जगदीश काळे
विचित्र खून प्रकरणे सोडवण्यासाठी पोलिस काय प्रयत्न करतात, हे आपण अनेकदा पाहण्यास असमर्थ असतो. लोकांसमोर खून प्रकरण आणि ते सोडवल्यानंतर त्याचा निकाल दिसू लागतो; पण पोलिस खुनाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कसे पोहोचतात, हा प्रयास अतिशय किचकट तर असतोच शिवाय कधी-कधी तो धरारानेही भरलेला असतो.
अशाच एका अभ हत्येचे गूढ उकलण्याचा दावा मध्य प्रदेशातील दमोह पोलिसांनी केला आहे. या खून प्रकरणाचे गृढ उकलण्यास पोलिसांना १७ महिने लागले; मात्र जेव्हा हे रहस्य उघड झाले तेव्हा सर्वांनाच आश्वयांचा धाका बसला. दमोह पोलिसांनी दहावीच्या विद्यार्थ्याच्या खून प्रकरणाचा पर्दाफाश करत एका आरोपीला अटक केली. हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं होतं की, तो सोडवायला पोलिसांना १७ महिने लागले. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून याची कथा सुरू होते.
गेल्या वर्षी १४ मे रोजी एका शेतातून पोलिसांना पुरुषाचा सांगाडा सापडला होता. पाचरिया गावातील रहिवासी लक्ष्मण पटेल आणि त्यांची पत्नी यशोदा यांनी कपडे आणि सामानाच्या आधारे हा सांगाडा त्यांचा मुलगा जयराजया असल्याचे ओळखले ठोस पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी सांगाड्याची दोनदा चाचणी केली; पण डीएनए जुळला नाही.
आता हे काय प्रकरण आहे, या विचाराने कुटुंबीयांसह पोलिसही संभ्रमात पडले. घोडे अधिक तपास आणि सखोल चौकशी केल्यावर असे दिसून आले की, जयराजचा जन्म खरंच इन विट्रो फर्टिलायझेशन तंत्राद्वारे झाला होता; पण डीएनए कसा शोधायचा आणि तो जुळवायचा कसा हा प्रश्न अनुत्तरित होता, या कोंडीत गुंतलेले पोलिस तपास अधिकारी हे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत राहिले; मात्र यश त्यांच्यापासून कोसो दूर होते. यादरम्यान एकदा या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याने एक पुस्तक हाती घेतले.
अमेरिकन पोलिसांचे ते पुस्तक वाचताच तपास अधिकान्याचा चेहरा खुलला. दमोहवे पोलिस अधिकारी ज्यासाठी भटकत होते, तेच त्या पुस्तकात लिहिले होते. त्या पुस्तकात, आयव्हीएफ तंत्राद्वारे जन्मलेल्या मुलांच्या डीएनए चाचणीची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत वर्णन केली होती. या चाचणीसाठी रक्त नाही, तर लाल किंवा घामाचा नमुना आयश्यक आहे.
पुस्तकात लिहिलेल्या मजकुराचे अनुसरण करून पोलिस सहज पुढे सरकले. त्यांना खजिन्याची चावी सापडल्यासारखे वाटले. ती एकामागून एक कुलपे उघडत गेली. जयराजचे वडील लक्ष्मण पटेल सांगतात की, आम्ही आमच्या पातळीवर त्यांच्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्याला शोधून परत आणणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. ज्या दिवशी पोलिसांना माझ्याच शेतात हा सांगाडा सापडला, त्या दिवशी मी आणि माझी पत्नी दोघेही एकत्र गेलो होतो.
सांगाडयाजवळ पॅन्ट, टी-शर्ट आणि बेल्ट आढळून आाला, म्हणजेच जयराज ज्या कपक्ष्यांमध्ये बेपत्ता झाला होता तेच कपडे त्याच्या आई-वडिलांना शेतातून सापडले. त्या कपड्यांच्या ओळखीच्या आधारे पोलिसांनी त्याची वयराज अशी ओळख पटवली. पालकांनी कपड्यांवरून सांगाडा ओळखला होता; मात्र पोलिसांना ठोस पुरावे हवे होते. यासाठी पोलिसांसमोर एकच मार्ग होता की, डीएनए चाचणीद्वारे मृतदेहाचे नमुने पालकांच्या रक्ताशी जुळवून ओळख पटवणे.
लक्ष्मण आणि पशोदा यांच्या रक्ताचे आणि हाडांचे नमुने सागरच्या फॉरेन्सिक लॅचमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तोपर्यंत पोलिसांनी पुरुष सांगाडा सील करून आपल्या ताब्यात ठेचला होता. काही दिवसांनी सागर एफएसएलकडून सांगाडा आणि लक्ष्मण पटेल आणि पशोदा यांचा डीएनए जुळत नसल्याचा अहवाल आला.
सागरचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा कुटुंबाचे नमुने घेऊन चंदीगड एफएसएलकडे पाठवले. तंत्रज्ञानाच्या चाबतीत चंदीगड एफएसएल ही देशातील सर्वोतम प्रयोगशाळा म्हणून गणली जाते; मात्र येथेही डीएनए जुटला नाही. आत्ता सापडलेला सांगाडा जयराजचा आहे की अन्ग कुणाचा, हे आव्हान पोलिसांसमोर होते. लक्ष्मण आणि यशोदा सतत पोलिसांकडे त्यांच्या मुलाचा सांगाडा सोपजण्याची विनंती करत होते जेणेकरून त्यांना अंतिम संस्कार करता येतील साक्ष्मण पटेल यांनी पोलिसांना सांगितले होते की, २००४ मध्ये यशोदासोबत लग्न झाले होते.
लम्माला चार वर्षे मूल झाले नाही तेव्हा दोघेही इंद्रमभील एका आवच्हीएफ केंद्रात गेले, जयराजचा जन्म २००९ मध्ये टेस्ट ट्यूब तंत्राने झाला, पोलिसांनी तत्काळ इंदरमधील या आयव्हीएफ केंद्राचा शोध घेतला जिथून यशोदाने टेस्ट ट्यूब बेचीसाठी शुक्राणू घेतले होते. पोलिसांनी आयनीएफ केंद्राकडे शुक्राणू दात्याची माहिती मागितली; परंतु केंद्राने नियमांचे कारण देत पोलिसांना माहिती देण्यास नकार दिला.
गोंधळलेले पोलिस अधिकारी एएसपी संदीप मिश्रा सतत एफएसएलशी संबंधित पुस्तके वाचत होते. जेणेकरून काहीतरी मार्ग सापडेल. दरम्यान, अमेरिकेत आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे जन्मलेल्या मुलांची चोरी झाल्याची घटना त्याच्या समोर आली. अमेरिकन पोलिसांनी या मुलांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली होती. यासाठी ज्या पालकांनी मुलांवर हबक सांगितला होता, त्यांच्या मरून मुलांच्या वस्तु गोळा करण्यात आल्या, त्या वस्तूंवरील लाळ किंवा घामाचे नमुने मुलाच्या डीएनएसह तपासण्यात आले.
ज्या मुलांचे डीएनए जुळले त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. संदीप मिश्र यांनी हा केस स्टडी वाचताच त्यांच्या मनात एक प्रकाश पडला दरम्यान, लक्ष्मण पटेल यांनी उच्य न्यायालयात याचिका दाखल करून अंतिम संस्कारासाठी मुलाचा सांगाडा त्यांच्याकडे सोपवण्याची मागणी केली होती. न्यायालयानेही पालकांचे म्हणणे ऐकून सांगाडा पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले, तोपर्यंत श्रुतकीर्ती सोमवंशी यांनी दमोहचे एसपी म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी तत्कालीन टीआय सुधीर वेगी यांना त्यांच्या मुलाचा सांगाडा लक्ष्मण पटेल यांच्याकडे देण्यास सांगितले.
सुधीर बेगी गांनी सांगाडा घेऊन गावात जाऊन लक्ष्मण पटेल यांच्या ताब्यात दिला. १३ महिन्यांनंतर १२ मे २०२४ रोजी लक्ष्मण यांनी त्यांच्या मुलाचे अंतिम संस्कार केले. जयराजचा सांगाडा सापडला त्याच दिवशी लक्ष्मणने हत्येला जबाबदार असलेल्या आरोपींची नाये उघड केली होती; मात्र त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे कोणतेही पुरावे नव्हते. याशिवाय सांगाडा जयराजचाच होता हे शास्त्रीयदृष्टचा सिद्ध झालेले नाही. त्यानंतर लक्ष्मण यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची भेट घेऊन त्यांना आपली समस्या सांगितली.
दरम्यान, एएसपी संदीग मिश्रा यांनी टीआय सुधीर नेगी यांना त्या पुस्तकाच्या पानाच्या छायाचित्रासह पत्र लिहिले. आता नव्याने तपास करण्यासाठी पोलिसांकडे दोन ठोस कारणे होती. प्रथमतः एएसपी संदीप मिश्रा यांचा नवा खुलासा व त्या आधारे हा तपास पुन्हा सुरु करण्याची चर्चा होती आणि दुसरे कारण म्हणजे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पोलिसांना लक्ष्मणला न्याय देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा डीएनए तपासणी सुरू झाली.
पोलिसांनी लक्ष्मण पटेल यांच्या घरातून जयराजची बालपणीची खेळणी, कपडे, खत्तमोजे, टोपी, शिटी, शाळेचे ओळखपत्र गोळा केले. या सर्व वस्तू एफएसएल, चंदीगड येथे पाठवण्यात आल्या होत्या. या वस्तूंमध्ये जयराजच्या अंगावरील केस, नखे किंवा बायाचे नमुने सापडण्याची शक्यता पोलिसांना होती. पोलिसांची ही युक्ती कामी आली आणि जबराज हे लक्ष्मण आणि यशोदा पटेल यांचे अपत्य असल्याचे सिद्ध झाले; पण आता प्रश्न असा होता की, जयराजला मारणारे कोण होते? वास्तविक, जयराजच्या अपहरण आणि हत्येप्रकरणों लक्ष्मणने आपला सावत्र भाऊ दशरथ पटेल याचा मुलगा मानवेंद्र याच्यावर संशय व्यक्त केला होता.
गावातील लोकांनीही जयराजला मानवेंद्रसोबत शेवटचे पाहिले. लक्ष्मणने पोलिसांना सांगितले होते की, तो आणि दशरथ एकर आईची, पार्वतीची मुले आहेत; पण दोन वहील आहेत, लक्ष्मण पटेल यांच्या वडिलांचे नाव श्यामले पटेल आणि दाशरथ पटेल यांचे वडील धनीराम पटेल होते. दशरथ आणि त्याचा मुलगा मानवेंद्र त्याच्या मालमत्तेवर लक्ष ठेवून असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे आता पोलिसांनी लक्ष्मणख्या संशयाच्या आधारे मानवेंद्रला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असत्ता त्याने जयराजची हत्या केल्याची कबुली दिली.
दरम्यान, एएसपी संदीग मिश्रा यांनी टीआय सुधीर नेगी यांना त्या पुस्तकाच्या पानाच्या छायाचित्रासह पत्र लिहिले. आता नव्याने तपास करण्यासाठी पोलिसांकडे दोन ठोस कारणे होती. प्रथमतः एएसपी संदीप मिश्रा यांचा नवा खुलासा व त्या आधारे हा तपास पुन्हा सुरु करण्याची चर्चा होती आणि दुसरे कारण म्हणजे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पोलिसांना लक्ष्मणला न्याय देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा डीएनए तपासणी सुरू झाली.
पोलिसांनी लक्ष्मण पटेल यांच्या घरातून जयराजची बालपणीची खेळणी, कपडे, खत्तमोजे, टोपी, शिटी, शाळेचे ओळखपत्र गोळा केले. या सर्व वस्तू एफएसएल, चंदीगड येथे पाठवण्यात आल्या होत्या. या वस्तूंमध्ये जयराजच्या अंगावरील केस, नखे किंवा बायाचे नमुने सापडण्याची शक्यता पोलिसांना होती. पोलिसांची ही युक्ती कामी आली आणि जबराज हे लक्ष्मण आणि यशोदा पटेल यांचे अपत्य असल्याचे सिद्ध झाले; पण आता प्रश्न असा होता की, जयराजला मारणारे कोण होते ? वास्तविक, जयराजच्या अपहरण आणि हत्येप्रकरणों लक्ष्मणने आपला सावत्र भाऊ दशरथ पटेल याचा मुलगा मानवेंद्र याच्यावर संशय व्यक्त केला होता. गावातील लोकांनीही जयराजला मानवेंद्रसोबत शेवटचे पाहिले.
लक्ष्मणने पोलिसांना सांगितले होते की, तो आणि दशरथ एकर आईची, पार्वतीची मुले आहेत; पण दोन वहील आहेत, लक्ष्मण पटेल यांच्या वडिलांचे नाव श्यामले पटेल आणि दाशरथ पटेल यांचे वडील धनीराम पटेल होते. दशरथ आणि त्याचा मुलगा मानवेंद्र त्याच्या मालमत्तेवर लक्ष ठेवून असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे आता पोलिसांनी लक्ष्मणख्या संशयाच्या आधारे मानवेंद्रला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असत्ता त्याने जयराजची हत्या केल्याची कबुली दिली.