कोल्हापूर : विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू  | पुढारी

कोल्हापूर : विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू 

कोल्हापूर : प्रतिनिधी 

पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथील शंकरराव चव्हाण विद्यामंदिरात शनिवारी शालेय व्यवस्थापन समितीची मिटींग सुरू होती. या बैठकीनंतर लघुशंकेसाठी गेलेले पालक समितीचे सदस्य दशरथ हनमंत वडर (वय ३९ रा. पुनाळ) यांना विद्युत महावितरणच्या डीपीतून विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळी ९ वाजता ही घटना घडली. नातेवाईकांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली होती. डीपी दुरूस्तीत वीज मंडळाकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी भेट देवून वडर कुटुंबियांचे सात्वन केले, तसेच हा डीपी हलविण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सीपीआरमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी जमा झाली होती. दशरथ वडर पुनाळ गावातील ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागात शिपाई म्हणून काम करीत होते. यांच्या पाश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Back to top button