आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू - पुढारी क्राईम डायरी

आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

भंडारा, पुढारी ऑनलाईन

जवाहरनगर परिसरातील नांदोरा-झिरी येथे आंघोळीसाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

सौरभ राजेंद्र गजभिये (वय १८, रा. परसोडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या अन्य तिघा मित्रांसोबत दुपारी नांदोरा- झिरी या पर्यटनस्थळी भटकंती करायला गेले होते.

सामंथा अक्‍किनेनी आणि नागा चैतन्य कडून घटस्‍फोटाची घोषणा

भटकंती करून परत येत असताना दुपारच्या सुमारास जवाहरनगर ते नांदोरा झिरी या रस्त्यावरील नहरालगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी उतरले.

येथे मुरुमाचे उत्खनन करून तयार झालेल्या खोल पाण्याचा तलाव तयार झाला आहे. या तलावातील खोल पाण्याचा अंदाज न घेता चौघेही मित्र एकमेकांचा हात पकडून आंघोळीसाठी उतरले.

कोल्‍हापूर : अंबाबाई देवीचे पहाटे चार ते रात्री नऊ दर्शन घेता येणार

दरम्यान, पुढे गेलेला सौरभ खोल पाण्यात बुडू लागला. त्याला इतर मित्रांनी वाचवण्यासाठी आरडाओरड केली. परंतु, मदतीसाठी नागरिक येईपर्यंत सौरभचा बुडून मृत्यू झाला होता.

या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार मंगल कुथे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button