लाभांश देण्याचे अमिष दाखवून फसवणूक

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन भागात वतननगर परिसरामध्ये आमच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास नफ्यातील लाभांश अथवा कमी पैशांमध्ये फ्लॅट देऊ, असे आमिष दाखवत सुमारे दहा जणांची फसवणूक केली. याप्रकरणी समीर तुकाराम उबाळे ( वय 46 रा. तळेगाव दाभाडे ) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वडगाव फाटा येथे मोटार पेटली ; पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
गोपाळ लक्ष्मण कोंडावार (रा. नागपूर), अनिस चाँद शेख (रा. पुसद, जि. यवतमाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत. हा प्रकार सन 2015 पासून घडत असून गुरुवारी (दि. 25) समीर उबाळे यांनी फिर्याद दिली आहे.
कोरोनाचा नवा व्हेरियंट; मंत्री Eknath Shinde यांनी यंत्रणेला दिली ‘ही’ सूचना
आरोपी बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी फिर्यादी उबाळे यांच्यासह सुमारे दहा जणांना आमच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करा त्यानंतर आम्ही नफ्यातील पाच टक्के लाभांश देऊ तसेच प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक केल्यास तो बाजारभावापेक्षा कमी दरात देऊ, असे आमिष दाखवले.
पिंपरी : शहरातून साडेतीन किलो गांजा जप्त
परंतु,आरोपींनी कोणत्याच प्रकारचा मोबदला दिला नसल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादी उबाळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सुमारे 63 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे,अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दुर्गानाथ साळी यांनी दिली आहे.