औद्योगिक मानसशास्त्र करिअरची वेगळी वाट | पुढारी

औद्योगिक मानसशास्त्र करिअरची वेगळी वाट

प्रा. पोपट नाईकनवरे

खासगी कंपन्या, शैक्षणिक संस्था इतकेच काय तर सरकारी कामकाजही आता कार्पोरेट कल्चरप्रमाणे केले जात आहे. कर्मचार्‍यांचा ड्रेसकोड, कामाची पद्धत, प्रशिक्षण, भरती आदींबाबत कंपन्या किंवा संस्थांचा मनुष्यबळ विभाग (एचआर) काम करत असतो. कंपन्यांच्या मागणीप्रमाणे कुशल कर्मचार्‍यांची भरती किंवा कपात यासारख्या बाबी ‘एचआर’ विभाग पाहत असतो.

कंपन्यांच्या बदलत्या नियमांची, धोरणांची माहिती कर्मचार्‍यांपर्यंत पोहोचवणे, कर्मचार्‍यांच्या तांत्रिक अडचणी दूर करणे, अकुशल कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करणे यावरही ‘एचआर’ची भिस्त असते. अशा विभागात औद्यागिक मानसशास्त्र अभ्यासक्रमप्राप्त युवक-युवतींना प्राधान्य दिले जाते. साधारणत: मनुष्यबळ हा अभ्यासाचा वेगळा विषय असला तर कर्मचार्‍यांचा मानशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी औद्योगिक मानसशास्त्र उपयुक्त ठरते. तसे पाहता तांत्रिक, औद्योगिक आणि संस्थांसंबंधी कामाच्या वातावरणाचा मानवी वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास करणे म्हणजे औद्योगिक मानसशास्त्र होय. कामाच्या ठिकाणी कर्मचारी तंत्राचा, संगणकाचा वापर कसा करतो याचेही अध्ययन औद्योगिक मानसशास्त्रात केले जाते. मनुष्य आणि मशिन यांच्यातला हा तांत्रिक करार मानला जातो. औद्योगिक मानसशास्त्र शिकणार्‍या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी खूप वाव आहे. औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक मानसशास्त्र शिक्षित विद्यार्थ्यांना खूप मागणी आहे. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना मानसशास्त्रात मास्टर पदवी आणि त्यानंतर पीएच.डी. ही करता येऊ शकते. 

नोकरीच्या संधी : औद्योगिक मानसशास्त्रात पदवी घेतल्यानंतर तो असिस्टंट प्रोफेसर, डॉक्टर, संशोधक, समुपदेशक म्हणून नोकरी करू शकतो. आरोग्य, सामाजिक क्षेत्रांतही करिअर करता येऊ शकते. सहायक आणि सहायक 

मानसशास्त्रज्ञ ते व्यावसायिक आणि व्यवस्थापनातही चार्टर्ड अकाऊंटंट आणि मार्केटिंग मॅनेजर, प्रशासन, माहितीविषयक काम, समुपदेशन, मार्गदर्शक, कार्मिक, प्रशिक्षण आणि भरती, सामाजिक आणि स्पिच थेरेपी आदी क्षेत्रांत औद्यागिक मानसशास्त्राचा उपयोग होतो. 

शैक्षणिक संस्था – औद्योगिक मानसशास्त्र अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक संस्थांत शिकवला जातो.

• दिल्ली विद्यापीठ • बंगळूर विद्यापीठ • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईल सायकॉलॉजी

• मद्रास विद्यापीठ

• सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

Back to top button