गुंतवणूक कशी करावी; मिडास इन्स्टिट्यूटतर्फे आज कार्यशाळा, नोंदणीसाठी विशेष सवलत  | पुढारी

गुंतवणूक कशी करावी; मिडास इन्स्टिट्यूटतर्फे आज कार्यशाळा, नोंदणीसाठी विशेष सवलत 

पुणे : पुढारी ऑनलाईन 

गुंतवणूक म्हणजे नक्की काय? गुंतवणुकीचे विविध मार्ग कोणते? गुंतवणूक नक्की कशी करावी? चक्रवाढ व्याज म्हणजे नक्की काय? शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सोने, फिक्स्ड डिपॉझिट यामधला नक्की कोणता मार्ग चांगला? गुंतवणूक सुरु करण्याची योग्य वेळ कोणती? गुंतवणुकीच्या बेस्ट प्रॅक्टिसेस कोणत्या? या व अशा प्रश्नांना उत्तरे देणारी व गुंतवणूक कशी करावी हे शिकवणारी अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. झूम या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आज २९ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजता मार्गदर्शक थेट तुमच्याशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधतील. हे लेक्चर लाईव्ह असून आपल्याला प्रश्न विचारायची संधी असेल. कोर्ससाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत. कोर्स पूर्ण झाल्यावर प्रत्येकाला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळेल. 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने खास सवलत 

गुंतवणूक मार्गदर्शन कार्यशाळेसाठी आज दिनांक २९ ऑगस्ट २०२० रोजी रुपये ५०० रुपये या सवलतीच्या दरात आपण आज दुपारी २ वाजेपर्यंत नोंदणी करू शकता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नोंदणी फी मध्ये ५० टक्के सूट देण्यात आली आहे. 

नोंदणी करण्यासाठी midasinstitute.com/?u_course=इन्व्हेस्टमेंट-कशी-करावी या लिंकचा वापर करावा. अधिक माहितीसाठी www.midasinstitute.com या वेबसाईटला भेट द्या. अथवा 8805029845 यावर संपर्क साधा

मिडास इन्स्टिट्यूटवर  हा  कोर्स  मराठी भाषेतून असून अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांच्यासारख्या तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. कळायला सोपी आणि सुटसुटीत अशी गुंतवणूक संबंधित विषयांची मांडणी आहे.  लाईव्ह क्लास रुम असून ज्यात शंका निरसन करणे सहज शक्य आहे.सर्वांसाठीच हा कोर्स उपलब्ध असून शैक्षणिक पात्रता किंवा वयाची अट नाही. कोरोनाच्या कठीण काळामध्ये बचत करून योग्य गुंतवणूक करण्यासाठी कार्यशाळेत नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे. 


 

Back to top button