हिंगोली : माळहिवरा फाट्याजवळ बर्निंग ट्रकचा थरार | पुढारी

हिंगोली : माळहिवरा फाट्याजवळ बर्निंग ट्रकचा थरार

हिंगोली : प्रतिनिधी

दिल्ली येथून दोन ट्रक औेषधी, कपडा, इलेक्टॉनिक्स वस्तू व इतर साहित्य घेऊन हैदराबादकडे निघाले होते. हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा फाट्याजवळ आज (रविवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चालत्या ट्रकला आग लागली. या दुर्घटनेत ट्रकमधील औषधे, कपडा, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळून मोठे नुकसान झाले.माळहिवराफाटा येथील गावकरी व अग्नीशमनदलाने ही आग आटोक्यात आणली.

अधिक वाचा : साधा संधी : DRDO मध्ये ८०० वैज्ञानिकांची भरती!

याबाबत चालक गगनदिपसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथून खासगी कंपनीचे दोन ट्रक औेषधे, कपडा, इलेक्टॉनिक्स वस्तू व इतर साहित्याचे डाग घेऊन हैदराबादकडे निघाले होते. ट्रक माळहिवरा फाट्या जवळ आल्यानंतर ट्रकच्या पाठीमागच्या बाजूने अचानक पेट घेतला. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. 

अधिक वाचा : कोल्हापूर : गॅगस्टरची गर्लफ्रेंड म्हणाली, ‘ती रात्र विसरणार नाही’

ट्रकच्या पाठीमागून येणाऱ्या दुचाकी वाहन चालकाने ट्रक पेटल्याची माहिती दिली. यानंतर चालक गगनदिपसिंह व क्लिनर यांनी ट्रक थांबवून ते ट्रकमधून बाहेर पडले. त्यानंतर या घटनेची माहिती समोर धावणाऱ्या ट्रकचालकालाही दिली. दरम्यान, ट्रकमधील औषधे, कपड्याच्या साहित्यामुळे ट्रकमधून आगीच्या मोठ्या ज्‍वाळा बाहेर पडून धुराचा लोट या परिसरात पसरला. यामुळे स्‍थानिक नागरिक आणि अग्‍निशमन दलाने ही आग आटोक्‍यात आणली. 

अधिक वाचा : ‘डुगु’ची माहिती देणार्‍यास ११ हजारांचे बक्षीस!

मात्र इंधन टाकीचा स्फोट होण्याच्या भितीने गावकरीही ट्रक जवळ जात नव्हते. त्यानंतर या घटनेची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांना मिळताच त्यांनी तातडीने हिंगोली नगर पालिकेच्या अग्‍निशमन दल घटनास्थळी पाठविले. गावकरी व अग्‍निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. तो पर्यंत ट्रकमधील काही साहित्य जळून खाक झाले, तर काही साहित्य पाण्याने भिजून खराब झाले. यामध्ये ट्रक व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. 

Back to top button