Talathi post examination : तलाठी पदाच्या परीक्षेची तयारी करताना… | पुढारी

Talathi post examination : तलाठी पदाच्या परीक्षेची तयारी करताना...

महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकार्‍यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा (Talathi post examination) घेण्यात येते. यावर्षीसाठी साधारणपणे 1000 पदांपेक्षा अधिक पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

यासंदर्भात महिनाअखेरीस जाहिरात निघेल. ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. (Talathi post examination)

पात्रता : 1) कोणत्याही संविधानिक विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. 2) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. त्याच्याकडे रहिवाशी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. 4) संगणक व माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक.

वयोमर्यादा : किमान अमागास 14 ते 38 वर्षे व मागासवर्गीयासाठी 43 वर्षे, अंशकालीन कर्मचारी 55 वर्षे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा दिव्यांग 45 वर्षे, माजी सैनिक अमागास 38, मागास 43, दिव्यांग 45 वर्षे.

परीक्षा पद्धत : या परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास.

अभ्यासक्रम व संदर्भ : मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये मराठी वर्णमाला व उच्चारस्थान, शब्दाच्या जाती, विभक्ती व सामान्यरूप, वाक्य व वाक्याचे प्रकार, काळ आणि प्रयोग मराठी भाषेची शब्दसिद्धी, सामाजिक शब्दरचना, समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दरचना, एका शब्दाचे अनेक अर्थ, शब्द समूहाबद्दल एकच शब्द, अलंकारिक शब्दरचना, मराठी भाषेतील वाक्प्रचार आणि म्हणी, उतार्‍यावर प्रश्न या घटकांचा समावेश असतो.

संदर्भ – सुगम मराठी व्याकरण – मो. रा. वाळिंबे. मराठी व्याकरण मानाचा मुजरा – नितीन महाले. इंग्रजी – part of speech, Articles, sentence, Tense, Active and passive voice, Direct indirect speech, punctuation and question tag, synanomyms and antonyms, one work, idioms and phrases, question on passage. संदर्भ – 1) perfect english grammar – झांबरे 2) इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह – सचिन जाधवर. बुद्धिमापन चाचणी – संख्याकाचा क्रम, श्रेणी, संख्यामालिकेतील समसंबंध विसंगत संख्या ओळखणे, आकृत्यांमधील संख्या ओळखणे, वर्गमालेची क्रमश्रेणी सोडविणे, संगत शब्दरचना, विसंगतपद ओळखा, सांकेतिक वर्णमाला, सांकेतिक शब्दरचना, सांकेतिक शब्दलिपी, बसण्याचा क्रम ओळखणे, आकृत्यांचे पृथक्करण, घनाकृतीवर आधारित प्रश्न, आकृतीवरील कूट प्रश्न, दिशावर आधारित प्रश्न, नातेसंबंध, घड्याळ, वेळ व कालमापन, दिनदर्शिका.

संदर्भ – बुद्धिमत्ता चाचणी – अनिल अंकलगी. बुद्धिमत्ता चाचणी – किरण पाटील. अंकगणित – संख्याज्ञान व स्थानिक किंमत, गणिताच्या प्राथमिक क्रिया विभागतेच्या कसोट्या, लसावि आणि मसावि, व्यवहारी व दशांश अपूर्णांक सरासरी, गुणोत्तर प्रमाण, शतमान व शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढव्याजात नफा व तोटा, काम काळ आणि वेग, दशमान व कालमापन, क्षेत्रफळ व परिमिती.

संदर्भ – majic of maths – नितीन महाले. अंकगणित – पंढरीनाथ राणे. सामान्यज्ञान – भूगोल – जगाचा, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. इतिहास – भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा नागरिकशास्त्र – भारतीय राज्यघटना आणि महाराष्ट्राचे ग्रामीण प्रशासन. सामान्यविज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशाास्त्र, जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र. प्रसिद्ध लेखक व दिनविशेष चालू घडामोडी – भारतातील व जागतिक यांचा समावेश असतो. संदर्भ – चालू घडामोडींसाठी अभिनव प्रकाशन, 6 वी ते 12 वी शालेय पुस्तकावर आधारित स्टेट बोर्ड पुस्तक, सामान्यज्ञान घटकासाठी गुतेकर यांचा संदर्भ. अभ्यासाची दिशा – यापूर्वी झालेल्या तलाठी ऑफलाईन व ऑनलाईन झालेल्या प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करावा व जास्तीत जास्त सराव करावा.

प्रा. जॉर्ज क्रूझ

Back to top button