे. या व्यतिरिक्‍त शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर आणि जे. एन. गव्हर्नमेंट  पॉलिटेक्निक, रामन्तापूरम, हैद्रबाद या संस्था तीन वर्षे कालावधीचा डिप्लोमा कोर्स बहाल करतात. द्वितीय वर्गासह आणि गणित, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, शेती, फूड सायन्स, पॉलीमर सायन्स, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या विषयासह उत्तीर्ण झालेले पदवीधर उमेदवार अशा प्रशिक्षण  प्रवेशाकरिता अर्ज करू शकतात. इयत्ता 12 वी उत्तीर्ण झालेल्या (10+2 इतर)  उमेदवारांकरिता शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सहा महिने कालावधीचे तसेच पदविका कोर्सेस उपलब्ध आहेत. अशारितीने दिवसेंदिवस व्यापक होत जाणारे असे हे पॅकेजिंग क्षेत्र आहे. अतिशय आकर्षक भवितव्य असणार्‍या या क्षेत्रातील करिअर संधीचा लाभ घेण्यासाठी विज्ञान शाखेतील तसेच तंत्रज्ञान विभागातील तरुण विद्यार्थी उमेदवारांनी  पुढे यायला हवे असे वाटते.

संबंधित बातम्या
Back to top button