‘ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांमध्ये आळस निर्माण झालाय’ | पुढारी

'ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांमध्ये आळस निर्माण झालाय'

“शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे आणि जो पिणार तो गुरगुरणारच” या वाक्याप्रमाणे शिक्षण ही काळाची गरज आहे. पण सध्या कोरोनामुळे शिक्षणाची अवस्था बिकट झाली आहे. पण बऱ्याच शाळांमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे थोडाफार फायदा होतो आहे.

जसे की मुलांना सकाळी लवकर उठून तयार करणे. त्यांच्यासाठी डबा बनविणे आणि त्याना शाळेत वेळेवर सोडणे ही कामे टळली असून त्यामुळे पालकांना भरपूर वेळ मिळत आहे. तसेच ऑनलाईन शिक्षनामुळे कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन, इंटरनेट आणि झूम इत्यादी हाताळण्याचे ज्ञान आले असून त्याचा वापर ते आपल्या वैयक्तिक जीवनात देखील करु शकतात.

पण ऑनलाईन शिक्षणामुळे जसे फायदे होत आहेत, तसेच त्याचे तोटे देखील समोर येत आहेत. ग्रामीण भागातील बऱ्याच पालकांकडे स्मार्टफोन नाहीत तसेच नेटवर्कचाही प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांमध्ये देखील आळस निर्माण झाला आहे. त्यांची सकाळी उठण्याची सवय बंद होत आहे. तसेच इंटरनेटचा गैरवापर देखील मुले करत आहेत जसे की ऑनलाईन गेम खेळणे व्हीडिओ पाहणे इत्यादी. यामुळे त्यांच्या आरोग्यावर देखील दुष्परिणाम पडतो आहे. कारण स्क्रीन समोर बसल्यामुळे डोळ्यावर ताण येतो तसेच मानदुखी पाठदुखी सुध्दा जाणवते. यामुळे विद्यार्थी संदर्भात या आरोग्य समस्या निर्माण होत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button